सोमवारी चुकूनही नका करू ही ५ कामे नाहीतर भोलेनाथ कधीही माफ करणार नाहीत ।। कोणती आहेत अशी कामे जाणून घ्या या लेखात !

प्रादेशिक शिक्षण

आज सोमवार महादेवाचा सर्वात आवडता वार. या दिवशी महादेवाची पूजा आराधना केली तर ते खूप प्रसन्न होतात. थोड्याशा पूजनेही ते प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना भोळा महादेव म्हटले जाते. ते जितक्या लवकर प्रसन्न होतात, तितक्या लवकर ते क्रोधित ही होतात.

आणि एकदा का ते क्रोधित झाले की त्यांच्या क्रोधा पासून करून देत आहे होतात आणि एकदा का ते क्रोधीत झाले तर त्यांच्या क्रोधा पासून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणून सोमवारी पूजा करताना चुकूनही ही कामे करू नका. नाहीतर, तुम्हाला त्यांच्या क्रोधाचा सामना करावा लागेल.

सोमवारी काळे कपडे घालून महादेवांच्या मंदिरात जाऊ नये. कारण, काळा रंग महादेवांना अजिबात आवडत नाही. म्हणून पांढरे, आकाशी, हिरवे, ऑरेंज,अशा रंगाचे जे महादेवांना प्रिय आहेत असे कपडे घालावेत. काही व्यक्तींचा आहार मांसाहार असू शकतो. परंतु, सोमवारी मांसाहार करून महादेवांच्या मंदिरात कधीही जाऊ नये.

कारण, महादेवांना जनावरे खूप आवडतात, आपण आपले पोट भरण्यासाठी जनावरांना मारून खातो हे महादेवांना कधीच आवडणार नाही, म्हणून सोमवारी मांसाहार करू नये. आणि जर केलेच असेल तर महादेवांच्या मंदिरात जाऊ नये. महादेव शक्तीला सर्वस्व मानतात. आणि शक्ती म्हणजे स्त्री. म्हणून स्त्रीचा अपमान महादेव कधीही सहन करू शकत नाही.

तसे तर कधीही स्त्रीचा अपमान करू नये, परंतु जर सोमवारी तुमच्या हातून एखाद्या स्त्रीचा अपमान झाला किंवा भांडण झाले, आणि ती स्त्री जर शिवभक्त असेल तर, महादेवांच्या क्रोधापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. सर्वांच्या घरात भांडण तंटे होतात, परंतू जर सोमवारी घरात महादेवांची पूजन करायचे असेल, तर घरात शांतता ठेवावी.

ज्या घरात भांडण तंटे होतात, रुसवा,फुगवा असेल, अशा घरी महादेव अजिबात थांबत नाही. सोमवारी कोणाबद्दल वाईट बोलू नये. कोणाला चुकली करणे, कोणाला मारणे, कोणाबद्दल अपशब्द काढणे, अशी कामे करू नये. काया, वाचा व मनाने शुद्ध राहून महादेवांनी आराधना करावी. महादेवांना जनावरे खूप आवडतात.

म्हणून त्यांचे वाहन नंदी आहे व त्यांनी गळ्यात सापाच्या माळा धारण केल्या आहेत. म्हणून महादेवांच्या पूजेत त्यांनाही स्थान आहे. आपण मंदिरात गेलो व महादेवाची पूजा केली, परंतु नंदीची केले नाही, तर आपली पूजा वाया जाते. म्हणून आधी नंदीची पूजा करावी व थोडासा त्याला गूळ अर्पण करावा. सोमवारी साप दिसल्यास त्याला कधीही मारू नये.

तसे तर सापाला कधीच मारू नये. पण सोमवारी सापाला मारल्यास महादेवांच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो. सोमवारी सज्जन व्यक्ती,साधू, संत, यांचा अपमान करू नये. व विशेषतः जे अघोरी साधू जे महादेवांचे भक्त असतात. अश्या साधूंचा तर चुकूनही अपमान करू नये. कारण भगवंत भक्तीचा भुकेला असतो.

आणि त्यांच्या भक्ताचा अपमान म्हणजे त्यांचा अपमान. यामुळे ते क्रोधित होतात. यादिवशी घरी आलेला अतिथी किंवा भिकारी कोणालाही उपाशी जाऊ देऊ नये. त्यांना अन्नदान करावे. स्वयंपाक करून पोटभर खायला द्यावे. आणि शक्य असेल तर एक मूठभर तांदूळ दर सोमवारी कोणा एका व्यक्तीला दान करावे. महादेवांना पांढरा रंग फार आवडतो.

सर्व पांढरे फुले महादेवांना वाहिली जातात, परंतु केतकीचे फुल पांढरे असून देखील महादेवांना वाहिले जात नाही. त्याबरोबरच शंखांचा वापर महदेवांच्या पुजेत करू नये. कारण महादेवांनी शंकचुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.आणि त्याचे प्रतीक म्हणून शंखाकडे बघितले जाते. म्हणून शंखात पाणी घेवून महादेवांना अर्पण करू नये.

तुम्ही शंखाचा वापर शंखनाद करण्यासाठी करू शकता पण पूजेत वापरू नये. महादेवांची पूजा करताना आपण तांदूळ वापरतो, तेव्हा लक्षात असूद्या की तांदूळ अखंड असावेत. तुटलेले तांदूळ पूजेत वापरू नये. हळदकुंकू या उत्पत्तीच्या वस्तू आहेत व त्या शक्तीशी म्हणजे स्त्रीशी संभंदित आहेत. म्हणून महादेवांना हळद व कुंकू कधीही वाहू नये.

महादेवांना नारळ ही वाहू नये. वाळलेली, खराब झालेली फुले ही महादेवांना अर्पण करू नये. परंतु बेलाची पाने कधीही शिळी होत नाहीत. तुम्ही वाहिलेली बेलाची पाने पाण्याने धुवून पुन्हा महादेवांना वाहू शकता. शिवलिंगावरचे पाणी तुळशीला वाहू नये असे केल्याने तुमच्या चालू कामात अडथळा येतो. कारण असे केल्याने तुम्ही दोघांनाही नाराज करता.

तुळशीची पाने महादेवांच्या परिवारात कोणालाही जसेकी, गणपती, पार्वती, महादेव, कार्तिक स्वामी, यांना चुकूनही वाहू नये. या चुका कधीही करू नये. आणि जर कधी आपल्या हातून अश्या काही चुका झाल्या असतील तर त्यांची क्षमा मागा. ते जरूर क्षमा करतील. कारण ते भोळे भंडारी आहेत. प्रदोष काळात महादेवांची पूजा करणे खूप चांगले व शुभ फलदायी असते.

यादिवशी संध्याकाळी महादेवांची यथाशक्ती पूजा करावी. जे शक्य असेल ते महादेवांला अर्पण करावे. व काहीच नसेल तर एक तांब्या महादेवांवर पाणी अर्पण करावे. व महादेवांची प्रार्थना करावी. एक तुपाचा दिवा महादेवांच्या मंदिरात दर सोमवारी सायंकाळी लावाव याने महादेव प्रसन्न होतात. जर मंदिरात जाऊन दिवा लावणे शक्य नसेल तर घराच्या ईशान्य कोपर्‍यात तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता व महादेवांना प्रसन्न करू शकतात.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या  कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *