स्वामींची सेवा कशी करावी ? आपली इच्छा त्यांच्यापर्यंत कशी पोहचवावी !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यावरून आजचा आपला स्वामींचा संदेश असणार आहे. आपल्या भारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये हिमालया जवळ एक “जोशीमठ” म्हणून एक सुंदर ठिकाण आहे. त्या ठिकाणी पूर्वी एका उंच पर्वत शिखरावर एक ऋषीमुनी तप करत असायचे.

खूप उंच पर्वत असायचा त्याला १००१ पायऱ्या चढून जावे लागतील तेवढ्या उंचावर बसलेले असायचे. तिथेच राहून ते तप, साधना वैगेरे करायचे आणि ते पर्वताच्या पायथ्याशी त्यांनी आपल्या एका शिष्याला बसवलेल. तिथे आश्रम वैगरे थाटून तो शिष्य बसलेला असायचा. ह्या ऋषीमुनींची कीर्ती ऐकून अनेक लोक त्यांना भेटायला यायचे.

पण खाली बसलेला जो शिष्य हा काय करायचा, त्याला लोक दिसले वरती जाताना की हा त्यांच्या जवळ जायचा आणि त्यांना त्या ऋषी मुनीं बद्दल काय काय वाईट साईट सांगायचा. की काय कशाला वरती जाता एकदम मुर्ख माणूस आहे तो. काही त्याला येत नाही, मी एवढा वीस वर्ष त्याच्या जवळ होतो मला काही मिळालं नाही.

उगाच तुम्ही जात आहे त्यापेक्षा माझ्याकडे या बघा सगळं सगळं मिळेल. तुम्हाला काय वरती जात बसू नका, अस तो काम करत असायचा. जे लोक त्याला वरती जाताना दिसतील त्यांच्या मन खराब करायचा. काही वैतसाईट भरावायचा अस त्याच काम चालू असायच. बरीचशी लोक त्याचं हे सगळं बोलणं ऐकून परत घरी निघुन जायचे.

पण एकदा एक सज्जन माणूस ऋषीमुनींन पर्यंत वरती पोहचतो.आणि पोहोचल्यावर तो त्यांना म्हणतो की काय हे गुरुदेव काय तुमचा तो खाली बसलेला शिष्य आहे. तो काय काय लोकांना तुमच्याबद्दल वाईट साईट सांगतो. हे ऐकून ते ऋषीमुनी खुपमोठ्याने छान मोकळे हसतात.

आणि त्याला बोलतात अरे मीच त्याला बसवलाय तिथे. हे ऐकून त्या मनुष्याला खूप आश्चर्य वाटत.तेव्हा ते ऋषी मुनी त्याला म्हणतात की, आरे मी काय केलंय हा मी एक फिल्टर बसवला आहे. म्हणजे बघ, अनेक लोक मला रोज भेटायला येत असतात. माझाही आता वय झालाय रे… मी कुठे एवढा त्रास काढत बसू.

आणि लोकांना फिल्टर करत बसू. ज्याची खरी मानापासून माझ्यावर श्रद्धा आहे, जे त्यांन संगीतल्यावरही त्याच मन अजिबात विचलित होत नाही. तेच इथपर्यंत पोहचतात. आणि मी सुद्धा अशाच लोकांना शिष्य म्हणून स्वीकारतो.आणि त्याला सांगतात श्रद्धा महत्त्वाची.आणि ती जो खाली शिष्य बसलेला आहे, ना तोही साधासुधा नाही रे.

त्या शिष्याला पण हे कार्य निभावण्यासाठी किती ताकद पाहिजे. जस की सामान्य माणसाला त्याच काही नसतं वाटलं पण हा जो गुरू आहे तो आध्यात्मिक माणूस आहे त्यानं आपल्या गुरूला शिव्यागाळ करण गुरूंबद्दल वाईट साईट बोलायला मन मजबूत पाहिजे. त्यामुळे तो शिष्य सुध्दा उच्च कोटींचा शिष्य आहे.

त्यामुळं या गोष्टीतून ऋषीमुनी त्याला सांगतात की मनातील श्रद्धा महत्त्वाची, ती केव्हाही ढळू द्यायचे नाही. ती जितकी श्रध्दा मजबूत तितकंच त्याच चांगलं फळ मिळेल. मित्रांनो आपण सुद्धा बघा नेहमी ऐकतो पाहत असतो आपली स्वामींवर दृढ श्रध्दा हवी, विश्वास हवा, पूर्ण समर्पक भावना हवा.

पण,म्हणजे नक्की काय? हा भाव कसा आणायचा?तर एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात घेयला हवी. की बरेच जण अस करतात की आपल्या जो मनातील भाव आहे स्वामींबद्दल जी श्रद्धा आहे, की काय करतो आपण की आपल्या इच्छांशी आपल्या अपेक्षांशी आपल्या विशिष्ट इच्छेशी आपण ती जोडतो.

म्हणजे ना एखाद्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळावी अशी त्याची इच्छा असेल तर मग त्यांना सतत स्वामी असं झालं पाहिजे, स्वामी मला मिळालेच पाहिजे, स्वामी हे माझी अशी इच्छा आहे. सातत्याने त्याचे तेच चालू असते,सतत त्याच त्यावरच लक्ष आणि मग काय होतं की ती गोष्ट कशी झाली नाही त्याच्या मनाप्रमाणे की मग श्रद्धा डळमळीत होते आणि त्यांचा विश्वास कमी होतो.

की मग मी एवढं केलं, सगळं केलं,तरी मला मिळाला नाही आणि मग त्यांच्या मनात ही नकारात्मक शिरकाव करते, विश्वास कमी होतो. मग जरी ते चांगलं झालं तरी तुमची इच्छा, नाही झालं तरिही स्वामींची इच्छा. असे मानून त्याची स्वामींवरची जी श्रद्धाआहे ती मजबूतच राहते.

पण होत कस की आपण जी स्वामींची एखादी इच्छा मनात धरतो की हे असं व्हायला पाहिजे तेंव्हा आपल्याला असं वाटत असते की हे असं झालं तर मग मी आनंदी होईन, सगळे प्रॉब्लेम्स सुटतील,सगळं काही छान होईल, सगळं मार्गी लागेल. हे आपल्या अस वाटत असते. पण आपली स्वामी माऊली आहे ही त्रिकालदर्शी आहे.

आपल्यापेक्षा खूप चांगलं जातात की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि आपल्याला काय देयला पाहिजे. बरेचदा एखाद्या गोष्टीसाठी आपलं ध्येय असत त्याकडे आपन वाटचाल करताना सुद्धा आजूबाजूच्या अनेक गोष्टी आपल्याला विचलित करतात. आपल्यामध्ये अडथळा आणतात.

त्यामुळे पण आपली श्रद्धा विश्वास हा डळमळीत होतो आणी लगेच पण आपल्यामधे स्वतःचच खच्चीकरण होतं आपण लगेच स्वतः वरचा, आपल्या स्वामींवरचा स्वतःवरचा विश्‍वास कमी होतो.आशा वेळी थोड्या थोड्याशा गोष्टींवरून, थोड्याशा अपायशावरून, जर थोडंच काही मनासारखं नाही झालं की अजिबात विचलित होऊ नका स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा.

जे काही तुमच आहे, जे काही तुम्हाला प्राप्त करायचा आहे, स्वामी बरोबर आपल्याला तिथं पर्यंत नेतात स्वामी व्यवस्थित साथ देतात, भक्तांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहतात.बरेच लोक बोलतात स्वामींनी आमच्यासाठी काहीच नाही केलंय, तुम्हाला स्वामींनी के दिलय का ?काय काय दिलंय, आशा प्रकारचे अनेक प्रश्न लोक करत असतात.

हे आपण विचार करण्याची वेळ आहे, की आपली खरंच स्वामींवर श्रद्धा आहे,मनापासून श्रद्धा आहे, की आपल्या इच्छा गरजा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींची भक्ती करतोय. हा विचार आपण करायला हवा. एक खूप सुंदर वाक्य आहे बिन मंगे मोती मीले,मंगे मिलेना भिख.

म्हणजे ज्या भक्तची मनापासून श्रद्धा आहे स्वामींवर अशा भक्ताला स्वामी त्याच्या भल्यासाठीच त्यात त्याचं चांगलं होणार, ज्यातून त्याचा उत्कर्ष होणार आहे. अशा सगळ्या गोष्टी त्याला स्वामी बरोबर योग्य त्या वेळी देत असतात. नुसार भौतिक नाही, आध्यात्मिक सर्वांगाने त्यांची उन्नती व्हावी हाच हेतू असतो.

आणि त्यामुळे स्वामी त्याला सर्वकाही वेळोवेळी योग्य प्रकारे देत असतात.पण जो भक्त जो माणूस सतत कोणत्याही गोष्टींमध्ये हे हवं ते हवं ते हवं आणि ते नाही मिळाल की आपण पाहिलं तसं लगेच तो डळमळीत होते. असा माणूस सतत दुःखी राहतो त्याच नकारात्मक तेच्या कोशामध्ये राहतो.

आपलं चित्त कायम स्वामींवर ठेवा स्वामी आपला विश्वास श्रद्धा दृढ ठेवा. जास्तीत जास्त जमेल तितकी छान प्रकारे स्वामींची भक्ती करत राहा. आणि जे काही करताय ते छान प्रकारे करत राहा. स्वामी तुम्हाला, सुख, आनंद यश सगळं काही देतील.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *