virat

विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणि T-20 वर्ल्डकपमधील हे 6 रेकॉर्ड कधीच तुटणार नाहीत..

क्रीडा

विराट कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि T20 मध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 457 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर विराट कोहलीची कसोटीत 50.39, एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.07 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 51.50 अशी सरासरी आहे.

याशिवाय, विराट कोहलीच्या नावावर T20 विश्वचषकात हे 6 विश्वविक्रम आहेत ,त्यामधील 2022 मध्ये केले दोन विक्रम केले आहेत. सर्वप्रथम, विराट कोहली T20 विश्वचषकाच्या इतिहासात दोनदा टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. 2014 आणि 2016 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

विराट T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 1141 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 14 अर्धशतके झळकावली आहेत. T20 विश्वचषकातील सर्वोच्च फलंदाजी सरासरी 81.50 ही विराटच्या नावावर आहे.

तसेच विराट कोहली के नाम पर टी20 वर्ल्ड कप के एक सीजन में सर्वाधिक 319 रन बनाने का रिकॉर्ड पण आहे. 2014 मध्ये त्याने हे आश्चर्यकारक काम केले होते. तसेच विराट टी-20 विश्वचषकाच्या दोन मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने 2014 मध्ये आणि त्यानंतर आता 2022 मध्ये ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

विराट कोहली हा भारतातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 7 द्विशतके झळकावली आहेत. त्याला दीर्घकाळ फलंदाजी करायला आवडते हे त्याने आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला शतकही करता आले नाही हे कोहलीचे दुर्दैव म्हणावे लागेल. तसेच कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणारा विराट कोहली हा जगातील दुसरा फलंदाज आहे.

कर्णधार म्हणून त्याने 20 कसोटी शतके झळकावली. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ अव्वल स्थानावर आहे. स्मिथने कर्णधार म्हणून 25 शतके झळकावली आहेत.

सध्या भारताकडून कसोटी खेळणाऱ्या एकाही खेळाडूने 27 कसोटी शतके झळकावली नाहीत. सक्रिय क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाले तर स्टीव्ह स्मिथ त्याच्या बरोबरीने आहे. विराटला 2 वर्षांहून अधिक काळ कसोटीत शतक झळकावता आलेले नाही.

याशिवाय, कोहलीचा हा पाचवा टी-२० विश्वचषक आहे. यावेळी तो या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतके झळकावली. दोन्ही सामन्यात तो नाबाद होता. अ‍ॅडलेड ओव्हलवर आज टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी झाला यामध्ये या सामन्यात विराट कोहलीने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला.

तो T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. कोहलीने ऍडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध 16 धावा करताना ही कामगिरी केली. विराटने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे.

याशिवाय, विराट कोहली हा जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे, ज्याने कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या दोन्ही डावात शतके झळकावली. या विक्रमाद्वारे त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपलची बरोबरी केली.

2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एमएस धोनीला दुखापत झाल्यानंतर, त्याने ऍडलेड कसोटीत भारताचे नेतृत्व केले आणि सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली.  कोहलीने पहिल्या डावात 115 आणि दुसऱ्या डावात 141 धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *