तुळशी जवळ कधीही ठेऊ नका या 5 वस्तू घर बरबाद होईल.।। यामुळे घरात येते गरिबी, माता लक्ष्मी घरातून निघून जाते. ।। तुळशीला प्रसन्न करा आणि श्रीमंत व्हा तसेच घरात सुख, शांती आणि प्रसन्नता कशी वाढवावी याबाबदल अधिक माहिती या लेखात जाणून घ्या !

देश-विदेश शिक्षण

प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरासमोर किंवा घरामध्ये तुळशीचं रोपटं हे असायलाच हवं. तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपलं भाग्य आपलं नशीब प्रबळ बनवते. आपल्या घरावर जे काही संकट येणार असतात ती सर्व संकटे ही तुळस स्वतःवरती घेते. तुळशीचे महत्त्व खूप मोठ आहे.

ज्योतिषशास्त्र असू द्या किंवा वास्तूशास्त्र असू द्या किंवा भारतीय पुरानी असुद्या, प्रत्येकामध्ये तुळशीचं वर्णन गायलेला आहे. आपला भाग्योदय होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैसा खेळता राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणे अत्यंत आवश्यक असतं. आणि या माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्याचे काम ही माता तुळशी करत असते.

मात्र अशा या तुळशीच्या रोपट्याजवळ किंवा तुळशीच्या वृंदावना जवळ काही वस्तू मात्र चुकूनही ठेवू नका. किंवा या तुळशीच्या बाबतीत काही चुका या कटाक्षाने टाळा. जेव्हा या ठिकाणी या चुका होतात त्याठिकाणी माता तुळशी वास करत नाही. आणि परिणामी अशा घरातून माता लक्ष्मी सुद्धा निघून जाते.

आणि मग त्या घरांमध्ये दारिद्र्य निर्माण होत, गरिबी निर्माण होते. त्या घरातील व्यक्तींच जे भाग्य आहे, नशीब आहे ते त्यांना साथ देत नाही असं होतं. चला तर पाहुयात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण तुळशी च्या बाबतीत चुकूनही करू नये. सर्वात पहिली गोष्ट शिवलिंग, बऱ्याच ठिकाणी आपण असे पाहतो की तुळशी वृंदावन मध्ये शिवलिंग ठेवलेलं असतं.

बऱ्याच जणांना असं वाटतं की शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल. त्यांच्या घरासाठी ते खूप शुभकारक ठरेल. मात्र लक्षात ठेवा कधीही चुकूनही कोणत्याही तुळशीवृंदावन मध्ये शिवलिंग ठेवू नका. तुम्ही जे पाहिलेला आहे ते शिवलिंग नाहीये तो शालिग्राम असतो. तुळशीमध्ये आपण शालिग्राम ची स्थापना अवश्य करा.

शालिग्राम आणि शिवलिंग हे दिसायला अगदी सारखी असतात. मात्र शालिग्राम हे भगवान विष्णूंचे रूप आहे. तर शिवलिंग हे महेश म्हणजेच शिव शंभू महादेवाचा रूप आहे. आणि आपल्याला माहीत असेल की तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि आपण शालिग्रामची स्थापना करा.

आपल्याला खूप सारे फायदे होतील, खूप शुभ परिणाम त्याचे घडतील. शिवलिंग मात्र ठेवू नका त्याचे खूप नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती निर्माण होतात. दुर्भाग्य आपल्या नशिबामध्ये निर्माण होतं. दुसरी गोष्ट गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशीच्या जवळ लावू नका.

बऱ्याचदा अनेकांचं असं होतं की जी घराची चौकट आहे त्या ठिकाणी गणपती लावलेला असतो. आणि मग अगदी जवळच त्या ठिकाणी हे तुळशीचे रोपट लावलेलं असतं. अशा प्रकारची चूक करू नका, याचं कारण असं आहे की गणपतीने म्हणजेच गणेशाने तुळशी मातेला श्राप दिला होता, की तू माझ्या जवळ कधीही येऊ शकणार नाहीस.

ती कथा अत्यंत मोठी आहे, ती कथा आपण आता नाही पाहणार आहोत. मात्र लक्षात ठेवा की गणपती मध्ये आणि माता तुळशीमध्ये कमीत कमी दोन हातांचा अंतर तरी नक्की ठेवा. तिसरी गोष्ट आपण बऱ्याच काय करतो की आपल्या घरातील जो काही कचरा असतो तो एकत्र गोळा करून आपल्या आपल्या दारा मध्ये आणून ठेवतो.

किंवा बऱ्याचदा अस होत की आपले जे तुळशीवृंदावन आहे ते आपल्या अंगणामध्ये असतं, दरवाजाच्या समोर असत. आणि मग सगळा कचरा गोळा करून त्या वृंदावना जवळ, त्या तुळशी जवळ नेहून साठवला जातो. आणि मग नंतर तो गोळा करून टाकला जातो. तुळशी वृंदावन जवळ कधीही कचरा साठवू नका.

ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. किंवा तुळशीजवळ कचरा पडू देऊ नका. तुळशीजवळ जितकी स्वच्छता आपल्याला राखता येईल, जितकी सात्विकता आपण राखु तितका जास्त फायदा आपल्याला होईल. कचरा त्या ठिकाणी साठल्याने एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

आणि माता तुळशी असूद्यात किंवा इतर कोणतीही देवता असू द्या त्यांना अस्वच्छता अजिबात प्रिय नसते. आणि म्हणून अशा ठिकाणी माता तुळशी जास्त वेळ राहत नाही. तुम्ही पाहिले असेल की काही काही घरांमध्ये तुळशीचं रोपटं सुकू लागत. तुम्ही कितीही काळजी घेतली तरी सुद्धा हे रोपटं सुकू लागत.

या पाठीमागचा हेच आहे की अशा तुळशीच्या रोपट्या मधून माता तुळशी निघून जाते. आणि मग ते रोपटं सुकू लागतं. आणि म्हणून काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या आहे या गोष्टी अगदी कटाक्षाने तुम्ही त्यांचे पालन करा. पुढची गोष्ट बरेच जण ओले कपडे, कपडे धुतल्यानंतर त्या ठिकाणी सुकायला टाकतात, कपडे वाळायला घालतात, तर असे हे कपडे जर तुम्ही वाळायला घालत असाल तर हे कपडे माता तुळशीजवळ जाणार नाहीत याची काळजी घ्या.

किंवा तुळशीजवळ ते कपडे वाया घालू नका. बरेच ठिकाणी अस ही होतं की या कपड्याचं पाणी हे त्या तुळशी वरती ठीपकत असतं. किंवा या कपड्यांची सावली ही आपल्या तुळशीच्या डोक्यावर पडत असते. अशा प्रकारच्या चुका करू नका. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते.

पुढची गोष्ट की आपल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, बरेच जण दारासमोर जागा नसते, अंगण नसतं. ज्यांचा फ्लॅट आहे किंवा जे बंगल्यामध्ये राहतात, की समोर जागा नाहीये, तर प्रॉब्लेम असेल तर आपल्या घरांमध्येच किंवा आपल्या घरावर जे छत असत. त्या छतावरती तुळस लावली जाते. किंवा जी काही आपली टेरेसची जागा असते.

किंवा बरेच जन बाल्कनी सुद्धा आधार घेतात. बाल्कनीमध्ये सुद्धा रोपट लावतात. काही अडचण नाही तुम्ही कुठेही हे रोपट लावू शकता. अंगणामध्ये लावाल तर सर्वात चांगला आहे. कारण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपल्या तुळशीचे रोपटे असायला हवं. मात्र जर तुमचा नाईलाज असेल तर तुम्ही इतर ठिकाणी ते रोपट लावू शकता.

शक्यतो उत्तर दिशा आणि पूर्व दिशा. आपल्याला जी उत्तर आणि पूर्व दिशा आहे त्या ठिकाणी हे लावण्याचा प्रयत्न करा. अत्यंत शुभ अशा प्रकारची फळं त्यामुळे मिळतात. जर तुम्ही तुमच जे छत आहे त्यावरती जर तुळशीचं रोपटं लावलं असेल, आणि त्याच्या जवळ पाण्याची टाकी असेल, तर लक्षात ठेवा पाण्याच्या टाकी पासून आपलं रोपट हे कमीत कमी चार ते पाच हात लांब असावे, याची काळजी नक्की घ्या.

किंवा या पाण्याच्या टाक्याची सावली सुद्धा आपल्या तुळशीच्या रोपट्या वरती पडू देऊ नका. अत्यंत नकारात्मक अशा प्रकारचे परिणाम त्यामुळे घडत असतात. बऱ्यासशा ठिकाणी असे पाहतो की स्त्रिया आपले केस विंचरत असतात. आणि मग हे जे केस आहेत हे इकडे तिकडे विखुरले जातात. वाऱ्याने इकडे तिकडे पसरतात.

किंवा मग अशा स्त्रिया हे जे केस एकत्र करून कुठेतरी नेऊन ठेवतात. तर असे हे केस ठेवताना ते तुळशी जवळ ठेवू नका. किंवा आपले जे केस इकडे तिकडे उडतात, ते उडून वाऱ्याने तुळशीच्या रोपट्यावर जाऊन सुद्धा पडतात. किंवा बऱ्याचदा अस होत की तुळशीच्या रोपट्यामधे जावून फसतात. तर ही एक अत्यंत अशुभ अशा प्रकारची घटना आहे.

आपले केस हे माता तुळशीजवळ जाता कामा नये. केसांना अत्यंत अशुभ असं समजलं जातं. आणि म्हणून असे हे वृत्त केस आपण तुळशीजवळ जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. बऱ्याच ठिकाणी देवपूजा करताना जी घंटी वापरली जाते, किंवा पाणी घालताना जो तांब्या वापरतात.

तर तुळशीला पाणी घालतात, आणि मग तो तांब्या त्याच ठिकाणी त्या रोपट्या जवळ ठेवला जातो. किंवा ते जे वृंदावन आहे, त्या वृंदावनामधे घंटी आणि तांब्या ठेवला जातो, असं करू नका. घंटी आणि तांब्या त्या ठिकाणी ठेवू नका. त्यासाठी आपण वेगळी जागा करावी. कारण धर्मशास्त्रानुसार हे अमान्य आहे. आणि मित्रांनो शेवटची गोष्ट चपला किंवा बूट.

बरेच जण जे काही वृंदावन आपल्या घरामध्ये असते किंवा बाहेर असतं. तर त्याच्याजवळ चपला नेऊन ठेवतात, असं करू नका. ही एक अत्यंत पवित्र अशा प्रकारची जागा आहे, पवित्र अशा प्रकारच स्थान आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी चपला नेणं, बुट नेण कटाक्षाने टाळा. तर अशा गोष्टींची काळजी घ्या माता लक्ष्मी, माता तुळशी, भगवान विष्णू आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *