नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपण नित्यनियमाने जर मनापासून सात्विक उपासना करत असाल तर आपल्याला दैवत्व आहे याची जाणीव अवश्य होते. काही साधकांना, काही सेवेकऱ्यांना स्वामी दृष्टांत देत असतात. याचा अर्थ असा होतो की, स्वामी शक्ती त्या साधकाच्या पाठीशी आहे. काही साधकांना अचानक पहाटे जाग येते पण त्यांना समजत नाही असे का घडते आहे.
तर याचा अर्थ असा आहे की, स्वामी शक्ती ह्या ब्रह्म मुहूर्तावर जागृत असतात आणि त्यांना तुम्हाला संकेत द्यायचे असतात. ब्रह्म समयी तू झोपून न राहाता उठ आणि माझी आराधना कर. माझ्याकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घे. काही साधकांना उपासना करताना अचानक मंद सुगंध येतो.
याचा अर्थ असा आहे की, स्वामी शक्ती आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या साधकाला करुन देत असते. काही साधकांना अचानक थंड हवेची झुळूक लागते. अचानक अंगावर शहारे येतात , तर काही साधकांना आजूबाजूला कोणी तरी आहे असा भास होत असतात.
तर काही साधकांना देवघरातील शंख हालल्याची जाणीव होते. याचा अर्थ स्वामी शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे. आणि ती आपल्या उपासनेला सहाय्य करत आहे. हे अनुभव उपासना करणाऱ्या अनेक साधकांना येत असतात,तर यांना या गोष्टी उमजत नाहीत तर असे अनुभव कोणाला येत असतील तर त्यांची उपासना उच्चतोम आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.
तरी या स्वामी शक्तीला आपण कशा तऱ्हेने अनुकूल करून घ्यावे, हे आज आपण बघणार आहोत. प्रथम तर आपले चरित्र स्वच्छ ठेवावा. मौन पाळा व शांत रहावे. आपला आहार-विहार सात्विक असावा. जास्तीत जास्त जप करावा, नामस्मरण करावं. देवपूजा करताना पारायण करताना, जप तप करताना आपण स्वतः आसनावर बसावे.
आपल्या एका बाजूला आसन ठेवावं आणि त्यावर एक फुल वाहावे. म्हणजे आपल्या आजूबाजूला संचारित असलेल्या स्वामी शक्तीला आपण मान देऊन आमंत्रित केल्याचं समजतं जात. पहाटे जाग येणाऱ्या साधकाने सुचिरभूत होऊन जमल्यास देवपूजा करणे किंवा जपासाठीसुध्छा बसावे किंवा नामस्मरण तरी करावं.
आळस न करता ब्रह्म मुहूर्तावर उपासना करणाऱ्यांना स्वामींचा आशीर्वाद, देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच आणि त्यांचे शुभ फळ प्राप्त त्वरित होते. पण हे संकेत आहेत. स्वामी शक्ती असल्या सोबत असल्याचे. तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर समजून जा तुमच्या आजूबाजूलाही स्वामी शक्ती आहे. “श्री स्वामी समर्थ” ” जय जय स्वामी समर्थ”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.