..तर फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवार संतापले..

Pune प्रादेशिक

काल दिवसभर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या 6 कार्यालयावर ईडीने छापा मारला. 7 ते 8 तास ही छापेमारी सुरू होती. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार हे परदेशात असतानाच ही छापेमारी सुरू झाली. या छापेमारीबद्दल आमदार रोहित पवार यांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या 6 कार्यालयावर 5 जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली. तब्बल 7 ते 8 तास ही छापेमारी सुरू होती. यादरम्यान, या छापेमारीवर रोहित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त करत परदेशातून येताच रोहित पवार यांनी लगेच तातडीने पत्रकार परिषद बोलावली आणि सरकारवर हल्लाबोल करायला सुरू केला.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, तुम्ही ज्या लोकांवर आरोप करता आणि ज्यांचे घोटाळे बाहेर काढता त्या लोकांचे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या घोटाळ्याचं काय होतं?. तसेच आमच्या कंपन्यांवर ईडीची छापे पडले मात्र अश्याने मी घाबरणार नाही, असेही ते म्हणाले. याचबरोबर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहरात असताना दिवसाढवळ्या गँगवार झाला. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

तसेच यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी चुकीचं केलं असतं तर मी काल संध्याकाळी परदेशातून आलोच नसतो. अजून 10 ते 15 दिवस बाहेर राहिलो असतो. या आधी ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई झाली ते एक तर दिल्लीला गेले किंवा सत्ताबदल झाल्याचं तरी आपण पाहिलं आहे. तसेच अधिकाऱ्यांचं काहीही चुकलं नाही. त्यांना जे सांगितलं जातं तेच ते करतात. याचबरोबर, ते कागदपत्रं तपासतात आणि जातात, असं रोहित पवार म्हणाले.

तसेच रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर टीका करत म्हणाले की, ज्या दिवशी असता तुम्ही पुण्यात असता त्या दिवशी शहरात उघड उघड दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहेत. त्यामुळे लोकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास उडत चाललं आहे. तसेच आजच्या परिस्थितीत देशांतील सर्वात खराब पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्रात आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्यावर कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त गृहमंत्रीपद पाहावं आणि तिथे तरी न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *