कोणत्याही महिन्यातील गुरुवार पासून सुरुवात करता येते, नवव्या गुरुवारी उद्यापन करता येते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला आरंभ करावा. व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून सुचिर्भूत व्हावे, दुपारी फळहार व दूध, उपवासाला चालणारे पदार्थ खावेत.
संपूर्ण पूजा झालेवर स्वामींना नेवेद्य दाखवून उपवास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहेर सुतक असल्यास व्रताचरण करू नये, उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अश्या कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवार ची संख्या पूर्ण करून उद्यापन करावे.
अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये, दिवसभर ” श्री स्वामी समर्थ ” या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्र, अमावस्या आल्यास फक्त त्यादिवशी उपवास करावा पाठ मांडू नये, तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे.
शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब, सहपरिवार दर्षणकरिता बोलवावे.हे व्रत कोणत्याही जाती-धर्माचे स्त्री-पुरूष, मुले-मुली, यांना करता येते. सहपत्निक केल्यास अधिक उत्तम फल मिळते. पूजेकरीता सुपारी, फळे उत्तम प्रतीची असावी, फुले, अगरबत्ती, धूप सुहासिक असावा, दिवा शुद्ध तुपाचा असावा.
रात्री भजन, गायन, कीर्तन, यापैकी कार्यक्रम ठेवता येतात. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ एनाऱ्या प्रत्येकास या पोथीची एकेक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. नऊ गुरुवार चे व्रत पूर्ण होईपर्यंत, कावळ्याला दहीभात द्यावा, मुंग्यांना चिमुटभर साखर ठेवावी, गायीला नेवेद्य द्यावा, कुत्र्याला पोळी द्यावी, गरिबाला शिजवलेले अन्न तुम्ही देऊ शकता.
पूजेसाठी करावयाची पूजाविधी: जमिनीवर चौरंग ठेवून सहभौवती हळदीकंकू वापरून रांगोळी काढावी, त्यामधे स्वस्तिक काढावे. त्यावर चौरंग ठेवून त्यावर भगवे किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंध-आक्षदा, तुळशीपत्र ठेवून त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
वडाच्या पानाचा देठ भिंतीकडिल बाजूस करावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध-आक्षदा ठेवून त्यावर गणपती पुजेकरीता सुपारी ठेवावी, डाव्या बाजूला घंटा ठेवावी. चौरंगाच्या शेजारी समई लावावी, सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा, चौरांगाला एका बाजूला एक नारळ व पानावर विडा ठेवावा.
पूजेसाठी लागणारे साहित्य : ताटात हळदकुंकू, अक्षदा, तुपाचा दिवा, कापसाची दोन वस्त्रे, स्वामींना पांघरायलां भगवे वस्त्रे, गुलखोबर, एक तामण, तांब्या, पळी, अष्टगंध, हिना अत्तर, उगळलेळ चंदन, जाणव, विविध फुले. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधचा टिळा लावला.
फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेवून आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा, आणि ते पाणी तमानात सोडावे. गणपतीचे ध्यान करून, ” ओम गण गणपतये नमः एकदंताय विघ्णेहे, वक्रतुंडाय धीमहि, तंनोदंती प्रचोदया ” असा मंत्र म्हणून गणपती पुजनाकरीता
मांडलेल्या सूपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे, हळदकुंकू वाहून दुर्वा, लालफुले, बेल, कापसाची दोन वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. धुप-दिप, अगरबत्ती दाखवावी, तुपाचा दिवा ओवाळावा, गुळखोब्र्याचा नेवेद्य दाखवावा.
त्यानंतर ” वक्रतुंड महाकय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्न कुरुमेह देव सर्वकार्येषु सर्वदा” असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी, घंटेला हळदकुंकू, अक्षता, गंध, फुल अर्पण करून अगरबत्ती,धूप दाखवावा, दीप ओवाळून घंटा वाजवावी आणि नमस्कार करावा.
याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता, नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने आपली जे काय इच्छा असते, मनोकामना असते ती पूर्ण होते. जे संकट असतात, दुःख असतात, समस्या असतात त्या दूर होतात, स्वामींची कृपा होते. या व्रताचा लाभ होईल.