शरद मोहोळ खून प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, नेमकं काय प्रकरण?

Pune प्रादेशिक

पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी दिवशी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यानंतर पुणे शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शरद मोहोळच्या खुनानंतर शहरातील टोळीयुद्ध रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या मोहोळ हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, आज पुणे पोलिसांनी गुंड शरद मोहोळच्या प्रतिस्पर्धी टोळीतल्या विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे याच्यासह 5 जणांना अटक केली असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या हत्येप्रकरणी तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी अटक केलेला विठ्ठल शेलार याची 2017 मध्ये पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्त केली असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, आतापर्यंत शरद मोहोळ खूनप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली असून कुख्यात 5 जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला गुंड विठ्ठल शेलार याची काही वर्षांपूर्वी भाजपाच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी असल्याने या हत्या प्रकरणाला नविन वळण लागणार का? हे पाहणे आवश्यक आहे.

विठ्ठल शेलार याने 2017 मध्ये भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्या नंतर बापट आणि भेगडे यांनी शेलार याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी असून त्याच्यावर खून तसेच खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासून दिसून आले.

2014 मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल देखील करण्यात आला होता. याशिवाय, त्याला अटकही झाली होती. 2017 मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. दरम्यान, भाजपाने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले जाते. तसेच दरम्यान, विठ्ठल शेलारच्या भाजपाप्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली.

त्यानंतर आम्हाला विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची काहीही कल्पना नसल्याचे गिरीश बापट म्हणाले होते.
तसेच शेलारव्यतिरिक्त शरद मोहोळ याच्या पत्नीनेदेखील अलीकडेच भाजपात प्रवेश केला होता. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *