“श्री स्वामी समर्थ” स्वामी प्रिय भक्त हो “स्वामी” हे नाम हे श्रद्धेने घेणे म्हणजे नेमके काय?
तर आपल्या गुरूंबद्दल त्याच्या बद्दल आपल्या मनात एक पूज्य भावना असते. म्हणून नामस्मरण करणे किंवा कोणी इतर व्यक्तीने सांगितले म्हणून “स्वामी” नाम घेणे. जो व्यक्ती पूर्णता अंतकरणातून स्वामी नाम नामस्मरण करतो, पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करतो अशा व्यक्तीच्या मनात कधीही आपल्या स्वामिभक्ती वर शंका येत नाही.
ही अनुभवण्याची स्थिती लाभणे ही भाग्याची गोष्ट. जेव्हा आपण निष्ठेने आत्मकरनातून नाम घेतो, म्हणजेच शंकारहित भगवंताचे नामस्मरण करत असतो. आपल्या मनात येणाऱ्या शंका कुशंका या अनेक प्रकारच्या असतात. जेव्हा आपण स्वामी ध्यान करायला बसतो, तेव्हा स्वामी नामस्मरण करताना स्वामींच्या चरणाकडे जर आपलं लक्ष नसले, तर त्या नामस्मरनाचा काही उपयोग आहे कि नाही?
स्वामी चिंतन करताना किंवा नामस्मरण करताना आपली बसण्याची स्थिती कशी असावी? दृष्टी कशी असावी? अशा अनेक प्रकारच्या शंका आपल्या मनात येत असतात. थोडक्यात असे म्हणता येईल की आपण जे स्वामींचे नामस्मरण करतो ते स्वामीं पर्यंत पोहोचते की नाही? या एका शंकेत आपल्या सर्व शंकांचा समावेश आहे.
प्रिय भक्त हो स्वामी समर्थ आणि त्यांचे नाम हे एकरूपच असल्याने त्या दोघांच्या आड काहीच येऊ शकत नाही. जेव्हा आपण कुठल्या गर्दीच्या ठिकाणी जातो आणि तेव्हा आपल्या तोंडून कळत नकळत एखाद्याचे नाव उच्चारले गेले तर त्या नावाचा व्यक्ती तो लगेच मागे वळून पाहतो.
जर अशी स्थिती माणसाची होऊ शकते तर स्वामींचे नामस्मरण करून त्यांच्या भक्ताचे नाव स्वामीं पर्यंत कसे पोहोचू शकणार नाही! हे कसे शक्य आहे. खरे पाहता तर स्वामींचे नाव घेणे हे त्यांच्याच कृपेने आपल्या मुखात येते. म्हणजे त्यांचे नाव तेच घेतात जिथे स्वामींची इच्छा असते मग तुम्ही या शंकेला विसरून जा की आपण घेतले “स्वामीं” नाम हे स्वामीं पर्यंत पोहोचते की नाही?
समजा जेव्हा दोन माणसे जेवायला बसतात तेव्हा त्यातल्या एकाच्या मनात काहीसे विचार घोळत असतात त्यामुळे त्याचे जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्या व्यक्तीच्या मनात विचार रेंगाळत असले तरी त्याचे हाताने तोंडात एक एक घास घालण्याचे काम मात्र नीट चालू असते.
दुसरा व्यक्ती मात्र लक्षपूर्वक जेवण करत असतो. दोघे जेवून उठतात मग यात उपाशी कोण राहिला. यात कोणीही उपाशी राहिले नाही दोघांचीही पोट भरली. तसेच स्वामींचे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे होणार नाही. समजा आपण दुसऱ्या लांब च्या गावच्या एका अनोळखी व्यक्तीला पत्र लिहून त्याला बोलाविले.
तो आला आणि त्याने सांगितले कि, तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी आहे तर तिथे आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला आपण जवळ करतो. तसेच स्वामींनी सांगितले आहे की जिथे माझे नाव तेथे मी! तर मग आपणही स्वामींचे या वचनावर विश्वास ठेवून स्वामी नाम घ्यायला हवे.
आणि त्यातच स्वामींना पहावे असे आपल्याला का करता येऊ नये हीच आपली श्रद्धा आहे. आपण ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याचेच नाव आपण आपल्या पुढे लावतो तसेच स्वामींच्या बाबतीत करावे त्यांच्याच नावाने जगावे म्हणजे माझा सर्व करता रक्षिता एकच असून त्याच्या शिवाय माझें या जगात दुसरी कोणी नाही. या भावनेने राहावे.
या भावनेने जो कोणी स्वामींचा होतो त्याचे महत्व समर्थ स्वतः पेक्षा हि वाढवतात. “करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा। माझिया ठाई वार्ता, मी पणाची नसेची।।” आपल्याला एक स्मरण असावे की स्वामीं नामाने स्वामींचे प्राप्ती ही नक्की होणार ही मनाला खात्री असावी.
“श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ” कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरच देव आहे का? इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते.
तिथुनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असत कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडणार नाही. तोच विश्वास आपल्या स्वामींवर हवा. कधीकधी वाटतं की हे कसं होईल ते शक्य आहे का?
पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीचा कुवतीवर शक्य आणि अशक्य ते ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाहीये! स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. भिऊ नका स्वामी आपल्या पाठीशी आहेत.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.