नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” नवरा बायकोच्या संसारातील जीव घेणे विष म्हणजे संशय .ज्या नवरा बायकोमध्ये संशय नावाचे पिशाच्च प्रवेश करते तेव्हा सुखी संसाराला ग्रहणच लागून जाते.घरातील सुख समाधान नाहीसे होऊन कधी आयुष्य नष्ट होऊन जाते.
नवरा बायकोवर या सात कारणांवरून संशय घेतो.
1.आसपासचे वातावरण – आपण जिथे राहतो तेथील वातावरणाचा आपल्यावर सुद्धा परिणाम होताच असतो.अनेक वेळा आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ असेल तरीही आसपास जरी संशय कल्लोळ निर्माण करणारी घटना घडली त्या घटनेला आपण आपल्या आयुष्याशी तुलना करायला लागतो.
2.पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन – अनेक वेळा लग्नाआधीच किंवा लग्नानंतर मनात जोडीदाराबद्दल नकारात्मक प्रेम रुजले जाते.जोडीदार कितीही प्रामाणिक असला तरी आपण त्याच्याविषयी शंका घ्यायला लागतो आणि एक वेळ अशी येते की मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊन पूर्वग्रहामुळे शंका घ्यायला लागतो आणि संशय घेणे सुरू झाल्यास हे वादळ कधी कधी संसार रुपी झाडाला मुळासकट उपटून फेकते.
3.विश्वासाचं अभाव – नवरा बायकोच्या संसारात सर्वात महत्त्वाचा विश्वासाचं असतो.जे दाम्पत्य एकमेकांना विश्वासात न घेता राहतात त्यांचे नाते म्हणावे तसे परिपक्व झालेलेच नसते,मग लग्नाला कितीही वर्ष होईना विश्वास नसेल तर हे नाते व्यर्थ आहे.विश्वास कुठे विकत मिळत नाही आणि ती विकत घेण्याची गोष्ट ही नाही.
एकमेकांच्याप्रती एकमेकांचे असलेले समर्पण विश्वासाला जन्म देते आणि त्याला दृढ करते.त्यामुळे जोडीदाराला त्याच्याबद्दल विश्वास असायलाच हवा.विश्वास एका दिवसात कमावण्याची गोष्ट नसते.नेहमी आणि रोजचे तुमचे वर्तन तुमच्याबद्दल जोडीदाराला येणारे अनुभव या आधारे विश्वासाचे दृढीकरण होत असते.
4.एकमेकांसोबताचे वर्तन – ज्यांना आयुष्य सोबत काढायचे आहे त्यांनी एकमेकांचा आदर करणे आवश्यकच असते.नेहमी अविश्वास दाखवून सतत टोंबने मारणे,एकमेकांचा अपमान करत राहणे,यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. दोघांनाही असुरक्षित वाटायला लागते.
त्यातूनच संशय बळावतो,त्यातूनच प्रेमाचा झरा आटत जातो.एकमेकांचे मन दुखावले जातात आणि नावापुरते नवरा बायको राहतात.अशा वेळी एकमेकांच्या हव्या तशा शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीत आणि म्हणून संशय कल्लोळ निर्माण होतो.नवरा बायकोचे वर्तन एकमेकांना आत्मसन्मान राखला जाईल असेच असावे.याच प्रमाणे आपल्या संसारात कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला डोकावूं देवू नका.
5.मोबाईल – याचे काही फायदे किंवा तोटे देखील असतात.मोबाईलमुळे नवरा बायकोच्या संसारात दुभांगपणा आलेला जाणवतो. मोबाईलला पासवर्डच का? आणि तो पासवर्ड मला का माहीत नाही? हे सुरवातीचे कारण आणि नंतर त्यापासून संशयाला सुरवात होते.
6.लग्नाआधीच मित्र परिवार – पती किंवा पत्नी यांना लग्नाआधी भिंन लिंगी मित्र परिवार असतो.लग्नानंतर हाच मित्र परिवार संपर्कात येतो तेव्हा काहींचे दृष्टीकोन बदललेले असतात. लग्नाआधी आपल्याला त्यांचा मित्र परिवार माहीत करून घ्यावा.
7. कार्यालयातील कामे आणि संपर्क – कार्यालयात स्त्री पुरुष सततचा संपर्क येणे साहजिक आहे.आणि वेळा कार्यालयीन कामाचे फोन घरी सुद्धा येतात.यावेळी नवरा किंवा बायको यांना हरकत नसावी.कधी कधी कार्यालयातील उशीर सुद्धा संशयाला कारण ठरते.दोघेही नोकरीत असल्यास एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.