एसटीत महाभरती!! या दोन्ही उमेदवारांसाठी मिळणात संधी..

Pune प्रादेशिक

महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजे ST महामंडळाच्या पुणे विभागात शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात शिकाऊ उमेदवार काही विशेष पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची चर्चा होत आहे. यासाठी अट म्हणून उमेदवाराने 10 उत्तीर्ण आणि सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असून या पदांसाठीची जाहिरात www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे सांगितले जाते.

ST या पुणे विभागातील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज अंतिम तारीख 22 जानेवारी असून या शिकाऊ उमेदवार भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 300 रुपयांचा धनार्कष एसआरटीसी एसटी फंड अकाउंट पुणे या नावाने काढून तो अर्जासोबत जोडावा लागेल. तसेच इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक, एसटी विभागीय कार्यालय आणि शंकरशेठ रस्ता व पुणे या पत्त्यावर 16 ते 22 जानेवारी या कालावधीत समक्ष हजर राहून सकाळी 10 ते सायंकाळी 5.10 या कार्यालयीन वेळेत सादर करावी, अशी माहिती विभाग नियंत्रक कैलास पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

या विशेष पदांसाठी होणार भरती –

◆मोटार मेकॅनिक व्हेईकल:
पदे 71, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये मोटार यांत्रिक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणें आवश्यक

◆ऑटो इलेक्ट्रिशियन:
पदे 25, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणें आवश्यक

◆मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर:
पदे 32, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये शीट मेटल अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणें आवश्यक

◆मेकॅनिक डिझेल:
पदे 26, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य

◆वेल्डर:
पदे 20, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये वेल्डर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य

◆पेंटर:
पदे 4, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये पेंटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य

◆मेकॅनिक (एअर कंडिशन):
पदे 4, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये यांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणें आवश्यक

◆टर्नर :
पदे 4, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये टर्नर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणें आवश्यक

◆बेंच फिटर/फिटर :
पदे 2, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये बेंच फिटर/फिटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणें आवश्यक

◆कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅमिंग असिस्टंट:
पदे 4, दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय विभागामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर अभ्यासक्रम ही परीक्षा उत्तीर्ण असणें आवश्यक..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *