स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? चुकीचा लावल्याने काय होते ।। घरात स्वामींचा फोटो कसा ठेवावा? ।। कोणता फोटो घ्यावा? ।। यासारख्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे या लेखात !

कला देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

“श्री स्वामी समर्थ” सर्वात ज्यास्त लोकांनी म्हणजेच स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकर्‍यांनी विचारलेला प्रश्न तो म्हणजे घरात स्वामींचा फोटो कसा ठेवावा? कोणता फोटो घ्यावा आणि कोणत्या दिशेला तो फोटो लावावा? फोटो कसा असावा म्हणजे  कोणता फोटो आपण घ्यावा?

घरात स्वामींचा फोटो कसा घ्यावा? तर जेव्हा तुम्ही फोटो घ्यायला जाणार असाल तेव्हा तो फोटो तुमच्याशी बोलणारा, तो फोटो रेखीव असला पाहिजे, तुम्हाला दिव्य दर्शन देणारा फोटो असला पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदा निरखून बघा. सगळे फोटो बघा आणि कोणता फोटो तुम्हाला आवडतो आहे.

कोणत्या फोटोमधून तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटते आणि कोणता फोटो तुम्हाला काहीतरी बोलतोय असं वाटतंय. तो फोटो तुम्ही निवडा. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणताही फोटो घ्या.

तर त्यामध्ये असा फोटो घ्यायचा ज्यामध्ये स्वामी समर्थ हे बसलेले असायला पाहिजेत उभे राहिलेले नाही. फोटो मध्ये कोणता प्राणी असेल किंवा स्वामी समर्थ कोणत्या प्राण्यावर बसलेले असतील तर असाही फोटो घ्यायचा नाहीये. साधा सरळ स्वामी बसलेले असतील असा फोटो घ्यावा.

आता फोटो कोणत्या दिशेला लावावा? तर फोटो कोणत्याही रूम मध्ये लावा. पण तो पूर्व आणि पश्चिम दिशेलाच लावावा म्हणजे पूर्व दिशेची भिंत असू द्या किंवा पश्‍चिम दिशेची भिंत असू द्या.

आता फोटो कसा लावावा? तुम्ही एखाद्या पाटावर तो फोटो ठेवू शकतात, देवघरात. पण काही फोटो भिंतीवर लावतात तर भिंतीवर लावताना तो आपण काय करतो खिळा ठोकतो आणि खिळ्याला तो फोटो लटकतो, टांगतो. पण एकदम चुकीचा आहे. हे माहित तुम्हाला फोटो भिंतीवर लावायचा असेल, त्या आधी भिंतीवर एखादे अशी पाटी ठोका किंवा काच लावा किंवा एखादी लाकडाची फळी लावा.

दोन खिळे लावा त्यावर ती पाटी ठेवा किंवा फळी ठेवा किंवा आणि त्यावर फोटो ठेवावा. ना की लटकवावा टांगवा. एक नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला फोटो कसा असावा कोणत्या दिशेला लावावा आणि कसा लावावा त्याचे उत्तर मिळाले असेल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत.  या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *