जियो मार्ट देश की नयी दुकान अशी या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे. चला तर जाणून घेऊया जियो मार्ट नक्की काय आहे? जियो मार्ट चा बिजनेस मॉडेल काय आहे? जियो मार्ट शी कसं जोडल जायचं? आणि जियो मार्ट शी पहिलं जोडलं जाऊन पैसे कसे कमवावे?आपण जियो मार्ट सोबत सेलर, सप्लायर किंवा डिस्ट्रिब्युटर बनून देखील जोडले जाऊ शकता. चला तर जाणून घेऊया याबद्दल पूर्ण माहिती.
५ सप्टेंबर २०१६ पर्यंत टेलिकॉम कंपनी एकाधिकार गाजवत होत्या. लोक मिस कॉल देऊन काम चालवत होते. सारखे सारखे रिचार्ज देखील परवडत नव्हते. फोन, इन्कमिंग, आउट गोईंग कॉल, रोमिंग चे वेगवेगळे पैसे मोजावे लागत होते. इंटरनेट तर एवढं महाग होत की तेव्हा १ जिबी मध्ये पूर्ण एक महिना चालवावा लागत होता. आणि मग ५ सप्टेंबर २०१६ साली लोकांना त्रासातून मुक्त करण्यासाठी जियो कंपनी एखाद्या हिरो सारखी टेलिकॉम क्षेत्रात व्यवसायात उतरली. आणि ३ च वर्षात जियो विरोधी असलेल्या कंपनी जस की टाटा, बि एस एन एल, युनिनोर, एअरटेल, एअरसेल, आयडिया, व्होडाफोन यांना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आव्हान देऊ लागते.
व्होडाफोन आयडिया तर एकत्र झाल्या. आणि ३१ डिसेंबर ला आपल्या योग्य सेवांमुळे भारताची सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी बनते. ४० करोड ग्राहकांना घेऊन जगातील दुसऱ्या क्रमांकचा टेलिकॉम ऑपरेटर ही कंपनी बनते. आता तुम्ही म्हणत असाल आम्हाला जियो टेलिकॉम ची माहिती का देतोय तर त्याच कारण अस की काही अश्याच प्रकारचा धमाका जियो ई कॉमर्स क्षेत्रात करणार आहे.
यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, ग्रोफर्स यांसारख्या मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांना आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे.जियो अश्या प्रकारचा एक मोठा स्टार्टअप सुरू करणार आहे काही ठिकाणी तर सुरू सुद्धा केले आहे.आणि तोच स्टार्टअप म्हणजे जियो मार्ट.जियो मार्ट वर जानेवारी 2019 पासूनच काम सुरू आहे.
अजुन सुद्धा जियो मार्ट ची वेबसाईट जियो मार्ट.कॉम बीटा व्हर्जन वरच चालत आहे.म्हणजेच अजुन काम चालू आहे. आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जवळजवळ सर्वच क्षेत्रात याच परीक्षण केले गेले आहे. मग त्यात स्वप्ननगरी मुंबई असेल,ग्रामीण भाग भटिंदा असेल,दक्षिण आहेत. आत्तापर्यंत तुम्ही B2B किंवा B2C अश्या प्रकारच्या व्यवसायाबद्दल ऐकलं असेल, B2B बीजनेस म्हणजे एक जीएसटी नंबर वाला व्यक्ती दुसऱ्या जिएसटी नंबर असलेल्या व्यक्तीकडून काहीतरी घेतो जस की वॉलमार्ट, ई.तर B2C म्हणजे बिजनेस टू कन्सुमर यामध्ये कन्सूमर म्हणजे आपल्यासारखे खरेदी करणारे लोक जस की अमझोन,फ्लिपकार्ट हे ह्या कॅटेगरी मध्ये येतात.
पण जियो मार्ट ह्या दोन्हींमध्ये काम न करता काम करते O2O वर. ओ टू ओ म्हणजे ऑनलाईन टू ऑफलाईन आणि ह्याच क्षेत्रात चीन चे उद्योगपती असलेले जॅक मा यांची कंपनी अलिबाबा काम करते. तर यामध्ये तुम्हीही ऑनलाईन ऑर्डर करून इतर ऑर्डर प्रमाणे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार पण यात तुम्हाला सामान देणारा कोणी ऑनलाईन स्टोअर वाला नाहीये तर तुमच्या आजूबाजूचे ग्रोसरी शॉप किंवा किराणा मालाचे दुकान आहे.
जियो मार्ट फक्त एक माध्यम आहे.जियो मार्ट तुमच्याच जवळील दुकानातून लवकरात लवकर आणि स्वस्त दरात सामान उपलब्ध करून देईल. जियो मार्ट वर ग्रोसेरी शॉप वर मिळणार सर्व सामान अगदी पिठ, तांदूळ, गहू, तेल, मीठ, होम केअर, बेबी केअर, टेडी इत्यादी जे काही तुम्हाला दुकानात मिळत ते सर्व मिळणार. सोबत भाज्या आणि फळे हे देखील मिळणार. जियो मार्ट देशातील 30 करोड दुकानदारांना एकसाथ जोडायचा संकल्प करत आहे. आणि ते त्यांनी सुरू देखील केले आहे.
जिथे ग्रोसरी शॉप्स उपलब्ध नाहीत तिथे रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स स्मार्ट सामान उपलब्ध करतील. जियो मार्ट च टार्गेट पहिल्या फेज मध्ये 20 करोड ग्राहकांपर्यंत पोहचणे आहे.ह्यासाठी जियो कडे 40 करोड चा ग्राहक वर्ग आधीपासून आहे. आणि एवढ्यात मुकेश अंबानी यांनी फेसबुक आणि इतर मोठ्या कंपन्यांसोबत टाय अप केले आहे. ह्या बिजनेस ला घराघरांत पोहचवण्यासाठी फेसबूक ने जियो या कंपनीमध्ये 43574 करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे.आणि हे जियो मार्ट साठी खूप मदतीचं ठरणार आहे.
जियो मार्ट फेसबुक, इंस्टाग्राम,व्हॉट्सअँप यांच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या पर्यंत पोहचणार. व्हॉटसअप चे पण 40 करोड पेक्षा जास्त युजर्स आहेत. आणि आजकाल व्हॉट्सअँप पण जवळजवळ सर्व स्मार्टफोन्स मध्ये आहे.कोणत्याही बिजनेस मध्ये महत्त्वाचं असत की ग्राहकांपर्यंत कंपनी कशी पोहचत आहे. पेमेंट सर्व्हिस कशी सोपी करता येईल, ग्राहकांना योग्य सामान योग्य वेळी कसं उपलब्ध करता येईल. व्हॉट्सअँप सोबत जियो मार्ट आल्याने ऑर्डर प्रोसेस सोपी होणार आहे.
फक्त एक hii चा मेसेज त्या नंबर वर लिहिल्याने तुम्ही जियो मार्ट च्या संपर्कात येणार आहे. ते सर्व शोधून काढणार की आपल्याला कोणती गरज आहे, आपण काय खरेदी करायचा विचार करत आहात? आपण गूगल वर काय शोधत आहात? आपला बजेट किती आहे? तुम्हाला काय ऑफर द्यायची आहे? तुम्हाला किती फ्री द्यायचं आहे आणि कधीपर्यंत द्यायचं आहे? जियो मार्ट वर ५% कमी प्रतिशत एम आर पी वर सामन मिळेल.
सुरुवातीच्या ऑर्डर्स वर तुम्हाला ३००० रुपयांपर्यंत च फ्री कूपन मिळेल.तुम्ही कितीही रुयांपर्यंत ऑर्डर करू शकता. २०,००० रूपयांपेक्षा मोठ्या ऑर्डर वर तुम्हाला जवळील दुकानातून मेसेज मिळेल आणि तिथे जाऊन तुम्हाला पेमेंट करावे लागेल. डिलिव्हरी फ्री मिळेल आणि तुम्हाला ऑर्डर रिटर्न करायची असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. तुम्ही कोणत्याही माध्यमातून पेमेंट करू शकता आणि व्हॉट्सऍप पे पण लवकरच येत आहे.ब्राझिल मध्ये १५ जून २०२० पासून व्हॉट्सअँप पे ची सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडे कोणतेही कार्ड असेल, कोणतेही ऑनलाईन वॉलेट किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा तुम्ही करू शकता. जियो चा डिलिव्हरी बॉय सोबत मशीन घेऊन येईल त्यामुळे तुम्हाला पेमेंट करताना काही त्रास होणार नाही.
जियो मार्ट सोबत कसं जोडलं जायचं? तर तुम्ही जियो मार्ट सोबत ३ पद्धतीने जोडले जाऊ शकता. सेलर बनून तुम्ही तुमचं दुकान जोडू शकता. डिस्ट्रिब्युटर बनू शकता किंवा तुम्ही रिलायन्स रिटेल ला आपले सामान विकू शकता. जियो मार्ट डिस्ट्रिब्युटर बनन्यासाठी काय अटी आहेत ? १) पर्याप्त जागा हवी २) काही डॉक्युमेंट हवेत जस की तुमच्या कंपनीचे सर्व कागदपत्रे, पॅन कार्ड वगेरे. यासाठी तुमच्याकडे काही पैसे,काही जागा आणि रिटेलर सोबत चांगले संबंध पाहिजेत. नंतर जियो ची सेल्स टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. आणि ते पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करतील. जियो मार्ट मुळे असंख्य लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि देशाला कर मिळून अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे.