घरातील या तीन वस्तू दूर करतात वास्तुदोष ! घरात नेहमी आनंद, शांती आणि समाधान राहील ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” अनेक जणांना आपल्या घरातील वास्तुदोषामुळे अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. घराची प्रगती होत नाही, घरात सतत अस्वस्थता जाणवते, इतकंच नाही तर घरात आल्यावर जे आरामदायी वाटायला हवं तसं न जाणवता अस्वस्थता मनात भरून राहते.

मित्रांनो हा वास्तु दोष असू शकतो. कदाचित बांधकाम करताना काही चुका झाल्या असतील किंवा आशा वस्तू आहेत की त्यातून बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा असे दोष उत्पन्न करते, त्या तुमच्या घरात असतील आणि याच वास्तुदोषामुळे घरातील बरेच लोक आजारी सुद्धा पडतात.

काम अपूर्ण राहतात. घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही. मग अशा घरात माता लक्ष्मी सुद्धा स्थिर राहत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत, अशा काही वस्तूंबद्दल ज्या आपल्या घरात वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला मदत करतात. त्यातील तीन अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत. ज्यांच्याबद्दल आज आपण येथे जाणून घेणार आहोत. या वस्तू ठेवल्या तर आपल्याला बर्याच अंशी वास्तु दोषातून मुक्ती मिळेल.

1. यातील पहिली वस्तू म्हणजे कापूर . अनेक प्रकारच्या पुजेत होम हवनामध्ये या कापराचा वापर केला जातो. आपण जेव्हा आपल्या देवघरात देव देवतांची आरती करतो, तेव्हा त्या आरती मध्ये कापूर आरती चा समावेश नक्की करतो. कापरामुळे घरातील वातावरणही शुद्ध होतं.

पवित्र होतं आणि त्याबरोबरच आपण या कापरामध्ये दोन ते तीन लवंगा जाळल्या आणि संपूर्ण घरात जर आपण तो धूर पसरवला तर वास्तुदोष बर्याच अंशी निघून जातो असं म्हटलं जात. अत्यंत चांगला अनुभव या कापराचा अनेकांना आलेला आहे. तर असा हा कापडाचा वापर आपण घरात करायला हवा ज्यातून आपली वास्तू दोष यातून सुटका होते.

2. दुसरी गोष्ट म्हणजे सुपारी पुजेत आपण सुपारीला गणपती म्हणून मानतो. तसेच गणपती म्हणून तिची पूजा सुद्धा करतो. सुपारी ही पूज्य तर आहेच आणि इतकंच नाही तर तुमच्या घरातल्या वास्तुदोष दूर करण्याचे काम सुद्धा सुपारी करू शकते. जर घरात कुणी आजारी असेल, घरातून आजारपणात जात नसेल तर अशा वेळी आपण सुपारी चा वापर करू शकता.

मात्र काळजी घ्या की देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करताना ती तुटलेली- फुटलेली नसावी, ती नेहमी अखंड असावी. मित्रांनो देवाला जेव्हा आपण सुपारी अर्पण करतो आहोत तेव्हा ती संपूर्ण स्वरूप मध्ये सुपारी अर्पण करायचे आहे. असा नैवेद्य देवाला अर्पण केल्याने आपल्या घरात शांतता निर्माण होते.

इतकेच नाही तर आपल्याला मनःशांती सुद्धा मिळते. मित्रांनो नेवेद्य आपण आपल्या ऐपतीप्रमाणे देवाला द्यायचा असतो. नेवेद्य अर्पण करताना श्रद्धा महत्वाची असते, आपल्या मनातला भाव महत्त्वाचा असतो.

3. तिसरी गोष्ट म्हणजे कलावा किंवा माऊली कलावा किंवा माऊली म्हणजेच आपण स्वतः हातात लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधतो तो धागा. हा धागा जर तुम्ही देवघरात ठेवत असाल तर यामुळे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येतात. जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा तेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जप सुद्धा करावा.

एखाद्या पाठाचे वाचन करावे. मग तो विष्णुसहस्त्रनामा चा पाठ असू द्या किंवा आणखीन कोणता. तसेच गोर गरिबांना दान करणे, यामुळे सुद्धा घरात नेहमी सुखसमृद्धी लागते. घरातील वास्तुदोष कायमचा निघून जातात आणि त्या घरातील लोकांची सतत प्रगती होते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *