नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
स्वामीनी आपल्या कारकीर्दीत कधी सोवळ्या ओवल्याला महत्त्व दिले नाही. त्याची त्यांना अत्यंत चीड होती. एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून बसून दर्शन घेत आहे, असे दिसताच ते स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि आपल्या हाताने प्रसाद भरवत असत. विटाळ या शब्दाचा त्यांना फार राग होता. हा शब्द ऐकलं जरी तरी ते रागाने लालबुंद होत असे.
ते म्हणत, “बाई ही आई आहे” आणि आई कधीच विटाळशी होऊ शकत नाही. तुम्ही सगळे हरामखोर आहात. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवतात. याच संदर्भातील एक गोष्ट, स्वामींचा परम भक्त चोळप्पा. सगळ्यांना माहीत असेलच, त्यांनी एकदा घरी सत्यनारायणाची पूजा करायचा संकल्प केला.
नितीप्रमाने चोळप्पा स्वामींची परवानगी घ्यावयास मठात पोहोचला. स्वामींना त्याने नम्रपणे आपल्या संकल्पाबद्दल सांगितले आणि त्यांची परवानगी मागितली. स्वामी ही खुश झाले आणि म्हणाले चोळ्या सत्यनारायण घालतो छान पण, प्रसादाचे जेवण मी आणणार.चोळप्पानी स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले.
आपल्या कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त चोळप्पाने ठरला आणि पूजेची तयारी करण्यात चोळप्पाचे कुटुंब गुंतून गेले. पूजेचा दिवस उजाडला, प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून चोळप्पाची बायको थोडी अस्वस्त होती. पण स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता.
पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर स्वामींचे अक्कलकोट मधील एक भक्त साळीकर, त्यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे तेरावे होती. इकडे स्वामींना तेराव्याचे जेवायला कसं बोलवायचे? म्हणून साळीकर द्विधा मनस्थितीत होते. इकडे पूजा संपत आली स्वामीनी भक्तांना पाठवून तेराव्याचे जेवण मागवून घेतले. स्वामी चोळप्पाच्या घरी पोहोचले.
सत्यनारायण पुजेला स्वामींनी तेराव्याच्या जेवनाचा प्रसाद दाखवला. सगळे मुकाटपणे जेवले. स्वामीं समोर बोलायची कोणाचीही टाप नव्हती. अशीच सोळ्या ओवळ्याची दुसरी गोष्ट. राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्तिन होती. तिच्या मनात गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली.
उद्यापासूनच सुरवात करायची असे ती विचार करत होती. तिच्यासमोर दोन अडचणी होत्या. एक म्हणजे, दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि तिची मासिक पाळी त्याच आठवड्यात होती. काय करावे अशा संभ्रमात राधा पडली? शेवटी तिने जाऊन स्वामींना विचारायचे ठरविले आणि ते स्वामींकडे पोहोचली.
स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी गरजले, राधे ही अडचण, अमावस्या हे सर्व तुम्हा लोकांसाठी, आम्हाला याचे काही नाही. आमच्याकडे बघ सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत आहे. जा गुरुचरित्र वाच आणि हो वाचण्यागोदर माझ्यासाठी एक पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते दूध पिऊन टाक.
अडचण बिडचन कुछ नही. स्वामिनी सांगितल्याप्रमाणे राधेने गुरुचरित्र मांडले आणि रोज पेल्याभार दुधसुद्धा ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची पाळी सुरू झाली. हि आहे स्वामीची लीला. स्वामींची लीला अघाद आहे. स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत होईल. “श्री स्वामी समर्थ”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.