…त्यामुळे फक्त लाचार लोकच भाजपसोबत जातील, रोहित पवार यांचं मोठं विधान…

प्रादेशिक

आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि युवानेते रोहित पवारानी सर्वात मोठा दावा केला. आमदार रोहित पवारांनी पुण्यात बोलताना अजित पवार गटावर शाब्दिक हल्ला केल्याचे दिसून आले. तसेच आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणाले? चला तर जाणून घेऊ.. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदार, नेत्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेतला आणि यावर महाविकास आघाडीतून मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली जात आहे.

याच वादाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर जोरदार टीका केली आहे. तसेच नुकताच अजुन ही काही मोठे नेते संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर देताना म्हणाले की, ज्या लोकांनी चुका केल्यात ते भाजपासोबत जातील, असं आमदार रोहित पवार म्हणालेत.

तसेच याचबरोबर, पुण्यातील आंबेगावात झालेल्या नुकसानबद्दल लवकरच भरपाई मिळावी यासाठी आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधव उपोषणाला बसले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी आमदार रोहित पवार गेले होते. त्यावेळी ते माध्यांमासोबत बोलतांना म्हणाले की, जे 2 गट भाजपा सोबत गेलेत. त्यांना विधानसभेला भाजपाच्या चिन्हावरच निवडणूक लढवाव्या लागतील आणि जनता खरा न्याय करेल..

महाराष्ट्रात सद्या सत्तेत असणारे नेते आणि खास करून भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडे पैसा आणि ED आहे. त्यामुळे काँग्रेसचे एक नेते आता भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे आणि आणखीन काँग्रेसमधील नेते आमदार भाजपमध्ये जातील असे सांगितले जात आहे. भाजपाकडून पक्षात घेण्यासाठी अनेक लोकांना दररोज ऑफर येत असून जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला बांधील असतील तेच लोक त्या ठिकाणी राहतील, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.

आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, अजूनही महाराष्ट्रात अनेक स्वाभिमानी माणसं आहेत आणि ती भाजप सोडून इतर पक्षात आहेत. त्यामुळे भाजपचा आणि स्वभिमांनाचा दूर दूर पर्यंत संबध येत नाही. तसेच आज पवारसाहेबांसोबत जे लोक आहेत. ते कोणीही भाजपमध्ये जाणार नाही, याचे आश्वासन देखील रोहित पवार यांनी बोलताना दिले.

आज आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या घरी भेट देवून त्यांच्या निधनाबद्दल सांत्वन केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *