श्राध्द पक्षांमध्ये आपल्या पितरांविषयी च श्रद्धाभाव व्यक्त करणं म्हणजे त्यांचं श्राद्ध घालणं. वास्तविक श्राद्ध (तर्पण) हे आपल्या अंतकरणामधुन दररोज केलं गेलं पाहिजे. कारण आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या पुण्याईचे फळ असतं.
त्यामुळे श्राद्ध अमुकच तिथीला घालण शास्त्रानुसार जरी सांगितलं असेल, तरी मनामध्ये पित्राणविषयी ची श्रद्धा ही कायम असली पाहिजे. ती श्रद्धा नसेल तर तुमचं श्राद्ध व्यर्थ होतं. श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्राध्द केले पाहिजे. आता काहींना प्रश्न पडतो की भरणी श्राद्ध करायचं का?
आणि ते श्राद्धाच्या अगोदर करायचे का? त्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृपक्षात भरणी नक्षत्रारावर श्राध्द केल्याने, श्राद्ध केल्याचं फळ मिळत अस मानलं जातं. मृताच्या पहिल्या वर्षांमध्ये जी व्यक्ती मरण पावलेले आहे त्याच्या पहिल्या वर्षांमध्ये एका वर्षाच्या आत येणाऱ्या, भाद्रपदातील भरणे नक्षत्रावर श्राद्ध करावे.
पितृपक्षाचा मृताचे भरणी श्राद्ध केले नाही तर त्याचे प्रतित्वातून मुक्ती होत नाही किंवा ती मुक्ती कशी होईल अशा प्रकारचा प्रश्न शास्त्रकारांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे. त्याचप्रमाणे भरणी नक्षत्रावर सपिंड श्राद्ध नाही केलं तर, तो मृतात्मा प्रेतामध्येच अडकून पडतो. अशा प्रकारचं काही वेदशास्त्रसंपन्न पंडितजींचे म्हणणं आहे.
काहीवेळेला घरामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये सगळ्या तीर्थयात्रा माणसांना घडत नाहीत, तर अशी लोक मृत झाल्यानंतर त्यांच्या त्या वासना आहेत त्या अतृप्त असतात. जिवंतपणे तीर्थ यात्रा घडलेले नसतात. आशा व्यक्ती मेल्यानंतर मातृ गया, पितृ गया, पुष्कर तीर्थ, ब्रम्हकपाल, ह्या सगळ्या तीर्थावळी श्रद्धांचा फळ मिळावं म्हणून हे भरणी श्राद्ध केले जाते.
त्याचबरोबर ज्यांना आपल्या पितरांना उद्देशून गया वगैरे तीर्थावर श्राद्ध करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थिती नसते. वेळ नसतो, त्यामुळे ते करता येत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हे भरणी श्राद्ध करतात. दरवर्षी भरणी श्राद्ध करावे असे शास्त्रकार सांगतात. वास्तविक पाहता जुन्या काळामध्ये पितृपक्षामध्ये सगळेच दिवस श्राद्ध करण्याची पद्धती होती.
परंतु काळाच्या ओघामध्ये मृतांच्या तिथीच्या दिवशी फक्त श्राद्ध करण्याची पद्धत पडत गेली. त्यामुळे या पद्धतीमुळे भरनि श्राद्ध बाबत वेगळा विचार करण्याची वेळ आलेली आहे. भरणी श्राद्ध मध्ये पिंडाचा निषेध सांगितलेला आहे. तो प्रथम वर्षा नंतर दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी भरणारा श्राद्ध हा भरणी श्राद्ध समजावा असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे.
भरणी श्राध्द हे मृताच्या पहिल्या वर्षा पासून कराव की दुसर्या वर्षापासून कराव या बाबतीत सुद्धा देशातील वेगळ्या प्रकारच्या विद्वानांमध्ये वेगळ्या प्रकारची मते आढळतात. अनेक ठिकाणी दरवर्षी भरणी श्राद्ध अवश्य करावी. परंतु पहिल्या वर्षी बिलकुलच करू नये असं सांगितलं जातं.
तर काही ठिकाणी पहिल्या वर्षी अवश्य करावं आणि नंतर इच्छा असली तर दरवर्षी करावा असे म्हटलेले आहे. त्यामुळे सांप्रत हे भरणी श्राद्ध कधी करावे आणि कधी करू नये याबाबती मध्ये सुद्धा भाविकांनी आपापल्या परिसरामध्ये जो काही पारंपरिक पद्धत चालू आहे, त्यानुसार निर्णय घ्यावा. पण बरेच ठिकाणी वेगळ्या परंपरा असतात.
जस की आपण बोलतो, पाच कोसावर भाषा बदलते तसे पाच कोसावर लग्नाची म्हणा, श्रद्धाचे म्हणा, थोडेफार फरक त्या नियमांमध्ये आढळून येतात. तर त्यानुसार आपण निर्णय घ्यावा. काहींच्या मते भरणी श्रद्धा प्रमाणेच जी इतरही मगा नक्षत्रामधील श्राद्ध हे निधोणोत्तर पहिल्या वर्षी महालयातून करतात. दुसऱ्या वर्षी करावीत असे म्हणतात.
नित्यतर्पणात देखील मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा, पहिल्या वर्षी करू नये असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा माझ्या सगळ्यांना म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या देशकाल परिस्थितीचा विचार करून निर्ण य घ्यावा.सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा श्राद्धाचा स्वयंपाक कुणी करावा?
श्राध्द तसेच पितृपक्षाचा स्वयंपाक करताना शास्त्रणे स्पष्ट सांगितले आहे त्याबद्दल माहिती देणारे श्राद्ध मंजिरी नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये याविषयीचे सविस्तर वर्णन आले आहे. शक्य असेल तर जो व्यक्ती श्राद्ध घालतो त्याने स्वतःहा स्वयंपाक केला पाहिजे.
त्याला जमत नसेल तर त्याच्या सौभाग्यवतीने पत्नीने हा स्वयंपाक करावा आणि दोघांनाही जमलं नाही तर भाऊकी ने हा स्वयंपाक करावा आणि भावकी उपलब्ध नसेल तर मग तुमचे नातेवाईक असतील, मृत व्यक्तीचे वंशज असतील किंवा मित्रमंडळी असतील यांनी हा स्वयंपाक केला तरी चालतो.
समजा तुम्ही नवीन ठिकाणी आहात हे शक्य नाही. अशा वेळेला पुत्रवती महिलांकडून आणि सौभाग्यवती महिलांकडून हा स्वयंपाक करून घेतला तरी चालतो. विधवा आणि वांज स्त्रियांनी हा स्वयंपाक करू नये असं शास्त्रांत विधान आहे. या पूजेमध्ये ब्राह्मण आसन बनवण्याची पद्धत आहे तर गोष्टीविषयी सुद्धा शास्त्राने अतिशय सुंदर वर्णन केले आहे.
तर ब्राह्मणाचे जे आसन आहे ते रेशीम, लोकर, लाकूड, उशाच असावा असे म्हंटले आहे. परंतु ते आसन लोखंडाचं कधीही नसाव. चुकून आपण लोखंडाची खुर्ची, लोखंडाचा पाट वगैरे सुद्धा ते वापरू नये. तर या सगळ्या गोष्टी आहेत. श्राद्ध घालायला काही हरकत नाही म्हणजे काही ठिकाणी सांगितले पहिल्या वर्षात करू नये, दुसऱ्या वर्षात कराव वगैरे.
सगळ्या बाबतींमध्ये बऱ्याच विद्वानांची बरेच वेगवेगळे म्हणणे आहे, त्याच्यामुळे आपल्यातही बदल होण्याची शक्यता आहे. परंतु मनामध्ये जर संपूर्ण भक्ती आणि श्रद्धा असेल तर श्राद्ध घालायला हरकत नाही, आणि घालायचं म्हणून घालत असाल तर ते घालणं सुध्दा निरर्थक आहे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.