स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करत नाहीत का? ।। असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल नाही का. ।। जाणून घ्या किशोरी ताईंचा याबद्दलचा अनुभव या लेखात !

प्रादेशिक

“श्री स्वामी समर्थ” आम्ही भक्तगणांचे मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामीभक्त हो श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला किशोरी ताईंना आलेला समर्थांचा अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे.

श्री स्वामी समर्थ माझे नाव किशोरी मी पुण्यामध्ये राहते. मला काही दिवसांपूर्वी श्री श्रीरंग काळे यांनी गुरुचरित्र पारायण करायला सांगितले. सात पारायण करायला सांगितले होते, त्यातले माझे तीन पारायण पूर्ण झाले.खर सांगायचं झालं तर मी माझ्या लग्नाच्या अगोदर पासूनच स्वामींची थोडी-थोडी सेवा करायची.

माझ्या आईचा स्वामींवर खूप विश्वास आणि श्रद्धा आहे, पण माझ्या मनासारख्या काही गोष्टी न झाल्यामुळे मी स्वामींवर आपोआपच नाराज झाले. त्यानंतर मी सेवा केली नाही. माझे लग्न झाले माझ्या वैवाहिक जीवनात प्रचंड अडचणी आहेत. आजही आहेत पण मला नेहमी तेच वाटायचे की मी काय असं केलं असेल म्हणून स्वामींनी माझ्या आयुष्यात इतका त्रास दिला आहे.

स्वामींनी माझं नशीब असं का लिहिल असावा, पण यातूनही कधी कधी मी एकटी बसलेली की विचार करायची एवढ्या प्रोब्लेम फेस करण्याची ताकद माझ्यात आली कुठून असेल? मग हळूहळू मी युट्युब वर स्वामींचे व्हिडिओ बघायला लागले आणि त्यातूनच मला श्रीरंग दादांचा नंबर मिळाला.

मी त्यांना खूप कॉल केले पण ते लागले नाही. मग एक दिवस मी त्यांना मेसेज करून माझी सगळी अडचण सांगितली. श्रीरंग दादांनी मला सात पारायण करायला लावली. पण मी जशी जशी पारायण करायला सुरुवात केली तसतसे मला खूप प्रसन्न वाटायला लागलं आणि मी परत स्वामींची जमेल तशी सेवा करायला सुरुवात केली.

मागच्या महिन्यात मी आणि माझा एक मित्र स्वामींन बद्दल बोलत होतो. त्याचे ही स्वामींवर खूप श्रद्धा आहे आणि बोलता बोलता मी त्याला म्हणाले की मला अक्कलकोट ला जायची खूप इच्छा आहे, पण काय माहित स्वामी माझी ती इच्छा कधी पूर्ण करतात.

आणि आता 1८ ऑक्टोबरला मी गुरुचरित्र पारायण करत होते ते सात दिवसांची होते आणि त्यातच मला माझ्या खास मैत्रिणीचा फोन आला आणि ती म्हणाली चल अक्कलकोट ला जायचं आहे तू येणार ना आणि मी लगेच तिला हो म्हणून सांगितलं त्यानुसार आम्ही सगळ्या सोयी बघून 24 ऑक्टोबरला अक्कलकोटला जायला निघालो.

पण हे सगळं होण्या अगोदर पासूनच मला स्वामींची मुर्ती घरात स्थापन करायची होती तर माझ्या मनाला खूप आनंद झाला होता त्यापेक्षाही चांगली गोष्ट काय असू शकते की मी प्रत्यक्ष अक्कलकोटला जाऊन स्वामींची मूर्ती घेऊन येणार आहे आणि ती मूर्ती मी अक्कलकोटला जाऊन घेतली 28 ऑक्टोबर गुरुवार रोजी स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून स्थापना केली.

सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की मी जरी कधी कधी स्वामींवर नाराज झाले असले तरी त्यांनीच मला खूप ताकद दिली आहे. कुठेतरी स्वामी माझ्यासोबत नक्कीच आहेत आणि माझे कधी काही चुकत असेल किंवा चुकले असेल तर स्वामींनी मला माफ करावं आणि नेहमी माझ्यासोबत राहावं एवढे स्वामी चरणी प्रार्थना आहे.

मला हा अनुभव सांगायची संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रीरंग दादा मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. माहित नाही स्वामी ते कधी पूर्ण करतील.

श्रीरंग दादा तुमचा आशीर्वाद सदैव आम्हा सर्वांसोबत असुदेत हीच स्वामींचारणी प्रार्थना. तर कसा वाटला हा अनुभव. श्री स्वामी समर्थ महाराजानच महिमा संबंध जगभरात गाजावा ही आपणा सर्वांची कामना आहे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *