“श्री स्वामी समर्थ” आपले स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभी असतात. प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी स्वामी आपल्या भक्तांना कसे मदत करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. हा अनुभव एका स्वामी सेवेकरी ताईचा आहे. स्वामी समर्थ महाराज यांना कोटी-कोटी प्रणाम. मला आलेल्या स्वामींचे अनुभव सांगायला मी इथे सुरुवात करते.
हा अनुभव माझ्या मुलाला आलेला आहे. दि. 21, मंगळवार या दिवशी माझा अकरा वर्षाचा मुलगा शाळेमधून घराकडे येत होता व अचानक त्याच्या पाठीमागे एक कुत्रा लागला व माझा मुलगा घाबरून पुढे पळाला.पळते वेळी तो खूप जोरात रस्त्यावर पडला व त्याला खूप लागले.
पण त्याच दिवशी सकाळी मी पूजा करते वेळी स्वामींची मूर्ती खाली पडली. ते मला कळलेच नाही. ती पटकन उचलली व स्वामींची माफी मागितली, पण नंतर मला काही समाधान वाटेनाच पण माझा मुलगा अर्ध्या तासाने घरी आला. तो रडतच होता, मग मी त्याला औषध दिल.
दुसऱ्या दिवशी त्याच्या लक्षात आले की, तो ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी एक रिक्षावाले काका आले होते व ते त्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ बाळा उठ आज मंगळवार आहे. नंतर त्यांनी त्याला उठवले व त्याला म्हणाले. तुला माझ्या रिक्षातून घरी सोडतो.
पण तो त्याच्या मित्रासोबत घरी आला. त्याने मला सांगितले कि त्या काकांच्या गळ्यामध्ये प्रदिप दादा जशी माळ घालतात, तशीच माळ त्यांच्या गळ्यात व हातात होती. कपाळावर अष्टगंध होते. ते प्रदिप दादा होते. आई त्यांनी मला वाचवले, नाहीतर ते कुत्र मला चावल असतं. मला वाटतं की, श्री स्वामींनी मला ते अगोदरच संकेत दिले होते. श्री स्वामी आईला कोटी कोटी प्रणाम.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.