सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची भेट टीव्ही मालिका पवित्र रिश्ताच्या सेटवर झाली. दोघे लवकरच मित्र बनले. सुशांतच्या गोष्टी अंकिताला आवडण्यास सुरवात झाली आणि अंकिताच्या स्वभावामुळे सुशांत तिच्याकडे आकर्षित होत गेला.
मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्यास जास्त वेळ लागला नाही. ते दोघेही एकमेकांना पसंद करू लागले आणि त्यांची हीच केमिस्ट्री त्यांच्या कामामध्येही दिसू लागली आणि यामुळे पवित्र रिश्ता हा शो सुपरहिट झाला.
सुशांत आणि अंकिता हे त्यांच्या नात्याबद्दल फारसे बोले नाही, तर काही लपवले ही नाही. सोबत फिरणे, राहणे, सुट्टी घालवणे, मास्ती करणे हे सगळे फोटो ते शेयर करायचे. असे वाटायला लागले कि अंकिता आणि सुशांत कधी वेगळे होऊ शकत नाही. दोघे त्यांच्या नात्याला नेक्स्ट लेवल पर्यंत नेवूनच मानतील.
अचानक जानेवारी २०१६ मध्ये त्या दोघांमधील भांडणाची बातमी येऊ लागली. असं वाटत होतं की ही केवळ अफवा आहे कारण ग्लॅमरच्या जगात अश्या अनेक अफवा निर्माण होत असतात. परंतु कालांतराने हे ज्ञात झाले की या गोष्टी सत्य आहेत. सुशांत आणि अंकिता मधील नातं हे संपत आल होत. चाहत्यांना अजूनही आशा आहे की बर्याचदा प्रियसी-प्रियकरामध्ये भांडणे होत असतात, आणि भांडणे झाली तरीही लवकरच दोघ एकत्र येतील, परंतु तसे झाले नाही.
ब्रेकअपचे असे कारण समोर आले की अंकिताला सुशांत सोबत लग्न करावे अशी इच्छा आहे, पण सुशांत लग्न साठी तयार नव्हता. सुशांतला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायच होतं. त्याचा विश्वास होता की जर त्याने लग्न केले तर त्याचे लक्ष विचलित होईल. अखेर, कोणताही करार न करता ते दोघेही वेगळे झाले. अंकितापासून वेगळे झाल्यानंतर सुशांतचे नाव कृती सॅनॉन, सारा अली खान आणि रिया चक्रवर्ती यांच्याशी देखील जोडले गेले, पण या नात्यामध्ये अंकिता सारखी केमेस्ट्री दिसून अली नाही.
सुशांतवर उपचार करणार्या मानसोपचार तज्ज्ञाने देखील असेही म्हटले आहे की सुशांत अंकितावर खूप प्रेम करत होता आणि तिच्यापासून वेगळे झाल्यानंतर त्याला एकटे पणा वाटू लागला होता. सुशांतच्या मित्रांचा असा विश्वास आहे की सुशांतच अंकितावर खरं प्रेम होतं. अंकिता जर तिथे असती तर सुशांतला तिने असे पाऊल उचलू दिले नसते. कदाचित तो आता आमच्यामध्ये असता.
सुशांतच्या मित्राने दिलेली सुशांतसोबत बनवलेली दोघांची नेमप्लेट अजूनही अंकिताच्या घरी आहे. दोघांची नावे त्या नेमप्लेट मध्ये लिहिलेली आहेत. अंकिताला अशी आशा होती की तिच्या प्रेमासाठी सुशांत एक दिवस तिच्याकडे परत येईल.
सुशांत ने इतर टीव्ही अभिनेत्री त्यांच्या विषयी जे काही बोलायचे त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, परंतु त्याने पुष्टी केली की त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबांध आहेत. त्याने नुकतेच अंकिताला एका प्रोजेक्टबद्दल सांगितले ज्याबद्दल तो खूप उत्सुक आहे हे लक्ष्यात येत होते. तो म्हणाला की अंकिता खूपच हुशार असून तिची अष्टपैलूपणा दर्शविण्यासाठी तिला एका चांगल्या चित्रपटाची आवश्यकता आहे.
सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट सुस्ट्रीला हादरा बसला आहे. सुशांत अंकिता लोखंडेशी बर्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होता आणि २०११ मध्ये एका डान्स रियालिटी शोच्या सेटवर त्याने तिच्याशी लग्न करनार असेही सांगितले होते. पूर्वीच्या एका दैनिक पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुशांतने तत्कालीन मैत्रीण अंकिताबरोबरच्या त्याच्या ब्रेकअपबद्दल आणि पुन्हा प्रेमात पडण्याच्या कल्पनेविषयी खुलासा केला होता.