काही विशिष्ट दिवशी महिलांनी आपले केस धुऊ नये !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” काही विशिष्ट दिवशी महिलांनी आपले केस धुऊ नये असं ज्योतिष शास्त्र सांगतं. पण कोणते आहेत ते विशिष्ट दिवस चला जाणून घेऊया.सात दिवसांचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळे सांगितले आहेत. त्यामुळे प्रत्येक वार कोणता ना कोणत्या ग्रहाशी निगडित आहे.

आपल्या संस्कृतीमध्ये वेळेचे प्रमाण हे देवांसाठी आणि मनुष्य प्राण्यांसाठी सुद्धा वेगवेगळ आहे. ब्रह्मदेवांच्या एका दिवसाला कल्प अस म्हटल जात. देवी देवतांचा एक दिवस हा आपल्या एक हजार दिवसा इतका असतो. आणि याच प्रमाणे सृष्टीचे चक्र चालत असते.

त्याचबरोबर आपल्या शास्त्रांमध्ये कोणत्या दिवशी कोणत कार्य करावं, आणि कोणत्या दिवशी कोणत कार्य करू नये याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुमची श्रद्धा असेल तर त्या संदर्भातल्या नियमांचं पालन तुम्ही करू शकता. शास्त्रामध्ये महिलांनी कोणत्या दिवशी केस धुऊ नये आणि कोण कोणत्या दिवशी केस धुवावे याचा सविस्तर विवरण दिला गेला आहे.

यामध्ये काही सण उत्सवांचा समावेश आहे. काही सण उत्सवाच्या दिवशी स्त्रियांनी केस धुऊ नये असं सांगितलं आहे. तसंच ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी केस कापणं, सेविंग करणं, नख कापन खूपच अशुभ मानले जाते.

आपल्या हिंदू पंचांगानुसार आपले सर्व सण उत्सव तिथीप्रमाणे साजरे केले जातात आणि कोणत्याही सणाच्या एक दिवस आधी केस धुणे योग्य असते. ज्योतिषशास्त्राचे मानल्यास अमावस्या, एकादशी आणि पौर्णिमा या तिथींना चंद्र एक तर उच्च स्थितीमध्ये असतो किंवा नीच स्थितीमध्ये असतो.

अशा परिस्थितीत जर सांसारिक स्त्रियांनी आपले केस धुतले तर त्याचा त्यांच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडू शकतो. त्यांच्या घरात अशांतता अस्वस्थता निर्माण होऊ शकते. सोमवारी संसारिक स्त्रिया आपले केस घेऊ शकतात. जर सोमवारी तुमचा उपवास असेल तर केस धुऊ नये.

ज्या स्त्रियांच्या मुलांचा जन्म सोमवारी झालेला असेल त्या स्त्रियांनी सुद्धा सोमवारी केस धुऊ नये असं म्हटलं जातं. कारण असं केल्याने याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होतो असंही सांगण्यात येतं. तसंच मंगळवारीही सांसारिक स्त्रियांनी केस धुऊ नये. मंगळवारी केस धुतल्यास आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

तसेच वैवाहिक जीवनात ही अडचणी येऊ शकतात म्हणून मंगळवारी सुद्धा केस धुऊ नये. जर मंगळवारी केस धुणे आवश्यक असेल तर आवळ्याचे चूर्ण केसांना लावून मग केस धुवावेत. म्हणजे कुठलाही प्रकारचा दोष लागत नाही. बुधवारच्या दिवशी सांसारिक स्त्रिया केस धुवू शकतात.

परंतु तुमच्या पाठीवर लहान भाऊ असेल तर मात्र बुधवारच्या दिवशी केस धुऊ नये. कारण बुधवारी केस धुतल्यास दोष आपल्या लहान भावाला लागतो, अशी एक मान्यता आहे. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही वरून देव किंवा बुधवारचे स्वामी श्री गणेशाची आराधना करू शकता.

गुरुवारी स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनी सुद्धा आपले केस धुऊ नये. तसेच फरशीही पुसु नये. गुरुवारी केस धुतल्यास दारिद्र्य येते असं म्हटलं जातं. जर गुरुवारी केस धुणं खूपच आवश्यक असेल तर केसांना बेसन किंवा हळद लावाव. त्यानंतर केस धुवावेत.

शुक्रवारी लग्न झालेल्या स्त्रिया आपले केस धुवू शकतात, परंतु ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, किंवा ज्यांना मुलगा आहे, अशा स्त्रियांनी शुक्रवारी केस धुऊ नये. शुक्रवारी जर केस धुवायचे असतील तर केसांना दही लावूनच मग केस धुतले जावे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *