विमाने हि पांढ-या रंगाचीच का असतात? ।। विमानांना रंगीत आणि अधिक आकर्षक का बनवत नाही?

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” जगभरातील जवळपास सर्वच प्रवासी आणि मालवाहतूक करणारी विमाने ही पांढऱ्या रंगाचे असतात, अशी खूप कमी विमाने असतात जी विविधरंगी किंवा रंगीबेरंगी असतात. कधी तुमच्या डोक्यात हा विचार आला आहे का ही विमाने हि पांढ-या रंगाचीच का असतात?

विमान सेवा देणारी कंपनी इतर सर्व गोष्टींवर बराच खर्च करते तर मग आपल्या विमानांना रंगीत आणि अधिक आकर्षक का बनवत नाही?

पण विमान पांढऱ्या रंगाचे असणे यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत त्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाला सर्वात चांगल्या प्रकारे परावर्तित करू शकतो तर गडद रंग असं करू शकत नाही काळा किंवा इतर कुठलाही गडद रंग सूर्यप्रकाश परावर्तित करत नाही.

परावर्तित होण्याचे प्रमाण फारच कमी असते. आपण उन्हाळ्यात पांढरे कपडे घालने पसंत करतो. कारण सूर्याच्या उष्णतेचा परावर्तित करतो हे सत्य विमानाच्या बाबतीत सुद्धा वापरले जाते.

जर विमानाला कुठलाही गडद रंग दिला गेला तर तो रंग व सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात शोशुन घेईल त्यामुळे विमानातील यंत्रणेवर याचा परिणाम होतो यंत्रणा खराब होण्याची संभाव्यता वाढते. विमानांना पांढरा रंग देण्यामागे यामागे केवळ हे एकच कारण नाही.

पांढरा रंगामुळे विमानावरील कुठलाही क्रॅक ठळक पणे दिसुन येतात किंवा इतर गोष्टी सहजपणे दिसून येतात तसेच कधी कुठले विमान दुर्घटनाग्रस्त झाले तर त्याच्या पांढऱ्या रंगामुळे ते समुद्र,जंगल किंवा जमिनीवर स्पष्टपणे दिसू शकते. रात्रीच्या काळोखात देखील पांढरे विमान पाहणे सहज सोपे आहे.

विमान फारच मोठ्या आकाराचे असते. त्यामुळे त्याला पेंट करणे म्हणजे काही सोपे काम नाही, कुठल्याही जम्बो जेट विमानाला खर्च करण्यासाठी कुठल्याही विमान कंपनीला खूप खर्च करावा लागतो. त्यासाठी खूप वेळ करावा लागतो.

विमानाला सतत ऊन, वारा, पाऊस याचा मारा सहन करावा लागतो. यात जर विमानाला कुठला इतर रंग दिला गेला तर तो खूप लवकर फिक्कट पडायला लागतो. आणि जेव्हा केव्हा तुम्ही विमानात बसालं तेव्हा या विमानाच्या पांढऱ्या रंगामागे इतकी सगळी करणे असतात हे तुमच्या लक्षात येईल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *