शिवाजी नगर अन् पुणे स्टेशन बॉम्बने उडवले जाईल, कंट्रोल रुमला धमकी..

Pune

दरम्यान, पुण्यामधील शिवाजी नगर व पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा फोन पुन्हा एकदा कंट्रोल रुमला दिली आहे. तसेच एका माथेफिरुने ही धमकी दिली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी काही तासांतच या माथेफिरुच्या मुसक्या आवळल्या असल्याचे सांगितले जाते.

पुण्यामधील शिवाजी नगर व पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा फोन एका माथेफिरूचा फोन पुन्हा एकदा कंट्रोल रुमला आला होता. त्यामुळे पुण्यातील या तिन्ही परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, एका माथेफिरुने ही धमकी दिली असून पोलिसांनी काही तासांतच या माथेफिरुच्या मुसक्या आवळल्या असल्याचे सांगितले जाते.

पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड परिसर उडवून देण्यात येईल आणि असा फोन पुण्यातील कंट्रोल रुमला आला होता. दरम्यान, हा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. त्यांनी लगेच तिन्ही परिसरात चौकशी सुरू केली आणि हा धमकीचा कॉल करणारा माथेफिरू असून लगेच ही अफवा पसरवल्याचं पोलीस तपासात लक्षात आले.

तसेच हा कॉल करणारा माथेफिरू व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असल्याचे सांगितले जाते तसेच या माथेफिरुने उडवून दिलेल्या अफवेमुळे काहीवेळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, पुण्यात यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या असून त्यात पुणे स्टेशन, विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे कॉल्स नियंत्रण कक्षाला अनेकवेळा आले आहेत.

त्याबरोबर बॉम्बने पुणे स्टेशन उडवून देण्याच्या धमक्यादेखील आल्या आहेत. या अशा धमक्यांमुळे संपूर्ण पोलीस पथक कामाल लागतं त्यासोबत बॉम्बशोधक आणि नाशक पथकदेखील कामाला लागतं. मात्र अनेकदा फोन व धमक्या फेक असल्याचं समोर येत आहे, त्यामुळेच आता या सगळ्या फोन करणाऱ्यांचा तपास करुन लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *