‘मी जबाबदारीने सांगतो की…’ शरद मोहोळ हत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया..

Pune प्रादेशिक

काल भरदिवसा पुणे शहरातील कोथरूड भागांत गँगस्टर शरद मोहोळची हत्या करण्यात आली. दरम्यान, गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी 2 वकिलांसह आठ जणांना कोठडीत घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिस्ट्री शीटर मोहोळच्या नावावर अपहरण, खुनाचा प्रयत्न, खुनाचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मोहोळ कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे तिघांनी गोळ्या झाडल्या.

मोहोळ यांच्या छातीत आणि खांद्यावर गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. मोहोळ यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी उपमुख्यमंत्री राज्याचे अजित पवार यांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणावर आज प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले की, मला मी पुण्याचा पालकमंत्री असल्याची जाणीव आहे तसेच आमचं या प्रकरणाकडे लक्ष आहे. याशिवाय, या प्रकरणी पोलिसांचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, काल पुण्यात सुप्रसिद्ध आणि कुख्यात डॉन शरद मोहोळची भर दिवसा हत्या करण्यात आली. शरद मोहोळची हत्या करणाऱ्या एकूण 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “पुण्यात काल भरदिवसा एक घटना घडली, पण पोलिसांनी ताबोडतोब जे कुणी दोषी होते त्यापैकी अनेकांना पकडलं आहे.

पोलिसांनी 2-3 तासांपूर्वी पत्रकार परिषद देखील घेतली आणि सर्व वस्तूस्थिती सांगितली. तसेच पोलिसांचा पुढचा तपास सुरु आहे”, असं अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच पालकमंत्री अजित पवार यांना यावेळी शरद मोहोळ हत्या प्रकरणाविषयी आणखी काही माहिती पत्रकारांनी विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर उपमुख्यमंत्रीनी मात्र त्यावर फार बोलण्यास नकार दिला.

“या प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय, संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मी त्याबद्दल बोलणं उचित नाही, मी एवढंच तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या संदर्भात जी काही वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर आणली जाईल. तशा पद्धतीने FRI दाखल केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली.

तसेच माझं सतत पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने लक्ष असतं आणि महाराष्ट्रासाठी तर काम करतच असतो, ती आमची जबाबदारी असते, असं पुण्यातल्या विकासकामांबद्दल अजित पवार म्हणाले. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर विकासाच्या बाबतीत पाठीमागे राहू नये, यासाठी प्रयत्न सुरु असतात. तसेच निगडीपर्यंत मेट्रोचं स्टेशन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना दिली. बाकीचे सुद्धा कामे चालली आहेत.

अजून तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला महाराष्ट्रात येत असून जवळपास 46 हजार कोटींच्या विकासकामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नावा-शेवा प्रकल्पाचा समावेश आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *