स्वामींनी जीवनाबद्दल विविध उपदेश केलेले आहेत।। स्वामींनी सांगितलेले जीवनाच्या संबंधित आठ उपदेश।। वाचा या लेखात !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

स्वामींनी जीवनाबद्दल विविध उपदेश केलेले आहेत. या आधुनिक जीवनातही हे उपदेश कामी येवू शकतात. अशेच आठ उपदेश स्वामींनी आपल्याला सांगितले आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनातील विविध अडचणी पासून तुम्ही दुर राहू शकता. तर पाहूया कोणते असे उपदेश आहेत जे स्वामी सांगतायेत.

1. धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या आणि सज्जन ज्ञानी लोकांची खिल्ली उडवणार्‍या लोकांचा विनाश लवकर होतो. जे लोक सज्जन लोकांची चेष्टा करतात, तर नेहमी अपयश त्यांच्या पदरात पडत असते. सज्जन लोक्काना आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असते, उलट आपण त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.

2.खोटं बोलने किंवा कोणत्याही खोट्या गोष्टीला समर्थन देणे. एक असे अज्ञान आहे त्यामध्ये बुडालेले लोक कधीही खरे ज्ञान किंवा यश प्राप्त करू शकत नाहीत. आपल्याला लहानपणापासून सांगत आलेले आहेत कि खोटे बोलू नये. खोटे बोलल्याने अनेक वेळा सत्य लपवण्यासाठी एक झाले कि एक खोटे हे बोलावे लागते.

3.जे काम केल्याने पुण्या ची प्राप्ती आणि इतरांचे भले होत असेल ते काम करण्यात उशीर करू नका. मनामध्ये असे काम करण्याचा विचार आला लगेचच ते काम करून टाका. बऱ्याच वेळा स्वामी आपल्याला संधी देत असतात. ती संधी आपल्यासाठी योग्य आहे हे समजलेलं पाहिजे. आपण संधी ओळखून लगेचच कृती केली पाहिजे.

4.पृथ्वीवर चांगले ज्ञान, शिक्षण हेच स्वर्ग असून वाईट सवयी आणि अज्ञान नरक आहे. अज्ञानाने माणूस आणखीनचं अडाणी बनतो असतो म्हणतात. आपण नेहमी चांगले शिक्षण घेतले पाहिजे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे.

5. मोह, हव्यास माणसाला कधीही असू नये. व्यक्तीला मृत्यू कधी येईल हे हि सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे चांगले जागून घ्यावे. त्यामुळे आपण सतत हसत आणि खुश राहिल्याने तो माणूस दीर्घायुष्य तर होतोच परंतु तो सुखी जीवन प्राप्त करतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहा.

6.पुण्यकर्म अवश्य करावे, परंतु त्याचा देखावा करू नये. जो व्यक्ती समाजामध्ये लोकांनी आपले कौतुक करावे यासाठी पुण्यकर्म करतो त्याला त्याचे शुभ फळ कधीच प्राप्त होत नाही. आपण जे काही चांगले काम करतो, त्याचा आढावा आपले स्वामी नक्कीच घेत असतात. आणि आपल्याला त्या चांगल्या कामाचे फळ देखील मिळत असते. आपण जर केलेले काम बोलून दाखवले तर केलेल्या कामाचा काहीच उपयोग होत नाही.

7.सर्वांना समान वागणूक आणि सन्मान देणारा तसेच इतरांबद्दल मनामध्ये प्रेमाची भावना ठेवणारा व्यक्ती जीवनात सुख प्राप्त करू शकतो. आपल्याला लहानपणापासून आपल्या घरी सांगण्यात आले आहे कि, सर्व लोकांशी प्रेमाने आणि नम्रतेने बोलावे. असे केल्याने त्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्याला सुख प्राप्त होते.

8.स्वतःचे मन आणि इंद्रिय वष मध्ये ठेवणाऱ्या मनुष्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. अशा लोकांच्या मनामध्ये इतरांचे सुख धन पाहून वाईट विचार येत नाहीत.  हे होते ते आठ उपदेश स्वामींनी आपल्या जीवनाच्या संबंधित सांगितलेले. हे उपदेश तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारा आणि तुमच्या सर्व अडचणी दूर करा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *