नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
आज आपण एक अनुभव पाहणार आहोत, पुणे येथे राहणारे किरण ताईंचा अनुभव सांगणार आहे. त्या ताईंनी त्यांना आलेला स्वामींचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. ते सांगतात, मी किरण माझ्या मनातील स्वामीं विषयी असलेल्या भावना व्यक्त करते. स्वामीं विषयी काय बोलावं शब्द कमी पडतात. ते तर निरागस आहेत.
मी 2014 पासून स्वामींशी जोडले गेले, म्हणतात ना संकटांमध्ये कुठ कुठून नवीन आशेचा किरण दिसतो. तोच आशेचा किरण म्हणजेच आपले स्वामी. मी स्वामींच्या आधी गजानन महाराजांची खूप भक्ती करायचे. शेगावच्या वाऱ्यादेखील करायचे. गजानना महाराज्यांना मी नेहमी म्हणायचे, गजानना माझ्या नोकरीच किंवा लग्नाचं तरी होऊ दे.
मनामध्ये माझी श्रद्धा होतीच, मी नेहमी गजानन महाराजांची भक्ती करायचे. माझ्या फॅमिली मध्ये सर्वच गजानन महाराजांचे भक्त आहेत. मी कुठेतरी गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये कमी पडायची. भक्तीचे फळ मला मिळायचे नाही. असेच एक दिवस मी स्वामी समर्थ केंद्रा जवळून चाललेले होते, माझ्या अचानक मनामध्ये आलं आपण पण केंद्रामध्ये जायला पाहिजे.
मी स्वामीं बद्दल नेहमीच ऐकलेले होते. त्यांचे चमत्कार ऐकलेले होते. मी लगेच स्वामी मठामध्ये गेले, तिथे गेले तेव्हा मी बघितलं की तिथे सर्वजण पारायण करत होते. मी जेव्हा स्वामींच्या फोटोकडे बघितले तेव्हा मला खूप भीती वाटत होती. मी लहानपणापासून स्वामींच्या फोटोला बघून घाबरायची.
त्यादिवशी पण असाच काहीसे घडले. श्री स्वामींच्या फोटोकडे बघत होते आणि अचानक तिथे एका काकू आल्या आणि त्या काकू मला म्हणाल्या की , काय झालं ग? अशी का बघते? मी म्हटले, मला फोटोची खूप भीती वाटते आहे. तेव्हा त्या काकू खूप हसत होते. मला म्हणाल्या, बस काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला सांग.
मी म्हणाले, काकू माझं काही लग्न जुळत नाही आणि नोकरीचा पण प्रॉब्लेम आहे. माझे घरचे पण थोडे टेन्शन मध्ये आहे. मी गजानन महाराजांचे खूप भक्ती करते. पण मी कुठेतरी कमी पडत आहे. तेव्हा काकू मला म्हणाल्या खूप चांगला केलस तू केंद्रामध्ये आलीस. स्वामींनी तुला बोलावून घेतले आहे.
तू एक काम कर, रोज स्वामींची, “श्री स्वामी समर्थ” अशी एक माळ जप कर. तसेच सारामृत अध्याय वाचत जा. बघ तुझे सर्व प्रॉब्लेम दूर होतील. त्या दिवशी पण दत्त जयंती होती. माझ्या मनामध्ये अचानक विचार आला, आपणपण स्वामींना गुरु करावे. आणि लगेच पानाचा विडा आणि एक नारळ घेतला आणि लगेच स्वामींच्या समोर गेले.
तेवढ्यात माझ्या मनामध्ये विचार आला जर मला स्वामी भक्त नवरा नाही मिळाला तर? मग कसे करायचे, जर तो नॉन व्हेज खाणारा असेल तर मला तर बनवून द्यावाच लागेल ना? तेवढ्यात माझ्या जवळ काकू आल्या आणि मला म्हणाल्या काय झाले,का थांबलीस? स्वामींसमोर विडा आणि नारळ.
मी माझा प्रश्न काकूंना सांगितला. त्या म्हणाल्या बाळा टेन्शन घेऊ नकोस, स्वामी तुझ्यासाठी खूप चांगलं करतील. तूला जसा हवा तसा मुलगा मिळेल. हे ऐकून माझ्या मनाला खूप धीर आला. मी स्वामींना गुरु करू तिथून लगेच घरी गेले आणि घरी आईला सांगितले की मी आजपासून स्वामींना गुरु केल आहे.
हे ऐकल्यावर ती माझ्यावर खूप चिडली, ती म्हणाली तू गुरू केलंस आणि म्हणाला आधी काहीच सांगितलं नाही. बाळा पण तुला आपली जात माहित आहे ना? राजपूत म्हटले की नॉनव्हेज खाणारे आले, कशाला गुरु केला? मी हे आईचे बोलणे ऐकल्यावर तिला एकच सांगितलं की, आता मी सर्व स्वामींवर सोडून दिला आहे. तेच बघतील काय ते.
आणि मग असाच एक चमत्कार त्या दिवशी माझ्या सोबत झाला. मला फेसबुक वरती एक फ्रेंडशिप रिक्वेस्ट आली आणि ती होती माझ्या मिस्टरांची. मी ती लगेच एक्सेप्ट केली. तेव्हा मला आणि त्यांना बिलकुल माहिती नव्हतं की आमचे लग्न होईल.असेच दिवस जात होते.आमचे दोघांचे रोज बोलणे सुरु झाले, फक्त बोलणे स्वामी विषयी व्हायचे.
माझा स्वामीं वरील विश्वास बघून त्यांना पण स्वामीं विषयी भक्ती जागृत झाली. ते पण स्वामींचे भक्ती करू लागले. त्यांच्या घराचे पण त्यांच्या लग्नासाठी मुलगी बघत होते. माझ्या घरी तर मला स्थळ बघणे सुरू होते. असेच दिवस जात होते. मी त्यांना नेहमी म्हणायचे,काय माहिती स्वामींनी माझ्या नशिबी काय लिहिले असेल.
मग ते मला म्हणायचे स्वामी सगळं शक्य करतील. एक दिवस अचानक त्यांनी मला विचारलं? तू माझ्याशी लग्न करशील का? माझ्या खुशीला तर अंतच नव्हता. पण मग परत त्यांच्या फॅमिलीचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला. त्याची फॅमिली या लग्नाला तयार होतील का? कारण ते एक सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मी बीए बीएड.
म्हणून मला माहिती होतं की त्यांची आई या गोष्टीला तयार होणार नाही. आम्ही एकाच कास्टचे होतो. नंतर माझ्या फॅमिली कडून या लग्नासाठी होकार आलेला. पण त्यांच्या फॅमिली कडून लग्नासाठी नकार होता. मी त्यांना म्हणाले तुमच्या फॅमिलीचा नकार असेल तर रहु द्या. त्यांनी लगेच स्वामींचे पारायण चालू केले.
काही दिवसांमध्येच चमत्कार दिसून आला. त्यांच्या आई आणि फॅमिली कडून या लग्नासाठी होकार आला. लग्नाची तारीख लवकर काढणे जरुरी होते. कारण त्यांना लंडनला जायचे होते. आमचे लग्न दत्तजयंतीच्या दिवशी छान पार पडले, पण माझ्या नशिबाचा भोग मला तर भोगायचे होते.
माझी सासू माझा खूप द्वेष करायची, खूप राग करायची, मला म्हणायची तूच माझ्या मुलाला फसवलं. मी सर्व स्वामींवर सोडून द्यायची. माझ्या सासूच्या देवघरामध्ये स्वामींची छोटीशी मूर्ती होती. ती मूर्ती माझ्या मिस्टरांनी अक्कलकोट वरून आणली होती आणि ती माझ्या सासूबाईंना दिली होती.
लंडनला आम्ही दोघे जायला निघालो, तेव्हा माझी सासू मला म्हणाली ही मूर्ती घेऊन जा तुझ्या घरी, स्वामी तुझे गुरू आहे आमचे नाही. तुझी मूर्ती घेऊन जा, तू त्यांचं करतेस ना इथे कोणी नाही करत,जा लंडनला घेऊन जा. मी मनातून खूप खुश झाले कारण ती मूर्ती मला मिळाली.
लंडनला आल्यावर दोन वर्षानंतर मला मुलगी झाली, नंतर माझ्या सासूचा कुठेतरी राग कमी झाला. मला स्वामींवर विश्वास होताच. की ते सर्व काही ठीक करतील. माझ्या सासू रोज आता स्वामींची सिरीयल बघतात. त्यांच्यामध्ये भरपुर फरक पडला आहे.आधी माझा खूप राग करायचे पण आता तर खूप शांत झाले आहेत.
हे सर्व स्वामींच्या कृपेने शक्य झाले. असंच काहीतरी स्वामींनी माझ्या नशिबी लिहिले असावे. नशिबाचे भोग तर भोगावीच लागतात. असाच एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला, मी एवढी गजानन महाराजांची भक्ती करायची पण मला फळ नाही मिळाले. मी स्वामींच्या भक्तीला लागले आणि माझं सर्व ठीक झाले.
असं काय झाले असेल बरं? तेव्हा माझीच उत्तरे मला मिळाली. देवाने आपल्याला जन्म दिला, त्यांच्या भक्तीसाठी फक्त आपल्याला मार्ग कोणता निवडावा हे माहीत नसते, जर स्वामींना माझ्याकडून त्याची भक्ती करून घ्यायची असेल, म्हणून त्यांनी मला त्यांच्यापर्यंत पोहोचवले.
असो आज मी इथे आहे ते फक्त स्वामी मुळेच, जे नाही मागितले ते देतात स्वामी. स्वामींना सर्व माहिती आहे, स्वामिनी प्रत्येक संकटामध्ये मला साथ दिली. कोरोना काळामध्ये माझा परिवार मी स्वामींच्या आशीर्वादाने एकदम छान आहोत. स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की लवकरात लवकर करोनाचे संकट मुक्त करा. स्वामी तुम्ही सदैव आमच्या सोबत आहात. तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. “श्री स्वामी समर्थ” “जय जय स्वामी समर्थ”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.