नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
आजच्या लेखात आपण पाहणार आहोत “यशाचं रहस्य“. स्वामी एकेदिवशी आपल्या ध्यानाच्या जागेवर ध्यान करत बसलेले असतात. त्या वेळी एका शिष्याने स्वामींना विचारलं, स्वामी यशाचं रहस्य काय आहे? स्वामी म्हणाले शिष्या याचे उत्तर द्या उद्या पहाटे स्नानाच्या वेळी देईन.
उद्या सकाळी माझ्या सोबत स्नानाला ये. शिष्य म्हणाला, ठीक आहे स्वामी. दुसऱ्या दिवशी पहाटे स्वामी आणि शिष्य नदी किनारी आले. स्वामी म्हणाले, चल शिष्या माझ्यासोबत नदीच्या पाण्यात उतर. दोघेही पाण्यात चालू लागले, पाणी जेव्हा गळ्यापर्यंत आले तेव्हा अचानक स्वामींनी शिष्याच डोकं पकडलं आणि त्याला पाण्यात बुडवल.
शिष्य पाण्यातून बाहेर येण्यासाठी संघर्ष करू लागला. पाणी त्याच्या नाकातोंडात जाऊ लागलं, पण स्वामींनी त्याला सोडलच नाही. शिष्य तडफड करू लागला. त्याला पाण्यात श्वास घेता येत नव्हता. तो पूर्ण कशोशिने बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. पण तरीही स्वामींनी त्याला सोडलंच नाही.
अखेर त्या शिष्याने प्राण पणाला लावून स्वामींच्या हाताला झटका दिला आणि तो पाण्याच्या बाहेर आला. पाण्यातून बाहेर आल्याबरोबर शिष्य तोंडाने जोर जोराने श्वास घेवू लागला. श्वास घेतल्यामुळे शिष्याला बरे वाटू लागले. त्याच्या जीवात जीव आला.
तो शांत झाल्यावर स्वामी म्हणाले, शिष्या जेव्हा तु पाण्यात होतास तेव्हा तुला सगळ्यात जास्त आवश्यक काय हवस वाटलं? शिष्य म्हणाला, श्वास. स्वामी म्हणाले, शिष्या यशाचं हेच रहस्य आहे. जेव्हा तुला तुझ लक्ष्य श्वासा इतक महत्त्वाच वाटेल,आवश्यक वाटेल तेव्हा तुला यश निश्चितच मिळेल.
हेच यशाचं खर रहस्य आहे. स्वामींनी आपल्या कृतीतून यशाचं रहस्य म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण दिले आहे. आपणही प्रत्येकाने यशाचे रहस्य जाणले पाहिजे. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहील.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.