नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” तुम्हाला तुमचा जन्मवार माहितीच असेल ना. मग चला बघूया की तुमचा स्वभाव कसा आहे. तुमच्या जन्मवार यावरून तुमच्या स्वभावाचा अंदाज लावता येऊ शकतो. इतकेच नाही तर आजची ही माहिती वाचल्यावर तुम्हीसुद्धा तुमच्या अवतीभवती असणारे तुमचे मित्र-मैत्रिणी किंवा तुमचे नातेवाईक किंवा घरातल्या मंडळींच्या स्वभावाचा अंदाज जन्मवारा वरून लावू शकता.
चला तर मग बघुया कोणत्या वारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात. “सोमवार” या दिवशी जन्मलेली व्यक्ति शांत स्वभावाची असते, गोड बोलणारी, आणि त्याचबरोबर व्यवहार ज्ञानी सुद्धा असते. मोठ्यांचे अनुकरण करणारी त्यांच्या आज्ञेत राहणारी, सुखदुःखात समान राहणारी, आणि उदार असते.
“मंगळवार” या दिवशी ज्यांचा जन्म झालेला आहेत. अशा व्यक्ती थोड्याशा बोलघेवड्या आणि बोलण्याच्या नादात खोट ही बोलणाऱ्या आणि भांडण्यात तत्पर मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या आणि शेतीच्या कामात रस घेणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तापट असतात.
“बुधवार” या दिवशी जन्मलेली व्यक्ति रुपवती, गोड बोलून टीकाटिप्पणी करणारी, मस्करी करण्यात हुशार, हरहुन्नरी इतरांचे गुण अवगुण पारख करणारी, आणि व्यवसायिक वृत्तीची असते.
“गुरुवार” या दिवशी जन्मलेली व्यक्ती उत्तम विद्या अभ्यासी, स्वतःच्या इच्छेनुसार वागणारी, मनमिळावू तसेच अक्कलहुशारीने धन कामावनारी असते. थोरांकडून मान सन्मान मिळवणारे सुद्धा असते.
आता वळूया लक्ष्मी मातेच्या वाराकडे अर्थात “शुक्रवारा“कडे या दिवशी जन्मलेली व्यक्ती काळया कुरळ्या केसांची, उत्तम वस्त्र परिधान करण्याची हौस असणारी, सदाचारी मोठ्यांची मानमर्यादा राखणारी आणि उच्च हुद्द्यावर नोकरी करणारी असते.
आता वळूया “शनिवारा“कडे या दिवशी जन्मलेली व्यक्ति अतिशय बुद्धिवान, मंत्र तंत्र विद्येत रस असलेली, मायाळू स्वकर्तुत्वान आणि सर्वांना आवडेल अशी असते.
रविवार या दिवशी जन्मलेली व्यक्ति बहादुर, गहू वर्णी उत्साही, दानशूर आणि इतकी मनस्वी असते की निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होते. मग मंडळी तुमचा जन्म वार कोणता आहे आणि त्याप्रमाणे तुमचा स्वभाव आहे की नाही ते जरूर पडताळून पहा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.