आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुपुत्र पार्थ पवारने पुण्यातील गँगस्टर गजा उर्फ गजानन मारणे याची भेट घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली. कुख्यात गजानन मारणे आणि पार्थ पवारांच्या भेटीची जोरदार चर्चा सर्वच होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी हत्या झाली होती.
दरम्यान, कोखरूड परिसरामध्ये त्याच्यावर गोळ्या झाडून मारून हत्या करण्यात आली. कुख्यात शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना गज्या मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांनी गजानन मारणे याची भेट घेतली आहे, मात्र पार्थ पवार व गजा मारणे यांच्या भेटीचं कारण कारण अद्याप समजले नाही.
तसेच कुख्यात गजानन मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून गजा मारणे त्याची पत्नी आणि पार्थ पवार यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर, नेमकी कोणत्या कारणामुळे भेट घेतली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली असल्याची चर्चा मात्र दबक्या आवाजात होत आहे.
तसेच या भेटीवेळी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे देखील उपस्थित होते. कुख्यात गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून मारणे टोळीचा लीडर असलेल्या गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात असल्याचे सांगितले जाते. तसेच पुण्यात निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यातील टोळीयुद्ध पुण्याला माहिती आहे.
तसेच पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्येस गजा मारणेला अटक झाली असून 3 वर्ष तो येरवड्यामध्ये होता. तसेच गज्या मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा असून दोन्ही टोळ्यांचे म्होरके शरद मोहोळ आणि गजानन मारणे यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात, मात्र आता शरद मोहोळ याची हत्या झाली आहे.
दरम्यान, शरद मोहोळ याच्या खूनाचा मास्टरमाईंड असलेल्या गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याशिवाय, साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांना हाताशी धरत पक्का प्लॅन करत शरद मोहोळची हत्या करण्यात आली. तसेच विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांच्यासह आणखी 10 ते 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गणेश मारणे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले जाते.