या दोन गोष्टी केल्या स्वामींना कधीच आवडत नाही ।। स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी आपण जर करत असू तर स्वामी आपल्यावर रागावू शकतात ।। सविस्तर वाचा या लेखात !

देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

“श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।।” स्वामी भक्त हो आपण सगळे स्वामींची सेवा करतो. स्वामी सेवा करण तसं खूप सोपं काम आहे. परंतु, स्वामींची सेवा सुरू असताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. जस की स्वामींना कुठल्या गोष्टी आवडतात आणि कुठल्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत.

स्वामींचे आवडत्या गोष्टी आपण करत राहिलो तर स्वामींची कृपा आपल्याला लवकर प्राप्त होते आणि स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी आपण जर करत असू तर स्वामी आपल्यावर रागावून सुद्धा शकतात. म्हणून या गोष्टी जर आपल्या कडून होत असतील, तर ते आपण लगेच थांबवल्या पाहिजेत.

त्यामध्ये आपण बदल केला पाहिजे आणि स्वामींचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी नव्याने ह्या गोष्टीमध्ये बदल केला पाहिजे. म्हणूनच आज आपण स्वामींच्या आशा न आवडणाऱ्या कोणत्या दोन गोष्टी आहेत ते पाहणार आहोत. तर स्वामी सेवा करत असताना पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपण कटाक्षाने टाळायला हवी ती म्हणजे हळदी-कुंकवाचा वापर.

स्वामी सेवेमध्ये हळदी-कुंकवाचा वापर करणे वंचित आहे. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हळदी कुंकू लावायचे नाही. स्वामींना फक्त अष्टगंध लावायचा. म्हणून जर आपण स्वामी पूजेमध्ये हळदी-कुंकवाचा वापर करत असाल तर ते करणे लगेच थांबवावे. आणि अष्टगंधाचा वापर करावा.

कारण ही गोष्ट स्वामींना आवडत नाही. म्हणून स्वामींची पुजा करत असाल तर स्वामींना फक्त अष्टगंध लावावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण स्वामींना नैवेद्य अर्पण करतो त्यावेळी आपल्याला नैवेद्य जसाच्या तसा अर्पण करायचा नाही.

नैवेद्य अर्पण करत असताना त्यातील प्रत्येक पदार्थावर एक तुळशीपत्र नक्की ठेवायचे आणि नैवेद्य ठेवण्यापूर्वी स्वामींसामोर एक पाट ठेऊन पाटावरती एक स्वस्तिक काढून गायत्री मंत्र म्हणून त्यानंतर ताटाला तुळशीचं पान फिरून मगच हा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा.

त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींना अर्पण केलेला हा नैवेद्य आणि स्वामींना अर्पण केलेले हे पाणी कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे. कारण स्वामींना अर्पण केलेले पाणीसुद्धा अमृताप्रमाणे गोड असते. आणि म्हणून ते कधीही व्यर्थ जाऊन देऊ नये. तर अशा या दोन गोष्टी स्वामींना अजिबात आवडत नाही, या कटाक्षाने टाळा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *