या गोष्टी तुम्ही आयुष्यात नक्की करा ।। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील ।। जाणून घ्या खालील लेखात !

कला चित्रपट प्रादेशिक शिक्षण

“श्री स्वामी समर्थ” आजच्या लेखात आपण एक छानशी गोष्ट पाहणार आहोत. त्यावरून आजचा आपला स्वामी संदेश काय आहे ते बघणार आहोत. एक गरीब भिकारी एकदा एका गावात भीक मागत फिरत असतो. दुपारची वेळ असते, कडक ऊन पडलेलं असतं.

भिकारी दारोदार फिरत असतो, पण त्या दिवशी त्याला फारसं अस काही मिळत नाही. भिकारी निराश होतो तो विचार करतो की, आपण आता समोर एक झाड आहे त्याखाली शांत बसून जरा आराम करूया. तो भिकारी झाडाखाली बसतो उन्हामुळे आणि थकव्यामुळे त्याचे डोळे मिटायला लागतात.

इतक्यात तेथे लख्ख असा प्रकाश आकाशातून पडतो. भिकारी त्यातून बघतो तर त्या प्रकाशात सोन्याचा रथ त्याच्या समोर खाली उतरू लागतो. त्या रथातून एक तेजस्वी देवतेसमान व्यक्ती भिकाऱ्या समोर चालू लागते. भिकाऱ्याला प्रचंड आनंद होतो. त्याला वाटतं वा !

आपलं तर भाग्य उजळल, ही कोणीतरी इंद्रलोकातून देवता माझ्या जवळ येत आहे. माझं भाग्य उजळलं. आता फक्त मी या देवतेसमोर माझं वाडग अस ठेवणार, त्यात भरभरून सोन्याची नाणी टाकणार. मला आयुष्यभर काही करायची गरज नाही. वा! ती देवता चालत चालत त्या भिकाऱ्या समोर येते.

भिकारी खूप आशेने त्यांच्याकडे बघतो आणि ती देवता हात पुढे करून त्या भिकाऱ्याला म्हणते, की तुझ्याकडे असं काय आहे की जे तु मला देऊ शकतोस. भिकारी हे ऐकून प्रचंड निराश होतो, त्याला वाटत, अरे देवा…! काय हे माझं नशीब, हि देवता आली आणि मला द्यायच्या ऐवजी माझ्याचकडे मागते? काय हे!

भिकारी काय करतो की त्याच्या वाडग्यामध्ये काही नाणी आणि काही दाणे वैगरे असतात. तो शोधून शोधून एकदम असा सगळ्यात छोटा मक्याचा तुकडा काढतो आणि त्या देवतेच्या हातात ठेवतो. देवता शांतपणे त्याचे आभार प्रदर्शन करते आणि रथात बसून निघून जाते.

भिकारी नाराज निराश होऊन बडबड करत घरी येतो आणि आपलं बोचक ठेवतो. सर्व दिनचर्या करतो. नंतर रात्र होते. झोपायच्या आधी तो भिकारी त्याच्याकडे असलेली वाडग रिकामी करतो. वाडग बघून अत्यंत आनंदाने उडीच मारतो. त्याला दिसतं की, त्या वाडग्यामध्ये एक सोन्याचा मक्याचा दाणा असतो.

हे भिकाऱ्या च्या लक्षात येतं की, आपण त्या देवतेला जो अर्धा दाना दिला होता मक्याचा त्या देवतेने तितक्याच प्रमाणात आपल्याला हा सोन्याचा दाणा दिलेला आहे. भिकारी फार निराश होतो. स्वतावरच रागावतो की, अरे बापरे हे काय आपण केलं. तो फार आशा करतो कि ती देवता परत भेटू दे.

पुढच्या वेळी ती भेटली ना की मी भरपूर त्या देवतेला देईल. पण तसं काही होत नसतं. त्या देवतेने त्या भिकाऱ्याला बक्षीस दिलं पण तेवढ्याच प्रमाणात जितकं त्या भिकाऱ्याने त्या देवतेला कंजूसपणाने दिल होत. तेवढ्याच प्रमाणात त्या भिकाऱ्याला मिळालं असतं. नाही का?

तर या गोष्टीचा आपल्या स्वामिभक्तीशी काय संबंध आहेत ते बघूया. आपले स्वामी अगदी आईसारखे आहेत. त्यांचा सतत आपल्या भक्तांवर आपल्या मुलांवर लक्ष असतं. ते सर्व सुखात दुःखात आपल्या सोबत असतात. चांगल्या-वाईट सर्व प्रसंगांमध्ये स्वामी सतत आपल्या भक्तांच्या सोबत असतात.

आणि अनेकदा ते आपल्याला अनेक मोठ्या मोठ्या संकटातून कळत नकळत वाचतात. त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवतात. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला संकेत देत असतात. तर आपल्याला सावध करत असतात. स्वामी आपल्या भक्तांवर नितांत प्रेम करत असतात. ते आपल्याला भरभरून देत असतात.

अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की, माझी योग्यताही नव्हती. पण आयुष्यात मला इतकं सगळं मिळालं ते स्वामींमुळेच मी त्या ठिकाणी पोहचू शकलो, असे अनेक भक्त आपल्या अनुभवांमध्ये सांगतात. स्वामी आपल्या भक्तांना कायम दोन्ही हातांनी भरभरुन त्यांच्यावर कृपेचा आशीर्वादाचा वर्षाव करत असतात.

मग आता आपली काय जबाबदारी आह? आपण अगदी मनापासून स्वामींची भक्ती केली पाहिजे. स्वामी असे सांगतात का, तुम्ही मला भरपूर हार, पेढे, महागड्या वस्तू आणा किंवा दिवसभर माझ्या पोथ्या वाचन करत माझ्या माळ जपत बसा. आपण जर मनापासून त्यांचं नामस्मरण केलं तरी ते त्यांना खूप आवडतं तरी ते तेंच्या पर्यंत पोहचत. पण मनात स्वामींचे नामस्मरण करण्यामगचा भाव शुद्ध हवा.पूर्ण स्वामींवर विश्वास हवा.

त्यांच्या विषयी आपल्याला अतूट विश्वास हवा. त्यांना ते जास्त आवडतं.आपण म्हणलं की स्वामी आईसारखे आहेत त्यामुळे त्यांना आपल्या मनातील सर्व गोष्टी समजत असतात . आपल्या मनात भक्ती करताना कशासाठी आपण भक्ती करतोय? हे सगळे त्यांना कळत असतं.

त्यामुळे जरी तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल संकटात असाल तरी आपण मनमोकळेपणे स्वामींशी बोला. स्वामी नक्की तुम्हाला मदत करतील, नक्की तुमच्या संकटांवर मार्गदर्शन करतील. स्वामी खूप प्रेमळ आहे. काही भक्तांच्या बाबतीत काय होतं की, ते असं म्हणतात की आम्ही स्वामींचे एवढं करतो पण स्वामींनी आम्हाला काही दिलाच नाही.

मी संकटात होतो पण स्वामी काही आलेच नाही, पहा स्वामीभक्ती हा काही व्यापार नाही. आई मुलाच्या नात्यात केव्हा आपण असा व्यवहार पहिला आहेत का? आई केव्हा मुलाला म्हणते का की तू एवढे टक्के मार्क पाड, किंवा एवढे एवढे पैसे मला कमावून आणून दे मग मी तुझ्यावर एवढं एवढं प्रेम करेल. अस असत का ? नाही ना.

आई मुलांचं ते निखळ प्रेम असत. तसच प्रेम आपण स्वामींवर केलं पाहिजे. स्वामीभक्ती करताना कुठलाही मोजमाप ठेऊ नका. मी एवढं केलं तेवढं केलं. स्वामींनी मग मला आता तेवढ दिल पाहिजे. कारण हा व्यवहार, व्यापार नाहिये. पूर्ण श्रद्धा असावी.

एकदा स्वामींना तुम्ही सांगितलं स्वामींकडे सोपवलं प्रार्थना केली की, “निशंक हो निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे” ते लक्षात ठेवायचं आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत ते सगळं बघून घेणार आहे. तर आजपासून आपण ठरवू या स्वामींची जास्त जास्त भक्ती करायची.

नामस्मरण वगैरे जास्तीत जास्त करायचं. स्वामींवर पूर्ण अतूट विश्वास ठेवायचा आहे. स्वामींवर मन मोकळं प्रेम करायचं कुठलाही मोजमाप करून भक्ती करायची नाहीये. स्वामींची आणि पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे. तुम्ही आशा प्रकारे स्वामींवर प्रेम केलं ना, तर स्वामी पण तुमच्या या प्रेमाचा मान ठेवतील.

स्वामी पण तुमच्यावर भरभरून प्रेम करतील आणि तुमचं आयुष्य सुखाने भरून टाकतील.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *