पुणे विमानतळावर विमानाची 2.30 तास वाट पाहिल्यानंतर प्रवाशांना काहीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, पुणे आणि कोलकाता या शहरांकडे जाणारी दोन्ही विमाने एअर इंडिया कंपनीची होती. त्यामुळे पुण्याला जाणारे शेकडो प्रवासी दिल्ली विमानतळावरच अडकले असल्याचे दिसून आले.
तसेच गेल्या अनेक दिवसांपासून विमानांना उशीर होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, उत्तर भारतात सुरु असलेल्या थंडीमुळे धुके निर्माण होत आहे आणि परिणामी यामुळे विमानांना उशीर होत असण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत. तसेच अनेकदा धुक्यांमुळे विमानांची उड्डाने रद्द करण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत.
दरम्यान, सोमवारी दिल्लीहून पुण्याला आणि कोलकत्त्याला जाणारी दोन्ही विमाने लेट झाली आणि तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत कंपनीकडून किंवा विमानतळ प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती दिली गेली नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अखेर प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि सोमवारी रात्री दिल्लीच्या विमानतळावर प्रवाशांनी प्रचंड गोंधळ घातला.
ही घटना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल 3 वरची आहे. तसेच दिल्ली विमानतळावर सोमवारी रात्री पुणे शहराकडे विमान निर्धारित वेळेत पोहोचले नाही. त्यामुळे प्रवासी वाट पाहत होते. परंतु त्यासंदर्भात कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही. विमानाची 2. 30 तास वाट पाहिल्यानंतर काहीही माहिती मिळाली नसल्याने पुणे आणि कोलकाता या शहरांकडे जाणारी दोन्ही विमान एअर इंडिया कंपनीची होती.
यामुळे पुण्याला जाणारे शेकडो प्रवासी दिल्ली विमानतळावरच अडकले. तसेच या विमानांच्या उड्डाणास उशीर का होत आहे?, त्याची माहिती दिली नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान, वाराणसी-पुणे इंडिगो विमानसेवा 11 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू होत आहे. तसेच थेट फ्लाइट 6E 672 पुण्याहून रात्री 11.55 वाजता उड्डाण करेल तर 1.55 वाजता बाबतपूर विमानतळावर पोहोचेल. हे विमान 6E 6884 होईल.
याचबरोबर, दुपारी 2:40 वाजता बाबतपूर विमानतळावरून उड्डाण करेल व पहाटे 5 वाजता पुण्याला पोहोचेल. या सेवेमुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे विमानतळ संचालक पुनीत गुप्ता यांनी दिली.