रोजच्या जीवनात भरपूर मागणी असलेला रवा आणि मैदा निर्मितीचा व्यवसाय कसा सुरु करावा, सरकारकडून मिळणार २५ टक्के अनुदान, जाणून घ्या

उधोगविश्व

मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी, भरपूर पैसे आवश्यक आहेत, परंतु टियर-टू टियर-थ्री शहरे, म्हणजेच तुम्ही लहान शहरांमध्ये कमी पैश्यांमध्ये एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकता, ज्यामुळे तुमची चांगली कमाई होईल.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा खादी ग्रामोद्योग कार्यक्रमांतर्गत सरकार कर्ज व अनुदान देते अशा व्यवसायांना सरकार देखील पाठिंबा देत आहे. या अर्थसंकल्पात या दोन्ही कार्यक्रमांचे वाटप लक्षणीय वाढले आहे जेणेकरून अधिकाधिक लोक व्यवसाय सुरू करु शकतील.

अशा एका व्यवसायाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 80 हजार रुपयांची गरज आहे, उर्वरित 90 टक्के कर्ज तुम्हाला सरकारकडून मिळेल आणि 15 ते 25 टक्क्यांपर्यंत अनुदानही दिले जाईल. तुम्ही गव्हाच्या पीठाची गिरणी युनिट तयार करू शकता आणि मैदा, रवा सारखी उत्पादने पॅक करून बाजारात विक्री करू शकता. या उत्पादनांना हॉटेल, बेकरीमध्ये देखील खूप मागणी आहे. आजकाल प्रत्येक घरात आटा, रवा, मैदा यांचा रोज मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

तुम्ही रवा किंवा मैदा या व्यवसायातून देखील खूप नफा मिळवू शकता. रवा किंवा मैदा बनवण्यासाठी फक्त गहू आवश्यक असतो आणि तुम्हाला तो सहज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. खूप कमी लोकांना माहित आहे कि मैदा गव्हापासून बनवता. रवा किंवा मैदा बनवण्यासाठी गहू आधी स्वच्छ करून ते गिरणी मध्ये टाकले जातात त्यामध्ये गव्हाचा वरचा भाग निघून जातो.

गव्हाचा वरचा भाग निघून गेल्यानंतर फक्त आतला भाग शिल्लक राहतो हा पूर्णपणे सफेद होतो, त्यानंतर हा भाग आणखी थोडा बारीक केला जातो त्यातून भुसा काढला जातो आणि उरलेला भाग म्हणजे रवा तयार होतो. त्यानंतर त्यालाच जास्त प्रमाणात बारीक केले असता त्यापासून बारीक पाउडर तयार होते त्यालाच मैदा असे म्हणतात.

यामध्ये तुम्ही रवा, मैदा किंवा आटा यांचे kg नुसार व्यवस्थित पॅकिंग करून ते बाजारात विकू शकता. किंवा तुम्ही हॉटेल, बेकरीमध्ये खूप मागणी असल्याने त्यांच्यासोबत टायप करून तुमचे प्रॉडक्ट विकू शकता.किंवा मार्केटिंग करून तुमचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाईल आणि चांगले प्रॉफिट मिळेल. .

यामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा चांगला ब्रँड हि तयार करू शकता.राष्ट्रीय,राज्य क्षेत्र नियमानानुसार बिजनेस रेजिस्ट्रेशन खूप महत्वाचे आहे, पण ग्रामीण किंवा छोट्या शहरात केला जाणारा आटा, रवा, मैदा बिजनेस यासाठी बिजनेस रेजिस्ट्रेशनची गरज नाही. तरीही तुम्हाला एकदा राज्य क्षेत्र नियम चेक करून घ्या जर तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँडच्या नावाने आटा, रवा,मैदा पॅकिंग करून विकणार असाल तर FSSAI License किंवा ट्रेडमार्क ची गरज असू शकते.

काय असेल प्रकल्पाची किंमत: खादी व ग्रामोद्योग आयोगानुसार तुम्हाला आटा किंवा मैदा, रवा बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार करावा लागेल. कमीशन द्वारे एक प्रकल्प प्रोफाइल तयार केली गेली आहे, त्यानुसार तुम्ही सुमारे 8 लाख 85 हजार रुपये प्रोजेक्‍ट कॉस्‍ट पासून फ्लोर मिल सुरू करू शकता.

यासाठी 750 चौरस फूट जागेवर इमारतीच्या शेडवर सुमारे 1.5 लाख रुपये आणि इक्विपमेंटवर सुमारे साडेचार लाख रुपये पर्यंत खर्च करावा लागेल. तर सुमारे 2 लाख 85 हजार रुपये कार्यरत भांडवलावर खर्च होईल. म्हणजे तुमच्या प्रकल्पाची किंमत 8 लाख 85 हजार रुपये असेल. यातून तुम्हाला 90% कर्ज भेटेल.तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा बिजनेस सुरु करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *