हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्मानपैकी एक धर्म आहे. आपण अनेक परंपरांचे पालन करतो त्यापैकी चरणस्पर्श ही एक महत्वाची परंपरा आहे. चरणस्पर्श याचा अर्थ आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या, ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे. ज्या व्यक्ती नात्याने आपल्यापेक्षा मोठे आहेत, अशा व्यक्तींच्या आपण पाया पडतो. त्यांचे चरण स्पर्श करतो.
या पाठीमागे अनेक करणे आहेत. मात्र तीन व्यक्ती अशा आहेत की, ज्या व्यक्तींच्या आपण चुकूनही पाया पडू नये. कारण या व्यक्तींच्या पाया पडल्याने आपल्याला अनेक गंभीर परिणामांना भविष्यात सामोरं जावं लागू शकतं. या तीन व्यक्ती कोणत्या आहेत हे आपण जाणुन घेणार आहोत.
त्यापूर्वी चरणस्पर्श म्हणजे पाया का पाडाव. यापाठीमागे हिंदुधर्मशास्त्र नेमकं कोणती कारण सांगत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या, संत महात्म्यांच्या पाया पडतो. तेव्हा आपले हात हे त्यांच्या चरणांना स्पर्श करत असतात.
त्यांचे हात हे आपल्या डोक्यावर किंवा आपल्या पाठीवर आपल्या खांद्यावर ती स्पर्श करत असतात. या क्रियेद्वारे या संत महात्मा आपल्या आई-वडिलांच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा किंवा त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रति दाटलेले भाव, प्रेम, वात्सल्य, आशीर्वाद हे आपल्या मध्ये प्रवाहित होत असतात आणि यांचा आशीर्वादाच्या आणि सकारात्मक उर्जेचा जोरावर आपण प्रत्येक कामामध्ये यश मिळवतो.
आपण जे काही कार्य करतो त्यामध्ये आपल्याला सद्सद्विवेक बुद्धीने काम करता येतं. त्या प्रत्येकामध्ये यशप्राप्ती होते. म्हणूनच आपली जी थोर महान परंपरा आहे, आपली हिंदू संस्कृती आहे तीने सकाळी उठल्याबरोबर ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला सांगितलेला आहे.
जेणेकरून यांचे अनुभव, त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आपणास माहीत असेल की भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा त्याचा मित्र सुदामा गरीब सुदामा यांची चरण स्पर्श केले होते. तसेच आज सुद्धा नवरात्रीमध्ये आपण कन्या पूजन करतो आणि या कन्यापूजन वेळी कन्यांची पाय धुतले जातात.
त्यांची पूजा केली जाते आणि नंतर चरण स्पर्श केले जातात. अस केल्याने नवदुर्गांचा आशीर्वाद प्राप्त होतात असा हिंदु धर्म सांगतो. जे तीन लोक आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
1.आपले शत्रू- आजच्या कलियुगामध्ये सर्वच लोक काही चांगले नसतात. काही लोकांच तुमच्याबरोबर शत्रुत्व नक्की असतं. दुश्मनी असते. जे लोक तुमचे शत्रू आहेत जे तुमचा द्वेष करतात तुमची प्रगती ज्यांना पाहावत नाही अशा लोकांचे पाय कधीही त्यांच्या पाया पडू नका.
यांची पदस्पर्श चरण स्पर्श कधी करू नका. कारण या लोकांमध्ये तुमच्याप्रती सतत नकारात्मक भाव दाटलेले असतात. तुमच्याविषयी सतत नकारात्मक विचार हे लोक करत असतात. आणि म्हणून यांच्या शरीरामध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा ही पाया पडताना तुमच्या शरीरांमध्ये प्रवाहित होते आणि याचे अनेक घातक परिणाम तुमच्यावर होतात.
तुमची चालू असलेली प्रगती थांबू शकते. तुमच्या चालू कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. तुमचं मन तुमच्या कामा वरून हटवू शकत किंवा तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद वाढू शकतो. आणि म्हणून जे आपले शत्रू आहेत आपला द्वेष करतात. आपल्यावर जळतात अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका.
2.अधर्मी, चरित्रहीन आणि पापी लोक. या जगामध्ये धर्मानुसार वागणारे लोक फार कमी झालेले आहेत जे लोक अधर्मी आहेत. आपल्या हिंदू धर्माचं पालन करत नाहीत जे चरित्रहीन आहेत त्यांना चारित्र्य नये किंवा जे पापी प्रवृत्तीचे लोक आहेत.
अशा लोकांच्या सुद्धा पाया पडू नका तर तुम्ही हे कृत्य केलं तर तुम्ही या लोकांच्या पाया पडला तर तुम्ही धर्म भ्रष्ट होऊ शकता. तुमच्या हातून अधार्मिक कार्य घडू शकतात. अनैतिक मार्गाने तुम्ही पैसा कमाउ लागाल तुमच्यातील धर्म नष्ट होऊन जाईल.
३.असे लोक त्यांना तुम्ही जाणत नाही जे अनोळखी आहेत. अनोळखी लोकांबद्दल आपल्याला माहीत नसतं. हे लोक नेमके कसे आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे हे धर्मनिष्ठ आहेत की नाही याची आपल्याला जाणीव नसते. आणि म्हणून अशा अनोळखी लोकांच्या सुद्धा आपण चुकूनही पाया पडू नका.
आशा लोकांच्या पाय पडण्याने कोणत्या प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होईल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून अनोळखी लोकांच्या पाया पडणं त्यांना पदस्पर्श करणं हे कटाक्षाने टाळा. आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आपल्यापेक्षा वयाने आणि नात्याने मोठे आहेत. अशा लोकांना आपण कधीही चुकूनही अपशब्द वापरू नका.
अशा लोकांचा अपमान करू नका. जे लोक अशा प्रकारे ज्येष्ठांचा अपमान करतात ज्येष्ठांना अद्वातद्वा बोलत आहे. अशा लोकांना जीवनामध्ये कधीही यश प्राप्ती होत नाहीये. त्यांना कितीही मेहनत करून द्या कितीही कष्ट करू या मात्र सातत्याने अपयशाला तोंड पाहावं लागतं.
त्यांच्या जीवनामध्ये कीर्ती मानसन्मान या गोष्टी उरत नाही याउलट जे लोक गरीब आहेत. अशा गरिबांचे आशीर्वाद नक्की या गोर गरिबांना गरजूंना नक्की मदत करा. या लोकांचे आशीर्वाद हे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात नवीन नवीन काम करण्याची प्रेरणा देतात
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.