आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. आणि त्यावरून आजचा आपला स्वामींचा संदेश काय आहे ते पाहणार, बघणार आहोत. एक खूप सुंदर अस गाव होत. त्या गावात अनेक प्रकारची वृक्ष होती. त्या वृक्षांमध्ये फळांची, फुलांची, जसे की आंबा, वड, पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, जांभूळ, अशी अनेक वृक्षांनी ते गाव नटलेलं होतं.
अगदी अस हिरवागार छान गाव होतं. गावकरी वड आणि पिंपळाच्या झाडांची पूजा करायचे. लहान मुले आंबा, जांभूळ वैगरे झाडांच्या आसपास खेळायची,त्या झाडांची फळे तोडून त्याचा आनंद घ्यायची. गुलमोहराच्या झाडांना तर भरपूर फुले यायची, त्या फुलांचा रस्त्यावर सडा पडायचा, आणि गावाची शोभा खूप वाढायची.
पण या सर्व झाडांना बघून कडू लिंबाच्या झाडाला मात्र फार दुख व्ह्यायचं. त्याला असं सतत नेहमी वाटायचं की मी कडू आहे, माझा पानांची चव कडवट आहे, म्हणून मी कोणाला आवडत नाही. कडुलिंब काय करतं एकदा ईश्वराला प्रार्थना करतो, की हे ईश्वरा माझी सर्व पानं गोड कर माझ्या पानांची चव गोड करून टाक.
ईश्वर त्यांची प्रार्थना ऐकते दुसऱ्या दिवशी कडुलिंबाची सगळी पानं गोड होतात. पण होतं काय कि ती पान गोड झाल्यामुळे मुंग्या, पक्षी, आणि इतर कीटक, कडुलिंबाची सर्व पाने खाऊन टाकतात, कडुलिंब पुन्हा दुःखी होतं. कडुलिंब पुन्हा देवाकडे प्रार्थना करतो, की हे ईश्वरा आता ना तु माझी सगळी पानं सोन्याची कर म्हणजे हे पक्षी, कीटक माझी पान खाणार नाही ईश्वर त्याची ही प्रार्थना सुद्धा ऐकत.
दुसऱ्या दिवशी कडुलिंबाची सर्व पानं सोन्याचे होतात, पण यावेळी काय होतं सोन्याची पान बघून सगळे गावकरी येतात आणि कडुलिंबाची सगळी पानं तोडून नेतात, कडुलिंब पुन्हा दुःखी होतं. त्याला आपली चूक कळते. यावेळी मात्र कडुलिंब अशी प्रार्थना करतो की हे ईश्वरा, हे करुणानिधी, मी मूळ अज्ञानी आहे, माझ्यासाठी काय चांगलं, काय वाईट, हे मला नाही कळत रे.
तू माझ्यासाठी जे चांगल आहे ना, जे योग्य आहे तेच कर, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कडूलिंबाची पानं कडू झाली, आणि कडुलिंब पुन्हा अगदी पूर्वीसारख झालं. तर आजच्या आपल्या या गोष्टीतून आपला स्वामी संदेश असा आहे की, आपल्यापैकी अनेक जणांना या गोष्टीतल्या कडू लिंबाच्या झाडा सारखीच सवय असते.
जे आपल्याकडे आहे त्यात ते कधीच संतुष्ट नसतात, त्यात सतत काहीतरी खाचाखोचा काढायचं, काहीतरी नकारात्मक गोष्टी शोधून काढायच्या, स्वतःला दोष देत राहायचं, की हे असंच का, हे काही तसंच का, माझ्याच माथी हे का, माझ्याच नशिबात हे असं का, आणि मग अशावेळी काय होतं की ती आपल्या कडे आहे त्यात आपण समाधान किंवा त्यात आनंदी नाही राहत.
जे दुसऱ्याकडे आहे ते सतत आपल्याला हवं हवंसं वाटतं. की हा हे मिळाल्यावर मी आनंदी होईल, अशा प्रकारे मग आपल्याला कितीही काही मिळालं तरी आपल्याला आनंद वाटतच नाही. कारण प्रत्येक गोष्टीत सतत तक्रार, कूरभुर, प्रत्येक गोष्टीचा नकारात्मक विचार करणे, प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक बघणे, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कधी आनंद आणि समाधान मिळतच नाही.
आणि या गोष्टींनी, या अशा स्वभावामुळे काय होतं की तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी व्यक्ती कधीच समाधानी आणि संतुष्ट नसते. कारण त्यांना कितीही मिळाले तरी कमी, ते काहीही असले तरी त्यात नकारात्मक काहीतरी शोधून काढणार आणि दुःखी होणार, त्यामुळे सतत असमाधानी, असंतुष्ट आणि अशा व्यक्तीकडे मनशांती ही कधीच नसते.
सतत ही व्यक्ती अशांत असते. काहीतरी हव असत, हे अस असच, ते तसच, त्यामुळे मनशांती ही या व्यक्तींना नसते. दुसरी गोष्ट ही की हा अशा प्रकारचा सतत नकारात्मक विचार, सतत नकारात्मक गोष्टी केल्याने, आपली जी अध्यात्मिक शक्ती असते, जी काही शक्ती आपण मिळवतो स्वामींचे भक्ती करून, नामस्मरण, पूजा वगैरे करून, ही शक्ती कमी कमी होत जाते.
आणि आपल्या मध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता भरत जाते. आपण अनेकदा, अनेक ठिकाणी पाहिल आहे. या नकारात्मक विचारांमुळे, नकारात्मकता त्यामुळे, आपल्याला किती त्रास होतो ते. आपण स्वामींच्या जसं जसं जवळ जात असतो त्यामध्ये ही नकारात्मक शक्ती मध्ये मध्ये मग विघ्न आणत राहते. आणि आपल्या स्वामींच्या जवळ जाण्याचा प्रवास फार लांबतो.
हे आपण अनेकदा अनुभवतो, पाहतो. यापुढे जाऊन या नकारात्मक गोष्टींना होतं काय की मग दुसऱ्यांवर जळावू वृत्ती आपली वाढते. जर दुसऱ्याकडे एखादी गोष्ट असेल व त्यांच्या बाबतीत आपल्या मध्ये जेलसी निर्माण होते. त्यांच्या बाबतीत नकारात्मक विचार, वाईट विचार करणे, जळत राहने, सतत कुडतं राहणं आतून, ही गोष्ट जास्त प्रमाणात आपल्या मधे निर्माण होते, आणि नकारात्मकता आपल्यामध्ये तयार होते, वाढते.
आणि मग या अशा व्यक्तींमध्ये आत्मसन्मान ही कमी असतो. ‘सेल्फ कॉन्फिडन्स’ ज्याला आपण म्हणतो. ‘सेल्फ एस्टीम’ ती ही या व्यक्तींची खूप कमी असते. कारण ती स्वतःला कमी समजतात दुसऱ्यापेक्षा. माझ्याकडे ही नाही त्याच्याकडे ते आहे, त्याजवळ ते आहे, त्याच्यामुळे मी काहीतरी कमी आहे, इन्फेरियार आहे, दुसऱ्या पेक्षा कमी आहे, आणि मग त्यामुळे त्या व्यक्ती दुःखी निराश राहतात.
इतर समाजात फार मिसळत नाही. सतत स्वतःबद्दल नकारात्मक विचार, की माझ्याकडे हे नाही, ते नाही, मी असाच, मी तसाच, मी कमी आहे, या प्रकारे हे विचार करतात. आणि मग होतं काय की आपण अशा प्रकारे विचार केल्याने जो काही प्रॉब्लेम आहे किंवा ही जी काही गोष्ट आहे त्यातच अडकून गुंतून राहतो.कारण आपण तोच तोच नकारात्मक विचार करतोना की जे नाही त्याच गोष्टीवर आपला सगळा फोकस असतो.
त्यातून कसे बाहेर पडता येईल, काय मार्ग करता येईल, किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे तर ती मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, या दृष्टीने विचार करण्याऐवजी हे नाही, ते नाही, असंच, तसंच, तेच नाही, निगेटिव्ह गोष्टींवर जास्त फोकस ठेवल्याने आपण त्याच नकारात्मकतेचे दलदलीत अडकून राहतो.
आता आपण बघणार आहोत की या गोष्टी बदलायला तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी, किंवा या नकारात्मक गोष्टी टाळण्यासाठी काय करायचं आहे, तर बघा पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे की पॉझिटिव्ह औटलूक ठेवायचं सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. तुमच्याकडे जे काही आहे त्यात समाधानी आणि संतुष्ट राहायला शिका.
त्याच्यामधला नकारात्मक गोष्टी, खाचाखोचा काढण्याऐवजी, त्याच्या पॉझिटिव्ह अस्पेक्ट जे आहे त्यातले सकारात्मक गुण काय आहेत, त्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल की ग्लास अर्धा भरलेला आहे हे. तर ग्लास अर्धा रिकामा आहे हे म्हणण्यापेक्षा अर्धा भरलेला आहे हे म्हणा. त्याच प्रमाणे जे काही आहे त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनाने बघा.
त्या दृष्टीने विचार करा. की हे आता आहे, हे असं आहे, जर तुम्हाला बदलता येत असेल तर अवश्य बदला, पण नसेल तर काय करता येईल, कुठल्या दिशेने प्रयत्न करता येईल, काय सोलुशन करता येईल, या दृष्टीने सुद्धा विचार करा. बघा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल,आता तुमच्याकडे नाही पण तुम्हाला हवी असेल, एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मग बिनधास्त प्रयत्न करा.
नकारात्मकतेच्या आहारी जाऊ नका. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आणि बिनधास्त चांगल्या विचाराने एकदम प्रयत्न करा. आपले हे स्वामी महाराज म्हणालेत स्वतः की ‘बघ बाळा जे तुझ्या नशिबात आहे ते तर तुला मिळतंच’. पण जे नाही ते सुद्धा जर तुला हवं असेल तर मी कशाला बसलोय, मी ते खेचून आणून देईन तुम्हाला.
बघा आपले स्वामी एवढं बोलेत अजून काय हवंय तुम्हाला. बिनधास्त प्रयत्न करा, बघा काय करायचं तुम्हाला यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करायचेत. तुम्हाला जी गोष्ट हवी आहेना, एखादी परीक्षा द्यायचे त्यात यश मिळवायचे ,एखादी नोकरी मिळवायचे, किंवा एखादी गोष्ट घ्यायचे विकत तुम्हाला पैसे जमवायचे, वगैरे जे काही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे. सत्याचा मार्ग धरायचा कुठल्याही प्रकारे लबाडी करून चीटिंग वगैरे काही करायचं नाही.
आपण स्वामींची सात घेतोय, स्वामी आपल्या बरोबर आहे त्या प्रवासात त्यामुळे सत्याचा मार्ग प्रामाणिक प्रयत्न, मेहनत, मेहनत करायला कधीही कमी पडू नका. कायम मेहनतीची तयारी ठेवा. स्वामी आपल्याला नेहमी योग्य मार्ग वैगरे दाखवत असतात. आपली तयारी हवी.
आणि कुठली महत्त्वाची गोष्ट सुरू करण्याआधी, समजा तुम्ही एखाद्या परीक्षेसाठी अभ्यास चालू करत आहे. किंवा काही कुठली मोठी गोष्ट करताय त्याआधी स्वामींना छान प्रार्थना करा. त्यांना साकडे घाला. की स्वामी मी अशी गोष्ट करत आहे, स्वामी तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत राहा, मला योग्य मार्गदर्शन करा. आणि मग बघा कसे स्वामी तुम्हाला मदत करतात. कशी तुमच्याकडून ती गोष्ट पूर्ण करून घेतात ते.
आजपासून आपण ठरवू या की यापुढे कधीही असे नकारात्मक, निराशेचे विचार करायचे नाहीत. आपल्याकडे जे काही आहे त्याची कायम चांगली सकारात्मक बाजू बघायची,त्याचे जे पॉझिटिव कोण आहेत ते बघायचे. काय नाही खाचाखोचा काढत राहणे हे करायचं नाही.बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात जस की दोन वेळचं अन्न, डोक्यावर छप्पर, पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी ही लोकांना मिळत नाही. त्यासाठी हे लोकं तरसत असतात.
त्या स्वामींनी आपल्याला दिलेले आहेत. जे काही स्वामींनी आपल्या दिलेला आहे त्यासाठी कृतज्ञ राहा, स्वतःला त्याची जाणीव करून घ्या, त्या गोष्टींचे महत्त्व जाणून घ्या, आणि स्वामींचे त्यासाठी आभार माना. सगळ्यात जे काही छान छान तुमच्याकडे आहे त्यासाठी स्वामींचे आभार माना. ह्याने अधिक भरभराट होते, स्वामींना ते जास्त आवडतं.
तक्रार, कुरबुर सतत असं करत राहणारी लोक स्वामींना नाही आवडत. आणि नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामिभक्ती मनापासून करत रहा. तुम्हाला जे काही हवं आहे ना आयुष्यात स्वामी तुम्हाला सगळ देतील. आपण म्हटल्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा, व्यवस्थित नियमाने करत रहा, स्वामी भक्ती, स्वामी नामस्मरण व्यवस्थित करत रहा. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात.आपले स्वामी म्हणाले आहेत की नाही, ” नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”
त्यामुळे यापुढे तुम्ही कधीही निराश, नौदुखी,आणि या सगळ्या नकारत्मकतेला स्वतःवर हवी होउन देऊ नका. कायम स्वामींकडे बघा. आपले स्वामी सतत आपल्या सोबत असतात आणि बिनधास्त प्रयत्न करा. आणि बिनधास्त तुम्हाला जे काही हवे ते मिळवा, बिनधास्त त्या मार्गावर जा. स्वामी आपल्या सोबत नेहमी असतात. स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.