थर्टी फर्स्टला सरकार जोमात, नागरिक कोमात!!!

Pune

नवीन वर्षाची सुरुवात नुकतीच झाली आहे तसेच यावेळी 31 डिसेंबरची पार्टी साजरी करण्यासाठी अनेक लोक लोणावळा शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जात असल्याचे दिसून आले, तसेच काही ठिकाणी तर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॉपिक जाम असल्याचे दिसून आले. याशिवाय, या दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन नागरिकांवर कारवाई करतांना मात्र कोणतीही तडजोड केली नसल्याचे दिसून आले.

कारण 31 डिसेंबर रोजी तब्बल 362 जणांना शहर पोलिसांनी दंडाची कारवाई केली असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, 30 व 31 डिसेंबर रोजी हॉलिडे तसंच वर्षाची सांगता करण्यासाठी अनेक लोकांनी पर्यटन ठिकाणी जाण्याचा बेत आखला. या वेळी लोणावळा तसेच आसपासच्या ठिकाणी पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून आले, कारण ट्रॉपिक पोलिसानी उल्लंघन करण्याऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल 2 लाख 61 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला.

दरम्यान 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी अनेक लोकांनी लोणावळ्यात गर्दी केली होती. वाहतुकीस अडथळा, तसेच वाहन परवाना जवळ न बाळगणे, नो एन्ट्री, तसेच याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करत विरुद्ध दिशेने वाहन चालवणे तसेच दारूच्या नशेत वाहन चालवणे, असे प्रकार करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलन मशीनद्वारे ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच या घटनेची माहिती देत असतांना लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक व पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे सहायक उपनिरीक्षक रमेश भिसे, अनिल शिंदे, सचिन कडाळे, अमोल फाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याचे सांगितले. तसेच लोणावळ्यात वाहतूक नियोजनासाठी नगरपरिषद याशिवाय वॉर्डन, पोलिस मित्र व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी यांचीही मोठ्या प्रमाणात मदत लाभली असेही ते बोलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *