स्वामी समर्थांच्या गुरुचरित्राचे पारायण ज्या व्यक्तींना काही कारणांमुळे करणे जमत नाही अशा व्यक्तींनी काय करावे? ।। नक्कीच हा सोपा उपाय करून पहा ।।

प्रादेशिक शिक्षण

श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।।” स्वामी समर्थांच्या गुरुचरित्राचे पारायण ज्या व्यक्तींना काही कारणांमुळे करणे जमत नाही अशा व्यक्तींनी काय करावे? हे आज आपण या पाहणार आहोत. खूप लोकांची इच्छा असते की, आपण स्वामींच्या गुरुचरित्राचे पारायण करावे.

पण हे पारायण करताना सुद्धा खूप गोष्टी लक्षात ठेवून करावे लागतात. हे बर्‍याच लोकांना करणे शक्य नसते. अशाच काही लोकांसाठी हा सोप्पा उपाय मी आज या लेखात सांगणार आहे. आपण स्वामींची सेवा करतोच पण, श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये सर्वात मोठी सेवा मानली जाते. ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण.

खूप लोक असे आहेत जे वर्षातून दोन ते तीन वेळा पारायण करतात. काहीजण दत्तजयंतीच्या एक आठवडा अगोदर पासून पारायणाला सुरुवात करतात. तर काही लोक तीन दिवस करतात. काही सात दिवस, काही लोक नवरात्रीमध्ये पारायण करतात.

पारायण केल्याने आपले मन शांत राहते व मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. स्वामी समर्थांची कृपा दृष्टी राहते व स्वामींच्या सेवेचे लाभही मिळते. तसेच पारायणाचे नियम खूप कठीण आणि कडक असतात ते पाळावेच लागतात.अन्यथा पारायण केल्याचे फळ हे मिळत नाही.

स्वामी प्रिय भक्त हो नियमांचे पारायण दरम्यान पालन करणे गरजेचे असते. बऱ्याच लोकांना या पारायणाचे नियम पालन करणे शक्य नसते. कोणाला आजारपणामुळे, वयोमानामुळे अजून काही समस्या असतात. आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये नोकरीसाठी, पोटासाठी धावपळ करावी लागते.

आशा बऱ्याच गिस्टीनमुळे बर्याच लोकांना हे गुरुचरित्राचे पारायण करायला मिळत नाही किंवा जमत नाही. ज्या लोकांना जमत नाही किंवा शक्य होत नाही. तर अशा लोकांनी काय करावे? हे आपण आज पाहणार आहोत. ज्यांना हे 52 अध्याय असलेले पारायण करायला जमत नाही, किंवा शक्य होत नाही.

त्यांनी हा श्लोक रोज मनोभावाने बोलावा. रोज सकाळी उठून जेव्हा देवपूजा करता तेव्हा हा चार ओळींचा श्लोक नक्की वाचावा किंवा बोलावा. ।। दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठपिठापूरी, यामागे दुसरा नरसिंहसरस्वती करंजग्रमांतरी तीर्थे हिंडत पातला भिलूवाडीचेये संगमा तेथूनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा ।।

तर जसे आपण आता याचे श्रवण केले यावरून तुम्हाला कळले असेल की हा अगदी सरळ आणि सोपा चार ओळींचा श्लोक आहे. गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ होणार आहेत, तेच लाभ हे पठण केल्यानंतर सुद्धा होणार आहेत. हे पठण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते व या श्लोकांचे पठण केल्याने जे काही लाभ असतात ते सर्व मिळतात.

श्री स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात. आपण कधी चुकलो तर आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला मार्ग भेटला की त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात म्हणजे सहन करण्याची शक्ती आणि लढण्याचे सामर्थ्य हे स्वामी महाराज आपल्याला देत असतात.

हा श्लोक एका कागदावर लिहून ठेवा आणि रोज सकाळी देवपूजा करताना याचे पठण करा. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते आणि पारायण केल्याचे पुण्य सुद्धा आपल्याला लाभेल. “अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.” श्री स्वामी समर्थ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *