स्वामींसमोर संकल्प करून हातात लाल दोरा बांधा ।। स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील ।। सविस्तर वाचा या लेखात !

कला प्रादेशिक शिक्षण

श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” भक्तहो डिसेंबर महिन्यात श्री दत्त जयंती येत असते. ह्या दिवशी तुम्ही स्वामींसमोर संकल्प करून हातात बांधा असा एक लाल दोरा….! ज्या संकल्पामुळे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील. प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून तुमचे रक्षण करतील.

या डिसेंबर मध्ये श्री दत्त जयंती आहे, दत्तजयंती म्हणजे स्वामींचा दिवस.या आधीचे जेवढे दिवस येणारे असतात ते दिवस सुद्धा महत्वाचे असतात. परंतु दत्त जयंती चा दिवस हा अत्यंत महत्वाचा अत्यंत मोठा दिवस मनाला जातो. स्वामी सेवेकरी यांसाठी आणि स्वामी भक्त यांसाठी देखील.

तर तुम्ही दत्त जयंती या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हातपाय तोंड धुऊन स्वामींच्या मूर्ती समोर किंवा आपल्या देवघरासमोर बसा. सगळ्यात आधी तुम्हाला एक लाल दोरा आणायचा आहे. तो लाल दोरा पूजेचा दोर असतो. तो सत्यनारायण मध्ये वापरला जातो.

पूजा असते त्यामध्ये वापरला जातो. हा दोरा आपल्याला कोणत्याही पूजा सामग्री च्या दुकानात मिळेल. लाल असेल किंवा रंगीबिरंगी असेल, पिवळा,लाल,नारंगी आशा प्रकारचा हा दोरा पाच, दहा रुपयाचा थोडा तुम्हाला आणायचा आहे. तो दोरा आणल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी दत्त जयंती दिवशी देवघरासमोर बसायचं आणि स्वामींच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे.

दोरा ठेवल्यानंतर अगरबत्ती दिवा लावयाचा आणि सगळ्यात आधी आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायच. पाणी घेतल्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती बोलायची. जी अडचण आहे ती बोलायची. त्यानंतर स्वामींना हातात पाणी घेऊनच प्रार्थना करायची की, हे स्वामी समर्थ महाराज आम्हाला या दुःखातून या संकटातून, अडचणीतून, बाहेर काढा आणि आमची इच्छा पूर्ण करा.

आमच्यावर तुमची कृपा करा. एवढं सगळं बोलून झाल्यानंतर ते पाणी तुम्ही एका ताटात सोडायचा आहे. ते सोडल्यानंतर तुम्ही जो दोरा ठेवलेला आहे. त्यावर तुम्ही अष्टगंध,अक्षदा, आणि फुले वाहून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर तो जो दोरा आहे तो उजव्या हातात बांधायचा आहे.

म्हणजेच तुम्ही जर पुरुष असाल तर त्यांनी उजव्या हातात बांधायचा आणि महिला असतील तर महिलांनी आपल्या डाव्या हातात बांधायचे आहे. ज्या व्यक्तीने हा उपाय केला ज्या व्यक्तीने स्वामीं समोर बसून संकल्प सोडला, त्याच व्यक्तीने हा दोरा बांधायचा आहे.घरातील सगळ्यांनी हा दोरा नाही बांधला तरी चालतो.

पण घरातल्या मुख्य महिलेने, मुख्य पुरुषाने कमावणाऱ्या पुरुषाने कमावणाऱ्या महिलेने अवश्य बांधायचा आहे. घरातल्या होणाऱ्या पुरुषाने दोरा बांधायचे आहे.अशारितीने तुम्ही हा संकल्प सोडून आणि संकल्पाचे पाणी तुम्ही नंतर तुळशी मध्ये टाकायचे आहे. आणि आपण हातात बांधून ठेवा पुढच्या श्री दत्तजयंती पर्यंत.

दत्त जयंती येईल तेव्हा येईल तेव्हा तुम्ही तो दोरा सोडून तुम्ही तुळशीमध्ये ठेऊ शकता, किंवा वाहत्या पाण्यात त्या दोऱ्या चे विसर्जन करू शकता. आणि याच पद्धतीने नवीन दोरा आपल्या हातात बांधू शकतात. भरपूर लोकांचे प्रश्न असतात दोरा बांधल्यानंतर आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही?

तर भक्तहो खाऊ शकता. हा गुरू करण्याचा दोरा नसतो. संकल्प सोडण्याचा दोरा असतो. गुरू केल्याने आणि दोरा बांधल्यानंतर आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही. तर हा दोरा गुरू केलाच नाही तू हा फक्त संकल्पाचा दोरा आहे. ज्यांची इच्छा असेल ते आपल्या परीने करू शकते.

ज्यांना नाही खायचे ते नाही खाऊ शकत ज्यांना खायचे ते खाऊ शकतात. असा काही नियम नाही की दोरा बांधल्यानंतर खायचे नाही. हे आपल्यावर आहे तर नक्की हा डोरा दत्त जयंती दिवशी तुम्हाला हातात बांधायचा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *