नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” तुळशीला किती महत्त्व आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. दररोज तुळशीच्या झाडाला जल अर्पित करून पूजन केल्याने, तुळशीसमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच आर्थिक स्थिती सुधारते घरात भरभराटी येते.
तुळस आरोग्यासाठी तर उत्तम आहेच तसेच तुळशीमुळे घरात भरभराटी येते. हे जर आपल्याला माहीत नसेल तर जाणून घ्या सोपे उपाय ज्यामुळे आपण नोकरीत असाल या व्यवसायात आपल्याला यश नक्कीच मिळेल. सर्वात आधी जर सांगायचे तर तुळशीचे आठ नावे सांगण्यात आले आहे.
ज्याचा जप करणे अत्यंत फलदायी ठरतं. वृंदा वृंदावनी विश्वपुजिता विश्वपावनी।पुष्पसारा नंदनीच तुलसी कृष्ण जीवनी।। तुळशीचे हे आठ नाव जपल्याने अक्षयफळ प्राप्ती होते. तसेच सकाळी स्वतः आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घातल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात.
समस्या सुटतात भौतिक सुखाची प्राप्ती होते. नोकरी आणि व्यवसाय संबंधी काही अडचणी असल्यास त्या देखील दूर होतात. तसेच दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालावी. दररोज शक्य नसल्यास किमान एकादशीला हे नियमाने करावे.
याने कुटुंबातील प्रेम टिकून राहतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तुळस किती पवित्र आहे हे तर आपल्याला माहीतच असेल. याने जल, अन्न, स्थळ सर्व शुद्ध होतात. ग्रहणात पाणी, धान्यात, दुधात तुळशीचे पाने घालून ठेवल्याने त्यावर ग्रहणाचा प्रभाव पडत नसतो असे मानले गेले आहे.
म्हणूनच श्री विष्णू यांना नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पान ठेवावे. तसेच धर्मशास्त्रानुसार मृत्युनंतर देखील मृतकाच्या मुखात तुळशीचे पान ठेवल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते. आता उपायाबद्दल बोलु. खूप प्रयत्न करून देखील व्यवसाय किंवा नोकरीत मनाप्रमाणे यश मिळत नसेल, तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे.
आपण हा उपाय गुरुवारी कोणत्याही शुभ दिवसाला देखील करू शकतात. या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या तुळशी जवळ असलेले गवत घेऊन पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधायची आहे. आणि हे आपल्याला तिजोरी, लॉकर व्यवसायातील गल्ला, किंवा किमतीचे दागिने किंवा वस्तू ठेवत असलेल्या जागेवर ठेवायच्या आहेत.
निश्चितच प्रगती होईल. आपल्याला संतांकडून सुख मिळत नसेल तर रविवारी तुळस तोडू नये म्हणून इतर दिवशी तुळशीचे तीन पाने तोडून संतानाला खाऊ घातल्यास संतान आपल्याला सांगण्यात राहील. तसेच तुळशीचे पूजन करताना आपल्याला सवासना दिसल्यास तीला लक्ष्मी स्वरूप म्हणून तुळशीचे वाहिलेले कुंकू लावावे.
आणि तेच कुंकू आपल्या संतानाला देखील लावावे. याने त्याची वागणूक चांगली होईल. वाईट संगत असल्यास ती दूर होईल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचे झाड पूर्व दिशेकडे असावे. असे करणे शक्य नसल्यास उपाय करण्याचे दोन दिवसापूर्वी तरी झाडाची दिशा परिवर्तित करून ठेवावी.
तसेच ज्या कन्येचा विवाह योग येत नसेल तर तिने दक्षिण पूर्व दिशेत तुळशीचे झाड ठेवून पूजन करावे विवाहाचे योग जुळून येतील.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.