स्वामींची लीला महान।। स्वामींनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा आपल्या भक्तांना दिले दर्शन ।। स्वामींनी त्यांचा दिलेला शब्द पळाला।। वाचा खाली लेखात

उधोगविश्व प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” समर्थ महाराजांची एक लीला सांगणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा आपल्या भक्तांना दर्शन दिले होते. कोल्हापूरचे वामनराव कोल्हटकर हे स्वामींचे अनन्य भक्त होते. स्वामी त्यांना लाडाने वामण्या अशी हाक मारत. त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती.

पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना कधी काहीच काही बोलले नाही. याउलट स्वामी एकदा त्यांना हसत म्हणाले, काय रे वामाण्या घरात एवढं धान्य भरून ठेवलेस पण आम्हाला कधी जेवायला बोलावलं नाहीस? त्या वेळी वामनराव म्हणाले की, स्वामी महाराज हे सगळं तुमचंच आहे, तुम्ही कधी ही यावं.

त्यावर स्वामींनी सांगितलं,असं म्हणतोस तर गुरुवारी नक्की येतो. भाकरी करून ठेव, ठेचा देखील करून ठेव, वांग्याचं भरीत करून ठेव.यानंतर वामनराव अगदी आनंदाने घरी परतले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी केली.भाकऱ्या, ठेचा, वांग्याचे भरीत या सगळ्याचा बेत आखला. ते दांपत्य स्वामींची वाट बघत होते.

स्वामी आले, पण ते एकटेच होते. त्यांच्या सोबत त्यांच्या भक्तपरिवार नव्हता. वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि स्वामींना विचारले, स्वामी तुम्ही एकटेच आलात,कोणाला बरोबर का नाही आणलं? त्यावेळी स्वामी म्हणाले, ‘तुला कशाला हव्यात रे नुसत्या चांभारचौकशा‘, भूक लागली आम्हाला लवकर जेवायला वाढ आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केलं.

वामनरावांना भरून पावलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली पण स्वामी एकटेच का आले? हा विचार त्यांना शांत बसू देईना. म्हणून त्यांनी याबद्दल विचारणा करण्यासाठी एका माणसाला अक्कलकोट मध्ये पाठवलं. तो माणूस अक्कलकोटला जाऊन आला आणि त्या माणसाने परत आल्यावर असं सांगितलं की, स्वामिनी मंगळवारीच आपला देह ठेवला.

त्यांचे हे शब्द ऐकताच वामनराव मला रडू कोसळले. अश्रूधारा वाहू लागल्या आणि त्यांना खूप भरून आले. त्यांना समजून चुकले की स्वामींनी आपला शब्द पाळला आणि समाधीनंतर सुद्धा आपल्याला दर्शन दिले. देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील अण्णा जहागीर दाराला अशाच प्रकारे श्री स्वामी समर्थांनी एकदा शनिवारी घरी येईन असे वचन दिले होते.

त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आणि अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्री स्वामी समर्थ महाराज नीले गावच्या वेशीवर प्रगट झाले. या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटेच नव्हे तर स्वामींचे संपूर्ण सेवकरी यांच्यासह प्रकटले होते. गावातील सर्व लोकांना दर्शन दिल्यावर अचानक कुठेतरी निघून गेले.

त्यानंतर गावातील लोकांनी स्वामींनी खूप शोधले शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खरा काय तो खुलासा करण्यासाठी अक्कलकोट मध्ये एक माणूस रवाना केला. तोवर दुपारी अजून एक लीला घडली. स्वामी जहागीरदाराच्या वाड्यात एकटेच प्रकटले. पूजा स्वीकारली, पण स्वामी मौन बाळगून होते.

भाऊसाहेबांना दर्शन दिल्यावर ते साक्षात परब्रम्ह तेथून अदृश्‍य झाले तर दुसरीकडे तो माणूस अक्कलकोट वरुन स्वामींच्या मंगळवारी झालेला समाधीची वार्ता घेऊनच परतला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. समाधीनंतर सुद्धा स्वामींनी आपला शब्द पाळला आणि सर्वांना दर्शन दिले.

निलेगावच्या सर्व भक्तांना स्वामींच्या या अतर्क्य लिलेचे आश्चर्य वाटले आणि स्वामी प्रेमाने त्यांचे हृदय भरून आले. अक्कलकोट स्वामी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यामध्ये अन्य भक्तापेक्षा अतिशय वेगळे भिन्न असे नाते होते. एखादे लेकरू जसे आपल्या आईला सर्व काही सांगते, तिच्यावर प्रेम करते, तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवते, अगदी तसेच नाते स्वामी समर्थ आणि जांभेकर महाराज यांचे होते.

त्यांनी स्वामी समर्थांना सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद मागितले होते आणि स्वामींच्या आशीर्वादाने जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकाला मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त देखील झाले. जांभेकर महाराजांचा दादर मुंबई येथे आश्रम आहे .

त्यावेळी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. एखादे जादूगर जसे खेळ दाखवतो तसे ते चमत्कार दाखवत असेल. अक्कलकोट मध्ये स्वामींनी देह ठेवल्यानंतर काही वर्षांनी जांभेकर महाराज पुन्हा अक्कलकोटला गेले. त्यावेळी त्यांच्या भोवती त्यांनी तयार केलेल्या काळया चींध्याच्या तीनशे-चारशे बाहुल्या हवेत नाचत होत्या.

ते अक्कलकोट मध्ये आल्याचे वृत्त कळताच त्यांना पाहायला पूर्ण अक्कलकोटचे रहिवाशी जमा झाले. त्यांच्या उडणाऱ्या बाहुल्या पाहायला लोक आश्चर्यचकित होऊन नमस्कार करू लागले आणि गर्दी वाढू लागली. असा सगळा घोटावला जमा करून जांभेकर महाराज अक्कलकोट स्वामीपाशी गेले.

स्वामींच्या समाधीचे दर्शन करतेवेळी नमस्कार करत असताना त्याने मान खाली घातली असता त्यांच्या कानात स्वामींचा घनगंभीर आवाज ऐकू आला, जांभ्या ,”हम गया नही जिंदा हे”. हे शब्द कानावरती पडताच त्यांच्याभोवती क्षणात हवेत नाचणाऱ्या बाहुल्या जमिनीवर पडायला लागल्या.

जांभेकर यांची स्तब्ध समाधी लागली, त्यांना काही सुचेनासे झाले. स्वामींचा असा हा चमत्कार पाहून जांभेकर स्वामींना शरण गेले.त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पुढच्या काही दिवसांमध्येच त्यांनी आपल्या किमायांचा त्याग केला आणि त्या स्वामिभक्ती मध्ये रममान झालेले.

“श्री स्वामी समर्थ” म्हणून आजही आपले ,श्री स्वामी समर्थ महाराज त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्य करत आहे. आपल्या भक्तांचा सर्वतोपरी सांभाळ करत आहे आणि पुढेही करतील.स्वामी होते,स्वामी आहेत आणि स्वामी असणाच. स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात, गरज आहे ती फक्त त्यांना एक हाक मारण्याची. मनापासून हाक मारली कि स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतात आणि आपल्यावर आलेले संकट दूर करतात. “श्री स्वामी समर्थ”

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *