तृतीय पंथीयांचे अंत्यविधी कसे होतात ?।। सर्वसामान्यांना ते पाहू का देत नाही ? ।। अंत्यविधी पाहिल्यावर काय होते ? ।। याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !

कला प्रादेशिक शिक्षण

तृतीयपंथी व्यक्तीच्या मृत्यूनंतर लोकांच्या नकळत त्यांचे अंत्यविधी केले जातात. जर कोणी पाहिले तर त्याच्यासोबत काय केलं जातं? तर मग पाहूया सविस्तर माहिती. तृतीयपंथी म्हटलं की सिग्नल पासून रेल्वे स्टेशन पर्यंत सगळीकडे टाळ्या वाजवत मोठ्या आवाजात बोलत कोणाला शिव्या तर कुणाला आशीर्वाद देत, पैसे मागणारे चेहरे डोळ्यासमोर तरळतात.

पूर्वी प्रत्येक शुभ प्रसंगी म्हणजे लग्न किंवा मुंजीच्या कार्यक्रमात तृतीयपंथींना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून बोलावलं जायचं. आज काल याचे प्रमाण कमी होऊ लागला आहे. पण छोट्या शहरात अणि गावांमध्ये अजूनही तुतीय पंथीच्या आशीर्वादाला एक महत्त्वाचं स्थान आहे.

तृतीयपंथी काळानुसार हळूहळू सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळू लागले आहेत. शिकत आहेत, वेगळे काम धंदे करत आहे. तरीही त्यांचे एक वेगळे विश्व आहे. त्यांचे रूढी, मान्यता, परंपरा सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे आहेत. त्यापैकीच एक आहे. तृतीयपंथीयांचा अंत्यविधी.

तुम्ही तृतीयपंथीयांची अंत्ययात्रा पाहिली नसेल कारण त्यांचा अंत्यविधी मध्यरात्री एका विशिष्ट पद्धतीने केले जातात कसे केले जातात. त्यांचा अंत्यविधी आणि सर्वसामान्य माणसाने ते पाहिले तर काय होते? जाणून घेऊया सविस्तर. अशी मान्यता आहे की बऱ्याच तृतीयपंथिंकडे अध्यात्मिक शक्ती असते.

त्यामुळे मृत्यूच्या पूर्वी त्यांना मृत्यूची जाणीव झालेली असते. मृत्यू येणार हे कळल्यानंतर तृतीयपंथी बाहेर फिरणं सोडून घरात बसून राहतात. अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन देवाकडे स्वतःसाठी आणि इतर तृतीयपंथी समुदायासाठी प्रार्थना करतात, की पुढचा जन्म आम्हाला तृतीयपंथी मिळू नये.

जवळपास राहणारे सर्व तृतीयपंथी काहीच दिवस शिल्लक असणाऱ्या तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीला भेटायला येतात. अशी मान्यता आहे की मृत्युपूर्वी त्या तृतीयपंथी ने दिलेले आशीर्वाद खूप लाभदायक असतात. तृतीयपंथी समुदाय त्यांच्या शिवाय कुठल्याही सामान्य व्यक्तीला तृतीयपंथी तिच्या मृत्यूबद्दल कळणार नाही याची काळजी घेतात.

अगदी जिथे पार्थिव जमिनीत पुरायच असत तेथील अधिकाऱ्यांना देखील ही माहिती गुप्त ठेवण्याचे आदेश दिले जातात. मृत्यूत्पश्चात अंत यात्रेपूर्वी मृत शरीराला इतर तृतीयपंथी चपला बुटांनी मारतात. शिव्या देतात. जेणेकरून मृत तृतीयपंथी व्यक्तीने आयुष्यात काही अपराध केले असतील, तर त्याचं प्रायश्चित्त व्हावं.

आणि पुढचा जन्म त्याला सामान्य मनुष्याच्या मिळावा.अंत्ययात्रेत तृतीयपंथी व्यक्तीला चार खांद्यावर घेऊन जात नाहीत. त्यांच्या परंपरेनुसार शव उभं करून नेले जात. अंतयात्रा मध्यरात्रीनंतर असते. त्यांच शव जाळण्याऐवजी पांढर्‍या कपड्यात गुंडाळून जमिनीत पुरल जात.

त्या आधी त्यांच्या तोंडात एखाद्या पवित्र नदीचे पाणी देऊन विधी आटपून मग नंतर शव जमिनीत पुरतात. तृतीयपंथीय समुदायाचे अशी मान्यता आहे त्यांचा अंत्यविधी सर्वसामान्य लोकांनी पाहू नये. जर यदाकदाचित ते कोणी पाहिले तर मृत तृतीयपंथीला पुढचा जन्म तृतीयपंथीचाच मिळतो.

तृतीयपंथी आयुष्यात खूप अडचणींना सामोरे जातात. आयुष्यात रोज वाईट आणि दुःखद सोसाव लागत. म्हणून त्यांना स्वतःहा तृतीयपंथी असण्याचा खूप तिटकारा असतो. त्यांची मनोमन हीच इच्छा असते की मला किमान पुढचा जन्म तरी तृतीयपंथी मिळू नये.

सर्वसामान्य माणसांनी त्यांची अंत्ययात्रा पाहिली तर त्यांच्या भावना दुखावल्या जातात आणि ते अंत्ययात्रा पाहणाऱ्या माणसावर लाथा बुक्क्यांचा वर्षाव करतात. असं म्हटलं जातं सर्व अंत्यविधी नंतर तृतीयपंथी समुदायातील वयोवृद्ध एक आठवडा उपवास करतात आणि मृत्यू तृतीयपंथी च्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *