गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात अनेक आंतकवादी सापडत आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर 2012 दरम्यान जर्मन बेकरीतील आरोपी कतील सिद्दीकी या दहशतवाद्याची हत्या केल्याचा आरोप होता. यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी स्थानिक पातळीवरचे नसून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या 5 जानेवारी रोजी झाली. दरम्यान, या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपास वेगाने सुरु केला असून या प्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांना पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे. तसेच या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असल्याने कुख्यात शरद मोहोळ याची हत्या हा आंतरराष्ट्रीय कट असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
तसेच दशतवाद्यांकडून त्याची हत्या घडवण्यात आली असून जर्मन बेस्ट बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी कातील सिद्दकी याची हत्या शरद मोहोळ याने 2012 दरम्यान केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून कुख्यात शरद मोहोळ याची हत्या केल्याचे सुद्धा काही सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले जात आहे.
त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणात राज्य सरकारच्या तपासात आम्ही समाधानी असून यामध्ये सीबीआयने तपास करण्यात करावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात आज केली. तसेच हिंदुत्ववादी संघटना 28 जानेवारी 2024 ला पुण्यात या हत्येच्या तपासासाठी जनमोर्चा काढणार असल्याचे सुद्धा मिलिंद एकबोटे यांनी सांगितले आहे. तसेच यामध्ये काही राजकीय दबाव असल्याचा संशय पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कुख्यात शरद मोहोळ हे हिंदुत्ववाद्याचे नेतृत्व करतील असे त्याचे कार्य होते. मात्र या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी माहिती दिली, त्यावेळी ती माहिती पूर्ण न दिल्याचा धक्कादायक आरोप या संघटनेने मार्फत केला जात आहे. त्यामुळे स्वाती मोहोळ यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. तसेच आमचा गृह खात्यावर अजिबात आक्षेप नाही, मात्र परंतु जो तपास सुरू आहे, त्यावर आम्ही समाधानकारक नाही.
आरोपींच्या गाडीत पैसे सापडल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्याची मागणी करण्यात आली असून यासाठी 28 तारखेला कोथरूड ते शिवाजीनगर मोर्चा काढण्यात निघणार असल्याची माहिती या संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.