“श्री स्वामी समर्थ” भक्त कल्याणकारक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य कथा. स्वामी महाराज आई आहेत. स्वामींचे आपल्या बाळावर खूप प्रेम आहे. बाळ कसे ही असू दे स्वामीना ते प्रियच असते. स्वामींच्या दरबारात अनेक सेवेकरी होते. प्रत्येकावरच स्वामीची सारखीच प्रीती होती.
जर कोणावर स्वामी रागावले तर त्यामागे स्वामीचे प्रेमच होते. त्यातीलच एक भक्त “चोळप्पा“. ज्या परबब्रह्मच्या प्राप्तीसाठी योगी, मुनी, संत महंत दिवस रात्र ध्यास घेतात ते निर्गुण निराकार चैतन्य, सगून रुपात स्वतःहून चोळप्पा यांच्या घरी आले. खरोखरच चोळप्पा किती पुण्यवान होते.
स्वामींनीं तिथे अनेक लीला केल्या आणि याची श्रवण अनेकदा स्वामींनी त्यांच्या लीलांमध्ये केले. त्या दिवशी स्वामींची स्वारी वाडी नावाच्या गावी होती. केजधारूरचे देशपांडे यांनी सर्व सेवेकर्यांनी भोजन घातले. चोळप्पा यांचे निर्वाण लवकर होणे निश्चित आहे याचे संकेत स्वामींनी दिले होते.
आणि तो दिवस आला या दिवशी दुपारच्या वेळेस चोळोप्पांस त्रास होऊ लागला. त्यांची घाबरलेली अवस्था बघून घरातील सर्व मंडळी घाबरली. देशपांडे यांनी गाडीमध्येच स्वामींना अक्कलकोटी आणलं. स्वामींचे चोळोप्पांवर खूप प्रेम होते. तिकडे चोळोप्पांना त्रास सुरू झाला, तर इकडे स्वामींच्या शरीरामध्ये भयंकर ताप चढला होता.
शके १७९९ अश्विन शुद्ध नवमीस चोळोप्पांचे निर्वाण झाले. त्या दिवशी स्वामींची उदास वृत्ती बघून राणीसाहेबांनी अतिशय नम्रतेने स्वामींना विचारले, महाराज आज आपली वृत्ती उदास का आहेत. तेव्हा स्वामी अतिशय हळुवार स्वरात बोलले, काय करू चोळ्याची संगत सुटली, तो वियोग सहन होत नाही ग…!
चोळ्यावाचुन कुठे जाऊ? लिला कोणास दाखवू? आज सात जन्माचा सोबती गेला, आता आम्हीही लवकरच जाऊ…! स्वामींचे हे बोलणे ऐकून राणीसाहेबांच्या डोळ्यात पाणीच आले. स्वामी आई आहेत, आणि स्वामींचे आपल्या बाळांवर किती प्रेम असते हे त्यांना स्पष्ट दिसले.
स्वामींची हि लीला खुप बोध देणारी आहे. आजच्या लिलेतून स्वामींचे आपल्या बाळावर असलेले प्रेमाचे सर्वोच्च अभिव्यक्ती दिसते. स्वामीभक्तहो चोळप्पांचे चरित्र आपण बघितले तर त्यामध्ये अनेक चढ-उतार आहेत, आणि प्रसंगी स्वामींनी त्यांना रागावले शिव्या सुद्धा दिल्या.
इतकेच नव्हे तर चोळोप्पांचे वर्तमान कर्म आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष येणाऱ्या प्रार्थनेतून त्यांच्या लवकर निर्वाण होणार आहे याचे संकेत सुद्धा दिले होते. थोडक्यात स्वामी त्यांना सतत मार्गदर्शन करत होते. आणि ह्या सर्व गोष्टी मागे स्वामींचे प्रेमच होते. चोळ्याची संगत सुटली तो वियोग सहन होत नाही ग.
या वाक्यावरून स्वामींचे चोळाप्पाबद्दलचे प्रेम अगदी स्पष्ट दिसते. स्वामीवणीतून दिसते की ईश्वर आपल्या भक्तांशिवाय अपुरा आहे. जशी भक्ताना ईश्वराची गरज आहे, तशीच ईश्वराला सुद्धा भक्ताची गरज आहे. हा स्पष्ट बोध आपणास दिला आहे. म्हणूनच स्वामीभक्तहो आज आपल्या जीवनात कितीही विपरीत घटना करू द्या.
झालेली विपरीत घटना बघून नक्कीच आपल्या मानवी बुद्धीला वाईट वाटू शकते, पण असे घडायला नको होते असेही वाटू शकते. परंतु जर आपण ईश्वरी बुद्दीमत्तेच्या दृष्टीने बघितले तर नक्कीच त्या मागे सर्वांचेच हित आहे हे समजते. ईश्वराचे आपल्यावर प्रेमच आहे हे दिसते. आणि म्हणून खचून जायचे नाही.
स्वामींचे आपल्यावर खूप प्रेम आहे, स्वामींना आपली काळजी आहे, स्वामी सर्व व्यवस्थित करतील असा विश्वास ठेवून आपले वर्तमानातील कर्म करत राहायचे आहे. चला तर मग स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था तू प्रेमाचा अथांग सागर आहेस. फक्त जसे भक्त प्रेमाने तुझी भक्ती करतात त्याहीपेक्षा जास्त प्रेम तू तुझ्या भक्तांवर करतो.
तू सुद्धा तुझ्या भक्तांशिवाय राहू शकत नाही. तुला तुझ्या भक्तांची काळजी आहे, आज आम्हा बालकांना ही समज दिली तुला त्यासाठी धन्यवाद. अशीच तुझी अनंत भक्ती दे, अतूट श्रद्धा असू देत. “अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय!”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.