पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. दरम्यान, याच्यावरील खुनी हल्ल्यानंतर काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर जोरदार टीका केल्यानंतर काँग्रेस-भाजपमध्ये वाद सुरू होण्याची शक्यता असल्याचे दिसून येतं.
दरम्यान, कुख्यात गुंड शरद मोहोळवरील खुनी हल्ल्यानंतर काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर टीका केली होती. मग त्यानंतर काँग्रेस-भाजपमध्ये वाद सुरू झाला असल्याचे दिसून येते. तसेच या टीकेच्या उत्तर देतांना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सवंग लोकप्रियतेसाठी धंगेकर अशी विधाने करत असून ते हवा न भरलेला फुगा आहेत, अशी टीका केली.
दरम्यान, सोमवारी दिवसापूर्वी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोथरूडचे आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच शहरातील वाढत्या गु्न्हेगारीमुळे कोथरुडची ‘अशांत कोथरुड’ अशी ओळख निर्माण झाली असल्याने भाजप नेत्यांनी अनेक गुंडांना आश्रय दिल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत धंगेकर यांच्या आरोपांना उत्तर दिले. तसेच यावेळी धीरज घाटे म्हणाले की, अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना भाजप नेत्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तसेच धीरज घाटे यांनी, धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही. भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त वातावरणासाठी महायुती वचनबद्ध असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना त्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
मात्र सवंग लोकप्रियतेसाठी धंगेकर असे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे म्हणून हा वाद संपवला. तसेच ज्यांना स्वत:च्या मतदारसंघाची काळजी नाही, त्यांनी कोथरूडची काळजी करू नये. आगामी निवडणुकीत फाजील आत्मविश्वास धंगेकर यांना नडणार आहे. चंद्रकांत पाटील 4.5 वर्षात मोहोळ यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असेही ते म्हणाले होते..