नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” हा अनुभव प्रमोद पाटील, राहणार शिर्डी येथील दादांचा आहे. दादा सांगतात मला श्री गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर पासून ताप थंडी खोकला त्रास चालू झाला. लगेच श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डॉक्टरांना दाखवले, डॉक्टरांनी को’रोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. टे’स्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर ऑक्सिजन पाहिले तर 72 झाले.
मला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. देऊळ बंद चित्रपटांमध्ये महाराज राघव शास्त्री ला जसे वेगवेगळे मदत करत असतात, तसे गुरुमाऊली आजही आपल्याला मदत करत आहेत, तसा अनुभव मला येत गेला. मला ज्या वेळी हॉस्पिटल मिळत नव्हते श्वास घ्यायला त्रास होत होता, जीव घुटमळत होता त्यावेळी वाटलं आता मी काही जगत नाही.
त्या वेळेपासून स्वामींची लीला चालू झाली. माझ्या पुणे मुंबई येथील पाहुण्यांनी फोन करून एका व्यक्तीला माझ्या घरी जाण्यास सांगितले. ती व्यक्ती रात्री आली. मला ऑक्सीजन सिलेंडर लावले त्या वेळी कुठे बरे वाटले. त्यांनी सांगितले हे सिलेंडर सकाळी आठ वाजेपर्यंत जाईल त्यानंतरची ऑक्सिजनची सोय करून ठेवा.
घरच्यांनी विचारले सिलेंडर चे किती रुपये द्यायचे, तर त्या व्यक्तीने सांगितले अगोदर पेशंट चांगला बरा होऊ दे मग या तुमच्या इच्छेने! एकही रुपया न घेता गेले. त्यांनी पाहुण्यांकडून पैसे घेतले नाहीत. अशा बऱ्याच व्यक्ती मला भेटल्या, हे सर्व स्वामींचे नियोजन. मग घरी ऑक्सिजन मागून घेतले, हॉस्पिटल बेड मिळेपर्यंत त्या ऑक्सिजन घेत होतो.
घरातील गणपतीची आरती करायला उभे राहता पण येत नव्हते. डॉक्टरांनी सांगितले आताच्या आता हॉस्पिटला ऍडमिटला ऍडमिट व्हा. जागा मिळाली नाही तर पुणे, मुंबईला जा. नामस्मरण चालू होतं. बोलताना खूप धाप लागायची. सर्व हॉस्पिटल मध्ये चौकशी केली कुठेही जागा नव्हती.
सर्व हॉस्पिटल फुल होते काय करायचे समजत नव्हते. नंतर दादा साहेबांना फोन करून सर्व परिस्थिति सांगितली दादांनी सेवा दिली. रात्री अडीच वाजता एका हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली. व्हेंटिलेटरवर पाच दिवस होते. परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय दादा साहेबांचा आशीर्वाद लाभला.
आपल्या बऱ्याच स्वामी सेवेकरी ग्रुप ने सेवा चालू केली. त्याबसर्वांचे मी मनापासून आभार मानतो. हळूहळू तब्येतीत सुधारणा होत होती. हॉस्पिटलच्या उपचारा बरोबर मी दादा नी सांगितलेल्या सेवा करत होतो. ज्यावेळी मी मंत्र म्हणायचा त्यावेळी ऑक्सिजन लेवल 100 पेक्षा खाली गेले नाही. रात्री सर्व पेशंट झोपलेले असायचे. त्यावेळी सेवा करायचो. हॉस्पिटलमध्ये सिस्टर, ब्रदर असायचे त्यांना काही समजत नव्हते मी काही बोलतोय ते.
एका सिस्टर ने न राहून दोन दिवसांनी मला विचारले तुम्ही रात्री एकटेच काय हळू आवाजात बोलत असता. मी म्हणालो तुम्ही जशी आमची सेवा करतात, तशी मी माझ्या गुरूंनी सांगितलेले सेवा करतो. मग त्याने काय होतं अशा त्या म्हणाल्या… मी सांगितले माझ्या तब्येतीत सुधारणा होते.
त्या हसायला लागल्या. आणि म्हणाल्या अहो असे देवाचे नाव घेऊन काही होत नसतं, आम्ही जे तुम्हाला ट्रीटमेंट देतो त्यामुळे तुमच्या तब्बेतीत सुधारणा होते. मी म्हणालो त्याबद्दल थँक्स! तुम्ही सर्वजण खूप चांगले धाडसाने काम करतात. पण करता करविता आमचे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत.
सिस्टर ची परवानगी घेऊन काही पेशंटला सांगून थोडावेळ स्वामींचा सामूहिक स्वामी जप चालू केला. मी सोडून कोणीही सेवेकरी नव्हते. मी फक्त निमित्तमात्र होतो. माझ्या बेडच्या बाजुच्या बेडवर 80 वर्षाच्या आजी होत्या. त्यांनी मला एकदा विचारले, पोरा कोरोना कवा जाणार, मी कवा बरी होणार.
मी सांगितलं रोज तुम्ही तुम्हाला जमेल तेवढं श्री स्वामी समर्थ म्हणा. त्या दिवसापासून त्यांनी चालू केलं. सांगायला आनंद वाटतो की तिसऱ्याच दिवशी आजींना वोर्ड मध्ये शिफ्ट केलं. आजीचं ऑक्सिजन लेवल 94 आले. फक्त एका मंत्रामुळे…! डॉक्टरांनी मला काही एक्सरसाइज सांगितले आणि म्हणाले तुम्हाला जमेल त्याच्याकडून तुम्ही करून घ्या. माझ्या तब्येतीत आता पूर्वीपेक्षा बरीच सुधारणा झाली.
डॉक्टर म्हणाले..! पाटील मध्ये चांगली सुधारणा झाली, त्यांना कुठे माहित होते दिंडोरी गुरुपीठा वरून मला ऑक्सिजन येते. डॉक्टर सिस्टर ला म्हणाले यांना वोर्ड ला शिफ्ट करा. आपले गुरू आपल्यासाठी काय काय करता. “करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा। माझी या ठाया वर्ता मी पानांची नासेची।।”
आपले जे भोग प्रारब्ध असतात ते आपल्याला भोगायला लागतात. सेवेने त्याची तीव्रता कमी होते. डिशचार्ज देयचे वेळी मला सिस्टर बोलल्या, तुम्हाला थोडा जरी उशीर झाला असता हॉस्पिटल मध्ये यायला तर तुमचे काही खरे नव्हते. इथे आला त्यावेळी आम्ही बघितलं तुम्हाला काय अवस्था होती तुमची, मरणाच्या दारातून परत आलात. एकदा आयुष्याचा श्वास संपला की संपला. माणसाकडे कितीही पैसा असला तरी तो संपलेला श्वास विकत घेऊ शकत नाही.
“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे” माझा पुनर्जन्म झाला या सर्वांचा मी ऋणी आहे. श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय दादासाहेबांना एवढीच विनंती आहे की सर्वांना निरोगी, सुखी ठेवा. सर्वांना दोन वेळचं पोटभर जेवण अन्न, वस्त्र, निवारा मिळुदेत. या जन्माच्या शेवटच्या श्वासापर्यंत जन्मोजन्मी तुमची सेवा घडू दे. आणि सर्वांच्या ओठी श्री स्वामी समर्थ मंत्र जप कायम राहू दे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.