नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” वाईट वेळ ही एक अशी स्थिती आहे जी कोणाच्याही जीवनात केव्हाही येऊ शकते. तुमच्या जीवनात सुद्धा कधी ना कधी ही वाईट वेळ आलीच असेल. वाईट वेळ आल्यावर आपण काय करायला हवे? वाईट वेळेसोबत संघर्ष कसा करावा?
असे कितीतरी प्रश्न आपल्या मनात येत असतात. परंतु त्यांचे उत्तर आपल्याकडे नसते. आपल्या अशाच समस्येचे उत्तर आपल्या स्वामी समर्थांनी दिलेले आहेत. तर तुम्हीही वाईट वेळेमुळे खूप चिंतेत आहात. वाईट वेळेमुळे ग्रासलेले आहात. तुमची ही वाईट वेळ तुम्हाला सोडत नाहीये.
किंवा तुम्ही वाईट वेळेत कसे बाहेर यावे याचा मार्ग तुम्ही शोधत आहात. तर ही माहिती तुम्ही संपूर्ण वाचा कारण या माहितीच्या शेवटी तुम्हाला वाईट वेळेतून बाहेर येण्याचा मार्ग मिळू शकतो.
एकदा एक साधू असतो. तो साधू संपूर्ण भारतात भ्रमण करत असतो, आणि धर्माचा प्रचार-प्रसार करत असतो. एकदा तो साधू त्यांच्या काही शिश्यानसोबत जंगलातून जात असतो. खूप वेळपर्यंत भ्रमन केल्यानंतर त्या साधूचा गळा सुकायला लागतो त्यांना पाणी हवे असते.
मग साधू आपल्या एका शिष्याला जवळच्या गावातून पाणी आणायला सांगतात. गुरुची आज्ञा मिळाली म्हणून तो शिष्य जवळच्या गावात पाणी आणायला जातो. गावात गेल्यानंतर त्या शिष्याला समजले की गावात फक्त एक नदी आहे आणि तीच नदी त्या गावाची जलस्त्रोत आहे.
तो शिष्य जेव्हा त्या नदी जवळ पोहोचला तेव्हा त्याने बघितले की काही लोक त्या नदीमध्ये स्नान करत आहेत, काही आपले कपडे धूत आहेत, तर काही आपल्या पशु प्राण्यांना सुद्धा त्या नदीमध्ये स्नान घालत आहेत.त्या नदीचे असे हाल पाहून त्या शिष्यांनी विचार केला.
गुरुसाठी हे पाणी घेऊन जाणे बरोबर नाहीये आणि तो पाणी न घेता असाच खाली हात परत गुरु च्या दिशेने निघाला. साधू ने बघितले कि शिष्या ने पाणी आणले नाहीये. तेव्हा साधूने आपल्या दुसर्या शिष्याला पाणी आणायला सांगितले. काही वेळ गेली आणि तो दुसरा शिष्य माठामध्ये पाणी घेऊन आला हे बघून तो पहिला शिष्य आश्चर्यचकित झाला.
त्याने विचारले की गावातल्या नदीचे पाणी तर खूपच खराब होते, दूषित होते, अस्वच्छ होते, तर तुम्ही हे पाणी कुठून आणले प्रश्नाचे उत्तर देत तो दुसरा शिष्य बोलला जेव्हा मी तिकडे पोहोचलो तर त्या नदीचे पाणी खरंच खूप अस्वच्छ खराब होते पण जेव्हा सगळे लोक आपले काम करून तिथून निघून गेले तर मी थोडा विचार केला आणि मी तिथेच बसलो.
काही वेळेतच पाण्यात मिळालेली सगळी माती नदीच्या तळाला गेली आणि पाणी पुन्हा स्वच्छ झाले आणि तेच स्वच्छ पाणी माठात घेऊन आलो. या शिष्या चे उत्तर ऐकून साधू खूप प्रसन्न झाला आणि बाकी शिष्यांना समजत बोलले जेव्हा आपल्या जीवनात दुःख, समस्या, संकट किंवा वाईट वेळ येते.
तेव्हा आपले जीवन सुद्धा त्या नदीच्या पाण्यासारखे दूषित, अस्वच्छ, खराब होते. परंतु आपण त्या खराब, अस्वच्छ, दूषित जीवनापासून आणि आलेल्या वाईट वेळेपासून हार मानून बसू नये. परंतु धैर्य ठेवून शांत मनाने त्या स्थितीचे आकलन करायला हवे, आणि उचित निर्णय घेऊन आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्यावर अंमल करावे.
कारण धैर्य, शांत मन, निर्णय घेण्याची क्षमता, आणि आत्मविश्वास असेल तर वाईटात वाईट वेळ असली तरी आपण तिला हरवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. या चार गोष्टी तुम्हाला कोणतीही वाईट वेळ दूर करण्यात मदत करतील. जसे त्या शिष्याने त्या चार गोष्टींच्या दमावर खराब पाण्यातून स्वच्छ आणि शुद्ध पाणी घेतले.
तसेच त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या जीवनातील सगळ्यात वाईट गोष्टी, वाईट वेळ, सगळे अस्वच्छ झालेल्या आपले जीवन, सगळी दुःख, सगळ्या समस्या या सगळ्यांसोबत संघर्ष करून चांगले आणि स्वच्छ जीवन मिळू शकतो.
फक्त गरजेचे आहे या चार गोष्टींना आत्मसात करण्याचे तर ज्यांनी हा प्रेरक प्रसंग ज्यांना समाजाला, ज्यांनी याला आत्मसद केला, ते नक्कीच आपली वाईट वेळ दूर करू शकतात.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.