तुमच्यावर आलेली वेळ चांगली कि वाईट कसे ठरवाल।। स्वामी त्या मागे कोणते संकेत देत असतात ।। सविस्तर संकेत जाणून घ्या या लेखात !

कला प्रादेशिक शिक्षण

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी हीच वेळ कोणासाठी तरी वाईट असते. आपण म्हणतो ना कि माझीही वेळ येईल! वेळवर कोणाचेही बंधन नसते. कितीही श्रीमंत व्यक्ती असतील, परंतु त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर त्या व्यक्तीला देखील झुकावेच लागते.

तुम्ही कितीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघतेच असेल. मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही काही चालत नाही. काय परिस्थिती होती आणि आज यांच्यावर कशी वेळ आली आहे. अशी कोणतीच व्यक्ती नसते, ज्याचे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण ह्या तिन्ही वेळा सारख्याच असतील.

जे बालपण कष्टात काढते, त्या व्यक्तीचे तरूण पण हे मजेत जाते. तर यांचे बालपण अगदी मजेत व आनंदात गेले असेल, ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल तर त्यांचा उतार काळ हा कष्टात जातो. यास काही अपवाद देखिल असतात. पण ते फार कमीच.

१.कधी कधी आपण सकाळी उठलं की आपल्याला खूप आनंदी वाटते. आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे भासू लागते. हे या गोष्टीचे संकेत आहे, की तुमची चांगली वेळ आता सुरु होत आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल.

२.काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत पण, पशुपक्षी देखील आपल्याला चांगल्या वेळीचे संकेत देत असतात. जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळीचे निशान आहे. आणि जर एका माकडाने आंबा खाऊन त्याची कोय आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ आता सुरू होत आहे असा याचा अर्थ असतो.घरात धण धान्याची बरकत होते.

३.जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो. तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात झाली आहे.

४.सकाळी आपण घराबाहेर पडल्यावर वाटेत कुठे एखादे लहान बाळ आपणास खळखळून हसताना दिसले तर हा सुद्धा देवा द्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा म्हणजेच संकेत आहे.

५.जर सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल, तर असेच तुमचा आजचा दिवस हा आपलाच आहे. तुम्ही ज्या कामात हात टाकाल ते नक्कीच पूर्ण होईल.

हे आहेत चांगली वेळ येण्याचे संकेत जर तुमच्या बरोबर देखील असे काही होत असेल तर तुम्हाला आता कोणत्या गोष्टीची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. कारण तुमच्यासाठी स्वतः देव इशारा देत आहे की तुमचे आता चांगलेच होईल. आपला देखील “श्री स्वामी समर्थ” यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा असेल श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.

संकट ही वेळ कधी सांगून किंवा बघून नाही येत. माणसाला माहीत नाही की उद्या काय वाढून ठेवले त्याच्या नशिबात. पण हा मनात स्वामींचे विचार असताना चिंता करावी ती कशाची आणि का? मनात असलेले तीन शब्द पुरे आहेत सर्व गोष्टींसाठी आणि ते म्हणजे “श्री स्वामी समर्थ !!!

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *