नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” कधी कधी आपल्या आयुष्यात खूप समस्या येतात.दुःख आणि संकटांनी आपण वेढले जातो.आपल्याला यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सुचत नाही आणि आपण खचून जातो.स्वामी आपल्यासोबत आहेत की नाहीत असे नकारात्मक विचार आपल्या मनात येतात.हे विचार कसे नाहीसे करावे?
यातून कसे बाहेर पडावे? यासाठी स्वामींनी एका खचलेल्या भक्ताला कसा धीर दिला ते आपण आजच्या कथेत पाहणार आहोत. स्वामींसमोर हाथ जोडून एक हताश माणूस उभा होता , डोळ्यांमध्ये पाणी होते, मनामधून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू काही कळतं नाही?
मनामध्ये खूप नकारात्मक विचार येत असतात. प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. त्यावर स्वामी म्हणाले विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत,आशेचे दिवे मंद आहेत. कोणावरही विश्वर ठेवावा वाटत नाही आहे. माणूस विचारतो, आज अस वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही.
उद्या काही छान असेल असाच क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा. जगामध्ये विश्वास आहे? तुमच्याकडे त्याबद्दल काय पुरावा? शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून,विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर, मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो, विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर, बाळ आईच्या कुशीत शांतपणे निजते.
तोच त्या बाळाचं विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो,विश्वास असतो तेंव्हा पुन्हा सकाळी डोळे उघडण्यावर. तू आज माझ्या दारी आलास आपली सगळे दुःखे घेऊन, तुला माझ्यावर विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर.
असाच विश्वास मनात जागव परिस्तिथी बदलते एका क्षणात, नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खर होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. “जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी”.
स्वामी म्हणाले,जिथे मर्यादा संपते तुझी तिथे साथ देतो मी. म्हणून कधीही तुमचा स्वामींवराचा विश्वास डगमगु देवू नका. कितीही वाईट परिस्तिथी आली तरी म्हणायचे ,स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते मला यातून नक्की बाहेर काढतील,नक्की ते माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला माझ्या वाईट परिस्तिथीतून बाहेर काढतील.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.