सध्या महाराष्ट्रमधील घडत असलेल्या घडामोडींवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी ‘चल रे खोक्या टुनुक टुनुक’ असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली.
आणि त्यामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केल्याचे दिसून आले. दरम्यान, “आम्ही लहानपणी चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणायचो मात्र आता राज्याचे सध्याचे राजकारणात पाहता चल रे खोक्या, टुनुक टुनुक असे म्हणावे लागेल ”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी यावेळी सत्ताधारी पक्षाची खिल्ली उडवली.
तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सारवासारव परिषद घेतल्याची टीका करत काल जी महापत्रकार परिषद झाली त्यानंतर 26 जानेवारीपासून राज्यस्तरीय दौरा आखला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच लवकरच सविस्तर माहिती देऊ”, असं सुषमा अंधारे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याच्यावर सुद्धा सडकून टीका केली, गिरे तो भी टांग उपर असं म्हणत ते खोट्याचं खरं करत आहेत. तसेच शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, रामदास कदम हे नेते क्रमांक एकवर होते. आता ते क्रमांक 5 वर गेले याचं वाईट वाटतं, असं देखील सुषमा अंधारे यावेळी बोलतांना म्हणाल्या.
तसेच काल सगळं उघड झाल्यामुळे आता राहुल नार्वेकर यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत आणि पक्षाची 2013 ला निवडणूक झाली, त्यांना 1999 ची घटना मान्य करायची असेल तर त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे नेते नाहीत, तसेच उपनेते देखील नाहीत. तसेच गजानन कीर्तिकर, रामदास साहेब हे मागे गेले शिंदे पुढे आले.
या सगळ्याचा AB फॉर्म तुम्ही अमान्य करणार का?, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाहीत तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे का झिजवले? असा प्रश्न देखील विचारला आहे. तसेच 70-72 वर घरे घेणारे नेते त्यांच्याशी बोलणी का नाही गेली? तसेच 1999 साली तेव्हाच पक्ष का नाही गोठला? नोटीस का नाही पाठवली?”
असे असे अनेक प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारले आहेत. तसेच दुसरीकडे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपच्या मोठ्या नेत्याकडून मोठी ऑफर आल्याचा दावा केला असून याबाबत बोलतांना सुषमा अंधारे यांनी भूमिका मांडली.