तुम्ही जर स्वामी सेवा करत असेल तर या गोष्टी नक्की पाळा.।। नाहीतर स्वामीसेवा करून काहीच उपयोग होणार नाही ।। सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात!

कला प्रादेशिक

“श्री स्वामी समर्थ” स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत! हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला सेवेकरी कसा असावा? याची संपूर्ण माहिती सांगणार आहे.

तुम्ही पण स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी पाळल्या पाहिजे. चला तर मग सुरवात करूया. अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हा सेवेकरी धर्म आहे. आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात.

आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य आपण समजले पाहिजेत. आपण गर्जून केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची किंवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहे असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढवल्याचे लक्षण होय.

जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत नकळत दुसऱ्यांचे मन दुखावणार नाही, अशा गोष्टी तो करत असतो. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम सेवेकरी करतो. कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकाराला आला आहे असे समजावे.

कोणाचीही मस्करी करणे, कमी समजणे, त्याची निंदानालस्ती करणे, सतत नाव ठेवणे, टाकून पाडून बोलणे हे सेवेकऱ्यांचे लक्षणे नसतात. लहानपणापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्ती पर्यंत प्रत्येका सोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा ही सेवेकऱ्याची लक्षणे असतात.

ज्यावेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाचीही मस्करी, निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते. आपण नंतर असे म्हणतो की आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही. म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा, आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दल ही खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत गैरसमज आपणच स्वतःच्या मनात निर्माण करू नये. त्यामुळे आपण सतत द्वेशाच्या अग्नीत जळत असतो. याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःला त्रास करून घ्यावा लागतो.

आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या पण अडचणीच्या काळात कधीतरी आपल्याला कोणीतरी मदत केली आहे आणि ती स्वामी मुळेच आपल्याला प्राप्त झाले आहे. म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण कधीही स्वतःत अहंकार निर्माण करू नये.

कधीही कोणालाही खाऊ घातलेल्या काढणे तसेच माझ्यामुळे त्याचे सर्व चांगले झाले आहे असे म्हणत राहणे आपण केलेल्या सर्व मदतीचे पुण्य कमी करणे होते. कधीही कोणालाही खाऊ घातले काढणे तसेच माझ्यामुळे त्याचे सर्व चांगले झाले आहे असे म्हणत राहणे म्हणजे आपण केलेल्या मदतीचे पुण्य कमी करणे होय.

केलेल्या मदतीची काहीतरी परतफेड मिळावी म्हणून अपेक्षा ठेवणे याला स्वार्थीपणा म्हणतात. तसेच एखाद्याला जाणून बुजून त्रास देणे अशा लोकांच्या पाठीशी कधीही स्वामी समर्थ नसतात असे समजावे.

म्हणून “करता आणि करविता तुची एक समर्था। माझिया ठाई वार्ता मीपणाची नसेची”।। याप्रमाणे जीवन जगावे तेव्हाच स्वामी कृपा होते. “श्री स्वामी समर्थ” वरील प्रमाणे सर्व स्वामी भक्तांनी, स्वामी सेवेकर्‍यांनी या गोष्टी पाळाव्यात.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *